गोदरेज अॅण्‍ड बॉईसकडून आंतरराष्‍ट्रीय खारफुटी परिसंस्‍था संवर्धन दिनानिमित्त सीआयआय व डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूएफ इंडियासोबत सहयोगाने 'दि इंडिया मँग्रोव्‍ह्ज कोलिशन'ची घोषणा

 

गोदरेज अॅण्‍ड बॉईसकडून आंतरराष्‍ट्रीय खारफुटी परिसंस्‍था संवर्धन दिनानिमित्त सीआयआय व डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूएफ इंडियासोबत सहयोगाने 'दि इंडिया मँग्रोव्‍ह्ज कोलिशन'ची घोषणा

·         इंडिया मँग्रोव्‍ह्ज कोलिशन अधिक प्रमाणात खारफुटी संवर्धनाप्रती कृतींसाठी उत्‍प्रेरकाप्रमाणे कार्य करेल

·         हा प्‍लॅटफॉर्म सर्व भागधारकांना या ब्‍ल्‍यू कार्बन इकोप्रणालींचे जतन व संरक्षण करण्‍यासाठी व्‍यासपीठ देईल

मुंबई, २६ जुलै २०२१: सागरी परिसंस्‍थेचे जतन करण्‍याप्रती असलेली कॉर्पोरेट भारताची कटिबद्धता अधिक दृढ करण्‍यासाठी आणि आंतरराष्‍ट्रीय खारफुटी परिसंस्‍था संवर्धन दिनाला साजरे करण्‍यासाठी गोदरेज अॅण्‍ड बॉईस या गोदरेज ग्रुपच्‍या प्रमुख कंपनीने आज सीआयआयचे सेंटर ऑफ एक्सलन्‍स फॉर सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट (सीआयआय-सीईएसडी) व डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूएफ इंडियासोबत सहयोगाने इंडिया मँग्रोव्‍ह्ज कोलिशनच्‍या लाचची घोषणा केली. हा नवीन उपक्रम सीआयआय सदस्‍य कंपन्‍यांमधील सहयोगाला चालना देईल आणि संशोधन व नवोन्‍मेष्‍काराच्‍या माध्‍यमातून खारफुटींचे व्‍यवस्‍थापन व संवर्धनासाठी नवीन सोल्‍यूशन्‍सचा शोध घेण्‍यामध्‍ये मदत करेल.

खारफुटीसारखी सागरी वने वाढत्‍या जा‍गतिक तापमानवाढ समस्‍येचे, तसेच अनेकांचे जीवन व उदरनिर्वाहावर परिणाम करत असलेल्या जगभरातील वादळ व चक्रीवादळासारख्‍या इतर प्रतिकूल हवामान घटनांचे निर्मूलन करण्‍यासाठी प्रमुख सोल्‍यूशन ठरत आहेत. उत्‍सर्जित होणारे कार्बन मोठ्या प्रमाणात शोषून घेण्‍याची क्षमता असल्‍यामुळे खारफुटींना 'ब्ल्यू कार्बन' देखील म्‍हटले जाते. खारफुटी वनांमध्‍ये प्रदेशीय वनांच्‍या तुलनेत पाच पट कार्बन शोषून घेण्‍याची क्षमता असल्‍याचे सिद्ध झाले आहे, शिवाय त्‍यांच्‍यामध्‍ये हजारो वर्षे कार्बनला वेगळे ठेवण्‍याची किंवा त्‍यावर नियंत्रण ठेवण्‍याची देखील क्षमता आहे. जगाला २०५० पर्यंत जागतिक तापमानवाढीची मर्यादा १.५ अंशपर्यंत आणण्‍याचे ध्‍येय संपादित करायचे असेल तर खारफुटीसारखी ब्‍ल्‍यू कार्बन परिसंस्‍था कार्बन शोषून घेण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतील.

इंडिया मँग्रोव्‍ह्ज कोलिशन हे सीआयआयच्‍या इंडिया बिझनेस अॅण्ड बायोडायव्‍हर्सिटी इनिशिएटिव्‍ह (आयबीबीआय) अंतर्गत अद्वितीय उद्योगक्षेत्र-केंद्रित व्‍यासपीठ आहे. हे व्‍यासपीठ ब्‍ल्‍यू कार्बन परिसंस्‍थेच्‍या महत्त्वानुसार बहु-भागधारक दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून भारतीय समुद्रीतटावरील खारफुटींचे मोठ्या प्रमाणात संवर्धन व वृक्षारोपणाला पाठिंबा देण्‍यासोबत चालना देईल.

इंडिया मँग्रोव्‍ह्ज कोलिशनच्‍या लाचबाबत बोलताना गोदरेज अॅण्‍ड बॉईसचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक जमशेद एन. गोदरेज म्‍हणाले, ''गोदरेज अॅण्‍ड बॉईससोबत सीआयआय व डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूएफ इंडिया अनेक वर्षांपासून सहयोगाने काम करत संवर्धन व जैवविविधतेला चालना देत आले आहेत. वातावरणीय बदलांमुळे दररोज मोठे धोके निर्माण होत असताना आमचा दृढ विश्‍वास आहे की, खारफुटी वनांसारख्‍या प्रमुख ब्‍ल्‍यू कार्बन परिसंस्‍थेचे संवर्धन व जतन करण्‍यावर अधिक लक्ष केंद्रित करण्‍यासाठी सर्व भागधारकांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍याची हीच योग्‍य वेळ आहे. इंडिया मँग्रोव्‍ह्ज कोलिशन जलद जागरूकतेचा प्रसार करण्‍यामध्‍ये मदत करेल आणि लोकांना आमच्‍या पॅरिस क्‍लायमेट ध्‍येयांची जाणीव करून देण्‍यासोबत मोठ्या वातावरणीय धोक्‍यांपासून मुंबईसारख्‍या असुरक्षित सागरी किनारपट्टी शहरांचे संरक्षण करण्‍यामधील खारफुटींच्‍या वाढत्‍या महत्त्वाबाबत जागरूक करेल.''

सीआयआयच्‍या उप महासंचालक सीमा अरोरा म्‍हणाल्‍या, ''स्‍पर्धात्‍मक व स्थिर उद्योगक्षेत्राने भारताच्‍या भावी विकासामध्‍ये अग्रणी भूमिका घेतली पाहिजे, तसेच जागतिक अर्थव्‍यवस्‍थेच्‍या उदयोन्‍मुख परिवर्तनामध्‍ये प्रमुख भूमिका बजावली पाहिजे. व्‍यवसाय, समाज व शासन या सर्व स्‍तरांवर निर्णय घेताना निसर्गाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक असेल. सीआयआयने अशा परिसंस्‍थेच्‍या संवर्धनांमध्‍ये सखोलपणे कार्य करणा-या गोदरेज अॅण्‍ड बॉईस व डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूएफ इंडिया सारख्‍या कंपन्‍यांसोबत सहयोग केला आहे. सहयोगाने ते 'नवीन विश्‍वासाठी भारताची निर्मिती'करिता स्‍पर्धात्‍मकता, विकास, स्थिरता व तंत्रज्ञानाला चालना देण्‍याकरिता समन्‍वय व प्रबळ संबंधाच्‍या माध्‍यमातून सर्व कंपन्‍यांना एकत्र आणण्‍यामध्‍ये मुख्‍य भूमिका बजावतील. या मोहिमेचा भाग म्‍हणून आम्‍ही मँग्रोव्‍ह कन्‍झर्वेशनच्‍या एकीकरणाच्‍या माध्‍यमातून नैसर्गिक व वातावरणीय सकारात्‍मक उपस्थिती निर्माण करण्‍याला चालना देण्‍यासाठी व्‍यवसाय, तज्ञ व प्रमुख भागधारकांसोबत सहयोगाने व समुपेदशनासह कार्य करत आहोत. यामुळे भारताला यूएन डिकेड ऑफ इकोसिस्टिम रिस्‍टोरेशनप्रती योगदान देण्‍यासोबत त्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहण्‍याची देखील संधी मिळते.'' 

डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूएफ इंडियाचे संचालक डॉ. रवी सिंग म्‍हणाले, ''अधिक प्रमाणात सागरीक्षेत्र असलेल्‍या या देशामध्‍ये जलद पुनर्निमिती व सुधारणा करण्‍याची क्षमता पाहता आम्‍ही खारफुटी संवर्धनाप्रती पुरेसे प्रयत्‍न केले आहेत. आपल्‍याला २०३० पर्यंत खारफुटींचे संवर्धन सारख्‍या लक्ष्‍यांवर फोकस देण्‍याची, तसचे यादिशेने सहयोगाने काम करण्‍याची गरज आहे. सुंदरबनांच्‍या संवर्धन कार्यामध्‍ये सामील असलेल्‍या डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूएफने गतकाळात गोदरेजसोबत कार्य केले आहे. आयबीबीआयची सदस्‍य असल्‍यामुळे कंपनीचा विश्‍वास आहे की, हा सहयोग उद्देश संपादित करण्‍यामध्‍ये प्रभावी ठरेल.'' 

अर्थपूर्ण माहिती देण्‍यासाठी आणि खारफुटी संवर्धनाला चालना देण्‍यासाठी सदस्‍यांना आधुनिक तंत्रांचा अवलंब करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी इंडिया मँग्रोव्‍ह्ज कोलिशनचा शासन, शैक्षणिक संस्‍था आणि वातावरणीय बदलावर लक्ष केंद्रित करणा-या इतर संस्‍थांमधील तज्ञांसोबत संलग्‍न होत आधुनिक वैज्ञानिक व तंत्रज्ञान विकास करण्‍याचा मनसुबा आहे.

इंडिया मँग्रोव्‍ह्ज कोलिशन माहितीपूर्ण सभा संमेलनासह सादर करण्‍यात आले. या संमेलनाचे अध्‍यक्षस्‍थान इंडो-जर्मन बायोडायव्‍हर्सिटी प्रोग्राम गिझचे संचालक डॉ. रविंद्र सिंग यांनी भूषवले आणि या संमेलनामध्‍ये क्षेत्रातील प्रमुख भागधारकांनी सहभाग घेतला- जसे मँग्रोव्‍ह सेल महाराष्‍ट्राचे एपीपीसीएफ डॉ. विरेंद्र तिवारी, एमओईएफअॅण्‍डसीसीचे अतिरिक्‍त सचिव श्री. रवी अग्रवाल, डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यू इंडियाचे संचालक डॉ. रवी सिंग, तसेच गोदरेज अॅण्‍ड बॉईसच्‍या कार्यकारी संचालक श्रीमती न्‍यारिका होळकर, सीआयआय सीईएसडीच्‍या उप महासंचालक श्रीमती. सीमा अरोरा.  

इंडिया मँग्रोव्‍ह्ज कोलिशनच्‍या लाच प्रसंगी चर्चा करण्‍यात आलेल्‍या प्रमुख विषयांमध्‍ये वातावरणीय ध्‍येयांची पूर्तता करण्‍यासाठी संशोधन व खारफुटीच्‍या महत्त्वाबाबत अर्थपूर्ण माहिती, तसेच व्‍यवसाय क्षेत्रामधील प्रमुख भागधारकांचा समूह, केंद्र, राज्‍य व स्‍थानिक प्रशासकीय तज्ञ, एनजीओ, संशोधक व नागरिकांना एकत्र आणण्‍यासाठी आवश्‍यक सर्वांगीण आराखड्याचा समावेश होता. यामुळे सागरी किनारपट्टीवर स्थिरता निर्माण करण्‍यासाठी आणि युनायटेड नेशन्‍स डिकेड ऑन इकोसिस्टिम रिस्‍टोरेशन थीम एकीकृत करण्‍यासाठी, तसेच भारताच्‍या सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट गोल्‍स (एसडीजी) कटिबद्धतेप्रती योगदान देण्‍यासाठी परिभाषित उद्दिेष्‍टे, कृती आराखडा, उपक्रम, खारफुटी संशोधनासाठील लक्ष्‍य, ऑन-साइट संवर्धन, जागरूकता, धोरणात्‍मक उपाययोजना आखत व्‍यावहारिक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्‍यामध्‍ये मदत होईल. इंडिया मँग्रोव्‍ह्ज कोलिशनअंतर्गत जीअॅण्‍डबीसोबत सीआयआय व डब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यूएफ इंडिया सदस्‍यांसाठी जागरूकता निर्माण सत्रांच्‍या मालिकेचे आयोजन करतील, तसेच भारतामध्‍ये दीर्घकाळापर्यंत खारफुटी संवर्धनाला पाठिंबा देण्‍यासाठी एकीकृत दृष्टिकोनाकरिता नवीन विचारसरणी निर्माण करण्‍याच्‍या प्रक्रियेला सुरूवात करतील.

गोदरेज अॅण्‍ड बॉईसचे (जीअॅण्‍डबी) औद्योगिक विकास संतुलन करण्‍यासोबत निसर्गाचे संवर्धन करण्‍याप्रतीचे अग्रणी प्रयत्न १९४० मध्‍ये दिवगंत सोहरबजी गोदरेज व नौरोजी गोदरेज यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत सुरू झाले. मुंबईतील विक्रोळीपासून ठाण्‍याच्‍या खाडीच्‍या पश्चिमी किनारपट्टीपर्यंत पसरलेल्‍या खारफुटींचे संवर्धन करण्‍याप्रती असलेल्‍या या प्रयत्‍नांना अधिक चालना देण्‍यासाठी १९८५ मध्‍ये सूनाबाई पिरोजशा गोदरेज फाऊंडेशनची स्‍थापना करण्‍यात आली. खारफुटी क्षेत्राखाली असलेल्‍या आसपासच्‍या सागरी परिसंस्‍थेच्‍या संवर्धनाप्रती प्रयत्‍नांना अधिक चालना देण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यासाठी १९८५ मध्‍ये प्रतिष्ठित ओर्नीथोलॉजिस्‍ट (पक्षीशास्‍त्रज्ञ) दिवंगत डॉ. सलीम अली, प्रतिष्ठित वनस्‍पतीशास्‍त्रज्ञ ए. के. गांगुली आणि प्रतिष्ठित वैज्ञानिक डॉ. होमी भाभा सारख्‍या प्रतिष्ठित संस्‍थापकीय सदस्‍यांसह सूनाबाई पिरोजशा गोदरेज मरिन इकोलॉजी सेंटरची देखील स्‍थापना करण्‍यात आली.

जीअॅण्‍डबी आणि गोदरेज फाऊंडेशन्‍सद्वारे संरक्षण करण्‍यात येणारी खारफुटी ही १९९७ मधील भारताची पहिली ISO 14001 प्रमाणित वनक्षेत्रे आहेत. या प्रमाणानाने संवर्धन उपक्रमांसाठी वेळेच्‍या बंधनाचे पालन, सर्वोत्तम कामगिरी व लक्ष्‍यांची खात्री दिली आहे. समस्‍यांवर समर्पित फोकस देण्‍याच्‍या खात्रीसाठी गोदरेज अॅण्‍ड बॉईसने कुशल व्‍यावसायिक असलेली समर्पित वेटलॅण्‍ड्स मॅनेजमेंट सर्विसेस (डब्‍ल्‍यूएमएस) संस्‍थेची स्‍थापना केली आहे. कंपनी शैक्षणिक संशोधनाला चालना, संवर्धनाला चालना आणि या ब्‍ल्‍यू कार्बन परिसंस्‍थेच्‍या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण या तीन दीर्घकालीन धोरणांच्‍या माध्‍यमातून लक्षणीय संवर्धन व नवनवीन उपक्रम राबवत आली आहे. विविध भागधारकांसह काम करत डब्‍ल्‍यूएमएस टीम समर्पित मँग्रोव्‍ह्ज मोबाइल अॅप, ऑनलाइन वेबिनार्स, स्‍टोरी बुक्‍स, पोस्‍टर प्रदर्शनांचा वापर करत ऑन-साइट व ऑफ-साइट उपक्रमांच्‍या माध्‍यमातून मागील सहा वर्षांमध्‍ये सागरी किनारपट्टी क्षेत्रांवर राहणा-या जवळपास ६०,००० व्‍यक्‍तींशी संलग्‍न झाली आहे आणि प्रादेशिक भाषांमधील पोहोचच्‍या माध्‍यमातून जागरूकता निर्माण करण्‍याच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये www.mangroves.godrej.com वर मराठीमध्‍ये मँग्रोव्‍ह क्विझ सादर केले आहे. सूनाबाई पिरोजशा गोदरेज फाऊंडेशनने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेसाठी दक्षिणेकडे जवळपास ८० एकर जागेवर अतिरिक्‍त खारफुटी वृक्षारोपणाची योजना आखण्‍यासोबत अंमलबजावणी देखील केली आहे. भारतामधील मोठ्या प्रमाणातील खारफुटी वृक्षारोपणासाठी हा अद्वितीय यशस्‍वी सार्वजनिक-खाजगी सहयोग होता.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App