एअरटेलकडून ग्राहकांना अधिक मूल्य देण्यासाठी प्रीपेड प्लान्समध्ये परिवर्तन
एअरटेलकडून ग्राहकांना अधिक मूल्य देण्यासाठी प्रीपेड प्लान्समध्ये परिवर्तन
मुंबई, २८ जुलै २०२१: भारती एअरटेल (''एअरटेल'') या भारताच्या आघाडीच्या दूरसंचार सेवा प्रदाता कंपनीने त्यांचे प्रीपेड प्लान्स अपग्रेड केल्याची घोषणा केली. एअरटेलने ४९ रूपये एण्ट्री लेव्हल प्रीपेड रिचार्जवर सूट दिली आहे. कंपनीचे प्रीपेड पॅक्स आता ७९ रूपये स्मार्ट रिचार्जपासून सुरू होतील आणि ग्राहकांना जवळपास चार पट अधिक आऊटगोइंग वापरासह डबल डेटा देतील. हे परिवर्तन कंपनीच्या उच्च दर्जाचे कनेक्टीव्हीटी सोल्यूशन्स देण्यावरील फोकसशी संलग्न आहे. एण्ट्री लेव्हल रिचार्जवरील एअरटेल ग्राहक आता त्यांच्या अकाऊंट बॅलन्सबाबत चिंता न करता दीर्घकाळापर्यंत कनेक्टेड राहू शकतात. हे परिवर्तन २९ जुलै २०२१ पासून लागू होईल.
Comments
Post a Comment