छोट्या व्यावसायिकांच्या डिजीटल रुपांतराला अधिक चालना देण्यासाठी एअरटेलकडून गुगल क्लाउड आणि सिस्कोच्या संयुक्त भागिदारीतून एअरटेल ऑफिस इंटरनेटची घोषणा.

 छोट्या व्यावसायिकांच्या डिजीटल रुपांतराला अधिक चालना देण्यासाठी एअरटेलकडून गुगल क्लाउड आणि सिस्कोच्या संयुक्त भागिदारीतून एअरटेल ऑफिस इंटरनेटची घोषणा.


सुरक्षित कनेक्टिव्हिटी आणि उत्पादकता टूल्ससह सर्वसमावेशक एंटरप्राइज ग्रेड सोल्युशन


मुंबई, 7 ऑगस्ट 2021 : भारतातील प्रमुख कम्युनिकेशन्स सोल्यूशन्स प्रोव्हायडर असणार्‍या भारती एअरटेल म्हणजेच एअरटेलने आज एअरटेल ऑफिस इंटरनेटची घोषणा केली. या माध्यमातून छोटे व्यावसायिक, एसओएचओ आणि टेक स्टार्ट अप्सच्या प्राथमिक टप्प्यांसाठी आवश्यक वाढत्या डिजीटल कनेक्टिव्हिटीचा विचार करुन सर्वसमावेशक एंटरप्राइज ग्रेड सोल्युशन उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होणार आहे.


सध्या भारतातील विकसनशील व्यवसायांना कधी नव्हे इतकी विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी आणि डिजीटल उत्पादकता टूल्सची गरज भासत आहे. यामुळे त्यांना कार्यप्रदर्शन, कामाचा वेग वाढवून ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यास मदत मिळू शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच सोईस्कर व्यवसायिक संबंधामधून त्यांना हे सोल्यूशन्स हवे असतात.


एअरटेल ऑफिस इंटरनेटने याच व्यावसायिक गरजांचा विचार करुन सुरक्षित आणि उच्च गतीची डेटा कनेक्टिव्हिटी, कॉन्फरंसींग आणि व्यावसायिक उत्पादकता टूल्स देउ केले आहेत. हे सर्व एक प्लॅन आणि एका बिलासोबत सर्वसमावेश सोल्युशन म्हणून उपलब्ध आहेत.


अनलिमिटेड लोकल/एसटीडी कॉलिंगसह 1 जीबीपीएस वेगाची प्रमाणबध्द एफटीटीएच ब्रॉडबँड सेवा.

अतिवेगवान आणि भरवशाची कनेक्टिव्हिटी तसेच सिस्को आणि कॅस्परस्कीच्या माध्यमातून बिल्ट इन एंटरप्राइज ग्रेड सुरक्ष. जी दुर्भावनापूर्ण आणि अनावश्यक डोमेन्स, व्हायरसेस, क्रिप्टो लॉकर्स आणि हल्ले ब्लॉक करुन टाकते.

सर्व प्रकारच्या व्यावसायिक ईमेल कम्युनिकेशनसाठी जीमेल वापरता यावा म्हणून कॉम्प्लिमेंटरी गुगल वर्कस्पेस लायसन्सेस. यासोबतच गुगलकडून उत्पादकता आणि सहकार्याच्या टूल्सची संपूर्ण श्रेणी.

व्हिडिओ कॉन्फरंसींगची वाढती मागणी लक्षात घेता एअरटेल ऑफिस इंटरनेटकडून मोफत एअरटेल ब्लूजिन्स लायसनही प्रदान केले जात आहे. यामुळे एचडी क्वालिटीचे अमर्यादित आणि सुरक्षित कॉन्फरंसींग करणे शक्य होईल.

व्यवसायांना एकाच ठिकाणी या सर्व सेवा मॅनेज करण्यासाठी डिजीटल सेल्फ सर्व पोर्टल.

स्टॅटिक आयपी आणि पॅरलल रिंगींगसारख्या अ‍ॅड ऑन सेवांच्या श्रेणींसह उपल्ब्ध प्लॅन्स 999 रुपयांपासून सुरु.

अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या. https://www.airtel.in/business/b2b/broadband-internet/

याबाबत अधिक माहिती देताना एअरटेल बिझनेसचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चित्कारा यांनी सांगितले की, “कोविड साथरोगामुळे सर्व प्रकारच्या व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर डिजीटल रुपांतर होत आहे. अशा प्रकारे वृध्दींगत होत असणार्‍या व्यवसायांना त्यांच्या डिजीटल वाटचालीत एका विश्वासू साथीदाराची गरज आहे जो अनेक प्रकारच्या सेवा प्रदान करुन किचकट भागिदार्‍यांऐवजी एकाच सुलभ मार्गाने आवश्यक ते सहकार्य करु शकेल. या दिशेने एअरटेलने आपल्या एअरटेल ऑफिस इंटरनेटच्या माध्यमातून आपला नाविण्यपूर्ण अविष्कार पुढे आणला आहे. भारतीय बाजारपेठ आणि कामाच्या पध्दतींचा प्रामुख्याने विचार करुन एअरटेलने आपले नेटवर्क जागतिक दर्जाच्या इको सिस्टीमसोबत प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.”


गुगल क्लाउड इंडियाचे कार्यकारी संचालक विक्रमसिंग बेदी यांनी सांगितले की, “भारतामधील टेलिकम्युनिकेशन फर्मस विविध प्रकारच्या टूल्सची विस्तृत श्रेणी प्रदान करीत आहेत, जे येथील व्यवसायांना क्लाउडमध्ये त्यांचे डिजीटल रुपांतर करण्यास मदत करतात. गुगल वर्कस्पेसशी सहयोग आणि उत्पादकता टूल्ससोबत एअरटेलच्या मजबूत पॅन इंडिया कनेक्टिव्हिटी सोल्युशन्समुळे भारतातील लहान व्यवसायांना वृध्दींगत होण्यास मोठ्या प्रकारे मदत होउ शकेल.”


सिस्को इंडिया आणि सार्कच्या अध्यक्ष डेझी चितलपिल्ली यांनी सांगितले की, “डिजीटल व्यवसायांच्या वाढत्या विस्तारासोबतच प्रत्येक व्यावसायिकासाठी सायबर सुरक्षा हे एक खूप मोठे आव्हान बनत चालले आहे. प्रत्येक आकाराच्या व्यवसायामुळे हे आव्हान दिसून येते. मर्यादित संसाधने आणि गुंतवणूक असणार्‍या छोट्या व्यवसायांपुढेही हे कठिण आव्हान बनत चालले आहे. लहान व्यवसायांसाठी एंटरप्राइज ग्रेड सुरक्षा देण्याच्या समान दृष्टीकोनातून आमची एअरटेलसोबतची भागिदारी साकारत आहे. आम्ही एआय आणि ऑटोमेशनमधून ग्राहकांना त्यांचा व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी अतिशय प्रभावशाली सहकार्य करीत आहोत.”


 


============================

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App