फिनटेकला स्पर्धेत टिकून राहण्यात मार्केटिंगची भूमिका
फिनटेकला स्पर्धेत टिकून राहण्यात मार्केटिंगची भूमिका
जगभरातील वित्तीय सेवा क्षेत्रात सध्या फिनटेक ही मल्टिबिलियन-डॉलर इंडस्ट्री आहे. तंत्रज्ञान आधारीत, आधुनिक आणि सोप्या सोल्युशन्सद्वारे, फिनटेकने ग्राहकांचा वित्तीय प्रवास सोपा केला आहे. पण फिनटेक प्लॅटफॉर्मची संख्या जशी वाढतेय, तसे सध्याच्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करून उत्पादनांतून जास्त व्यवसाय करण्याचे मार्केटिंगचे समान आव्हान फिनटेक ब्रँडसमोर आहे.
मार्केटिंगच्या योग्य धोरणाद्वारे ब्रँडला नवे ग्राहक जोडत आणि वर्तमानातील ग्राहक कायम ठेवत जास्त चांगला मार्केट शेअर मिळवता येईल. मात्र, सध्याच्या स्पर्धेच्या युगात, वैयक्तिक ग्राहकांच्या गरजा ओळखत प्रत्येकजणच सोल्युशन्स शोधत आहे. पण बहुसंख्य लोकांना टार्गेट करता येण्यासारखे योग्य मार्केटिंग धोरण नेमके काय आहे? एवढ्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फिनटेक ब्रँडने मार्केटिंग धोरण कसे प्रासंगिक ठेवले पाहिजे, याविषयी सांगत आहेत एंजेल ब्रोकिंग लिमटेडे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी.
दिग्गजांशी स्पर्धा करण्यासाठी विश्वासार्हता निर्माण करा: लोकांच्या पैशांचा संबंध येतो, तेव्हा ‘विश्वास’ आणि ‘विश्वासार्हता’ या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याआधारे लोकांचे विभाजन करायचे असल्यास काही गोष्टी अधिक आव्हानात्मक ठरतात. फिनटेक सेक्टर सध्या भारत आणि जगभरात विस्तारत असले तरीही वित्तीय सेवेच्या जगात ते अजून खूप हळू हळू प्रगती करत आहे. एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआयसारख्या ब्रँडनी घरा-घरात विश्वसनीयता मिळवली आहे. फिनटेक कंपन्यांना याप्रकारच्या अनेक दशके राज्य केलेल्या दिग्गजांशी स्पर्धा करायची आहे. अशा स्थितीत ग्राहकांना केवळ आकर्षितच करायचे नाही तर त्यांचा विश्वास जिंकून, त्यांना जोडून कायमही ठेवायचे आहे. या लढाईत दिग्गजांवर मात करण्याचा एक मार्ग म्हणजे, लोकांनी पैशांचा विचार करताच, सर्वप्रथम आपल्या ब्रँडचेच नाव त्यांच्या मनात आले पाहिजे. धारदार, अचूक वेळी आणि प्रासंगिक मार्केटिंग धोरणांद्वारे ब्रँडबद्दलची जागरूकता वाढते. एवढेच नव्हे तर आपला पैसा सुरक्षित हातात आहे, असा विश्वासही लोकांमध्ये निर्माण होतो.
योग्य वेळी लक्ष्यित श्रोत्यांपर्यंत योग्य संदेश पोहोचवा: इतिहासात डोकावले असता असे दिसते की, तरुण नेहमीच अनेक गोष्टी प्रथम हाताळून पाहण्यात किंवा काही नवे स्वीकारण्यात पुढे असतात. फिनटेक कंपन्यांचा उदय झाला तेव्हादेखील, अस्वस्थ आणि निष्क्रिय पैशांचा नफा देणारा मार्ग शोधणाऱ्या तरुणाईनेच त्यांच्या सेवा प्रथम वापरल्या. १९९० मध्येही एटीएम कार्डबाबत हेच झाले. अनेक वर्षे गेल्यानंतर आता ज्येष्ठ गुंतवणूकदारदेखील उत्साहाने फिनटेकच्या सुविधा वापरत आहेत. फिनटेकचा आणखी विकास होत आहे आणि त्यांच्या उत्पादनांचा विस्तारही होत आहे. मार्केटिंगचे योग्य धोरण असल्यास ब्रँडचा संदेश योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. ते सुरुवतीला लवकर स्वीकारणारे आणि नंतर व्यापक प्रमाणात स्वीकारणारे. धोरण ठरवल्यास, वर्तमानपत्रात तुम्हाला जाहिरात प्रकाशित करायची का, की इन्स्टाग्राम इन्फ्लूएंसरची मदत घ्यायची, किंवा ग्रामीण भागात प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देण्यासाठी रेडिओ बाइट्सची मदत घ्यायची, हे निश्चित करता येते. निर्णायक मार्केटिंग धोरणाद्वारे योग्य वेळ ब्रँडचा संदेश लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य माध्यम निवडता येते.
भीतीदायक संकल्पना सोप्या करा: वित्त किंवा तंत्रज्ञान या दोन्हीही क्षेत्रांतील संकल्पना बहुतांश लोकांना सोप्या वाटत नाही, त्यात खूप तांत्रिक आणि गुंतागुंतीची भाषा असते, याच्याशी आपण सर्वजण सहमत असतो. संभाव्य ग्राहकांना फिनटेकच्या सागरात पाय ठेवताना गुंतागुंतीच्या समजांमुळे हे क्षेत्र भीतीदायक वाटू शकते आणि ते ब्रँडपासूनच नव्हे तर संपूर्ण क्षेत्रापासूनच दूर जाऊ शकतात. लोकांमधील संकोच दूर करण्यासाठी सोप्या आणि स्वागतार्ह संदेशांचा वापर करणारे योग्य मार्केटिंग धोरण वापरता येते. प्रभावी अंमलात येणारे मार्केटिंग कँपेन तुमच्यासाठी अवश्य मार्ग तयार करेल आणि तुमच्या फिनटेक व्यवसाया सर्वांपेक्षा वेगळे ठरवेल.
तुमचे उत्पादन आणखी चांगले बनवा: कल्पना केल्यास अशक्य वाटेल, पण प्रभावी मार्केटिंगद्वारे तुमच्या उत्पादनातील अनावश्यक त्रुटी कमी करण्यास अवश्य मदत केली जते. तसेच ग्राहकांना आकर्षित करत हे उत्पादन अधिक चांगले बनवता येते. जेणेकरून आपण थेट ग्राहकांशी संवाद साधू शकतो. सोशल मीडियाच्या आगमनामुळे रचनात्मक आणि आक्षेपार्ह अशा दोन्ही प्रतिक्रिया सहजपणे मिळतात. त्यामुळे उपयुक्त गोष्टी व्यर्थ गोष्टींपासून वेगळे करण्याचेच तेवढे काम आहे. रचनात्मक प्रतिसाद मिळवण्याकरिता तसेच उत्पादन तयार करताना किंवा ग्राहकांना हवा असलेला प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी एखादी कल्पना मिळवण्याकरिता मार्केटिंग प्लॅन तयार करता येऊ शकतो. उदा. सध्या क्रिप्टोकरन्सीबद्दल खूप गोंधळ आहे. अशा स्थितीत ग्राहकांशी संवाद साधल्यास, हा ट्रेंड जाणारा आहे की, थांबणारा आहे, हे कळते.
एकूणच, यशस्वी मार्केटिंग धोरणाद्वारे जास्त ग्राहक आकर्षित होतात असे नाही तर याद्वारे ग्राहकांना तुमचे उत्पादन समजून घेण्याकरिता, ते सहज मिळवण्याकरिता मदत केली जाते. याद्वारे कंपनी आणि एखाद्या व्यक्तीदरम्यान आजीवन नाते निर्माण केले जाते. फिनटेक ब्रँड म्हणून, मार्केटिंगचे धोरण आखताना, ग्राहकांना समजून घेण्यासाठी दिलेल्या साधनांसह योग्य श्रोत्यांपर्यंत पोहोचणे, हे यादीच्या सर्वोच्च स्थानी असले पाहिजे. कल्पना या स्थानांतरीत होत असतात, त्यामुळे प्रस्थापित फिनटेक ब्ररँड्सनी स्वीकारलेल्या यशस्वी धोरणांकडून नावीन्यपूर्ण कल्पनांकडून प्रेरणा घेणे सुरूच ठेवावे.
Comments
Post a Comment