ड्रूमची १.२ अब्ज डॉलरची निधी उभारणी
ड्रूमची १.२ अब्ज डॉलरची निधी उभारणी
~ २०२२ मध्ये नॅसडॅक किंवा भारतात सूचीबद्ध होण्याचे कंपनीचे उद्दिष्ट ~
मुंबई, २८ जुलै २०२१: ड्रूम या भारतातील आघाडीच्या एआय-आधारीत ऑनलाइन ऑटोमोबाइल मार्केटप्लेसने नुकत्याच झालेल्या फंडिंग राउंडमध्ये १.२ अब्ज डॉलर मूल्याचा निधी उभारला. कंपनीने सध्या सुरु असलेल्या प्री आयपीओ ग्रोथ फंडिंगचा पहिला टप्पा २०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत बंद केला. अनेक विद्यमान गुंतवणूकदारांच्या सहभागासह, २०२१च्या दुस-या तिमाहीमधील फेरीच्या पहिल्या क्लोजिंगमध्ये ५७ स्टार्स आणि सेव्हन ट्रेन व्हेंचर्ससह नवीन गुंतवणूकदारांचा समावेश झाला. संभाव्य आयपीओकरिता कंपनी ड्युएल ट्रॅकचा पाठपुरावा करत आहे. २०२२ मध्ये नॅसडॅक किंवा भारतात सूचीबद्ध होण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
ड्रूमचे जीएमव्हीसाठी सध्याचा वार्षिक रन-रेट १.७ अब्ज डॉलर आणि नेट रिव्हेन्यूसाठी ५४ अब्ज डॉलर एवढा आहे. कंपनी आर्थिक वर्ष २०२१ मध्ये २ अब्ज डॉलर जीएमव्ही आणि ६५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नेट रिव्हेन्यू मिळण्याच्या अपेक्षेत आहे. सध्याचत्या विक्रीनुसार, तसेच तंत्रज्ञान आधारीत व्यवसाय आणि कामातील कार्यक्षमता याद्वारे ड्रूम नफा मिळवण्याच्या आसपास आहे.
ड्रूमचे संस्थापक आणि सीईओ, संदीप अग्रवाल म्हणाले, “ मागील ७ वर्षांत, आम्ही ऑनलाइन ऑटोमोबाइल खरेदी विक्रीकरिता संपूर्ण तंत्रज्ञान आधारीत अत्याधुनिक ट्रान्झॅक्शनल मार्केटप्लेस तयार करण्यासाठी लाखो डॉलर्स आणि हजारो मानवी तासांची गुंतवणूक केली. आम्ही ओबीव्ही, ईसीओ अशा फर्स्ट माइल सेवांपासून ते कर्ज, विमा या मिड-माइल सेवा तसेच डोअरस्टेप डिलिव्हरी या लास्ट माइल सेवांपर्यंत संपूर्ण तंत्रज्ञान आधारीत मशीनरी विकसित केली आहे. कोव्हिडनंतर ड्रूमचा निरंतर वृद्धीचा आलेख दिसत आहे. ऑटोमोबाइल ही सर्वात मोठी रिटेल श्रेणी आहे, परंतु ऑनलाइन क्षेत्रात याचा फार कमी विस्तार आहे. ऑनलाइन वाहने खरेदी व विक्री वेगाने होईल, अशी आम्हाला आशा आहे.”
महामारीत ड्रूमने डिजिटल अडॉप्शनमध्ये मोठी वृद्धी झालेली पाहिली. महामारीदरम्यान सार्वजनिक वाहतूक किंवा राइड शेअरिंच्या तुलनेत वाहनांच्या मालकीसाठी ग्राहकांमध्ये वाढतीी पसंती दिसून आली. २०२५ मध्ये, कंपनीला ऑटोमोबाइल खरेदी आणि विक्रीतील ऑनलाइन सहभाग सध्यापेक्षा ०.७ टक्क्यांनी वाढून तो ७ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे.
Comments
Post a Comment