बँक ऑफ बडोदाचे आर्थिक वर्ष 2022च्या पहिल्या तिमाहीचे निकाल

 बँक ऑफ बडोदाचे आर्थिक वर्ष 2022च्या पहिल्या तिमाहीचे निकाल


मुंबई, 07 ऑगस्ट, 2021:-


बँकेने रु.1209 कोटी इतका निव्वळ नफा नोंदवला आहे. व्याजातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नामध्ये (एनआयआय) गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेने या वर्षीच्या तिमाहीमध्ये (YoY) 15.8% वाढ होऊन ते रु.7,892 कोटी इतके झाले आहे. परिणामी, आरओएमध्ये 0.42% आणि आरओई 8.63% इतकी वाढ झाली आहे. ऑपरेटिंग नफ्यात 41.2% इतकी घसघशीत वाढ होऊन ती रु.5,707 कोटी इतकी झाली आहे. खर्चाशी उत्पन्नाचे गुणोत्तर प्रमाण 47.45% खाली येऊन गेल्या वर्षीच्या तुलनेने 574 बीपीएसची घट झाली आहे. एकूण एनपीए स्थिती गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये 9.39% होती, त्यात सुधारणा होऊन या कालावधीतील एकूण एनपीए स्थिती 8.86% आहे. बँकेचा कॅपिटल अॅडिक्वसी रेश्यो (सीआरएआर) वाढून 15.4% झाला आहे. जागतिक पातळीवरील निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) 3% वाढून ते 3.04% झाले आहे. स्थानिक एनआयएम 3.12% आहे. बँकेने त्यांच्या लोन बुकची दिशा बदलून जास्त उत्पन्न देणाऱ्या सेगमेंट्सवर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षीत ऑरगॅनिक रिटेल लोन्समध्ये 11.8% वाढ झाली आहे. रिटेल कर्जांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेने ऑटो लोन्समध्ये 25.0% आणि वैयक्तिक कर्जांमध्ये 19.5% वाढ झाली. सोन्यावरील कर्जांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेने 37.7% वाढ झाली. बँकेने त्यांचा डिपॉझिट्सवरील खर्च 103 बीपीएस इतका कमी करून तो 3.92% वर आणला. गेल्या वर्षीच्या तुलनेने कासा (CASA) डिपॉझिट्समध्ये 12.7% वाढ झाली आणि डोमेस्टिक कासा रेश्यो जो गेल्या वर्षी 39.49% होता, तो वाढून या वर्षी 43.21% इतका झाला, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेने ही 372 बीपीएस इतकी वाढ आहे.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App