व्हॅल्व्होलीन कमिन्सद्वारे कोव्हिड केअर सेंटरद्वारे वैद्यकीय समुदायाला सहाय्य

 व्हॅल्व्होलीन कमिन्सद्वारे कोव्हिड केअर सेंटरद्वारे वैद्यकीय समुदायाला सहाय्य
 
अंबरनाथमध्ये कोव्हिड- केअर सुविधेच्या शुभारंभासाठी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीसोबत भागीदारी

 



ठाणे: 18 ऑगस्ट 2021, व्हॅल्व्होलीन कमिन्स प्रायव्हेट लिमिटेड (“व्हॅल्व्होलीन कमिन्स”) ने आपल्या कॉरपोरेट सामाजिक जवाबदारीचा (“सीएसआर”) भाग म्हणून हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी ह्या एनजीओसोबतच्या भागीदारीसह अंबरनाथमध्ये एक 100- बेडची कोव्हिड केअर सुविधा सुरू केली आहे. परिसरातील प्रसिद्ध अशा दुबे सरकारी रुग्णालयातील एक भाग म्हणून ही देखभाल सुविधा असणार आहे.
 
व्यापक प्रमाणात संशोधन केल्यानंतर व्हॅल्व्होलीन कमिन्सला असे आढळले की, ह्या भागात राहणारा समुदाय सरकारी रुग्णालयांमध्ये जाणे पसंत करतो आणि वैद्यकीय गरजांसाठी त्या भागातील सुमारे 50% रुग्ण दुबे हॉस्पिटलमध्ये जात होते. जवाबदार कॉरपोरेट घटक म्हणून, व्हॅल्व्होलीनने दुबे हॉस्पिटलच्या सीएमओंच्यासोबत चर्चा केल्यान्ंतर तिथे सहाय्य करण्याचा निर्णय घेतला व आयव्ही स्टँडस आणि ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्सने सज्ज अशा 100- बेड सुविधेला तिथे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. त्यासह तिथल्या वैद्यकीय कर्मचा-यांना पीपीएस आणि स्वच्छता किटससुद्धा देण्यात आले.
 
ह्या कार्यक्रमामध्ये व्हॅल्व्होलीन कमिन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संदीप कालिया, दुबे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश आणि इतर अनेक वरिष्ठ अधिका-यांसह हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीचे रिजनल डायरेक्टर श्री जॉन मॅथ्यू हे उपस्थित होते.
 
व्हॅल्व्होलीन कमिन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संदीप कालिया ह्यांनी कोव्हिड विरोधातील लढ्यामध्ये वैद्यकीय व्यावसायिकांच्या कटिबद्धतेचे कौतुक केले व तिचा गौरव केला आणि म्हंटले, “गेल्या दिड वर्षापासून वैद्यकीय समुदाय शौर्य दाखवत ह्या लढाईमध्ये लढत आहे. आपल्या विविध उपक्रमांद्वारे त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित आणि उत्तम वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करण्याच्या   दिशेने सतत काम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” व्हॅल्व्होलीनचे वित्त संचालक श्री गौरव दंग ह्यांनी म्हंटले, “प्रत्येक मौल्यवान जीव वाचवण्यासाठी समुदाय डॉक्टरांकडे डोळे लावून बघत असतो. त्यामुळे आम्हांलाही वैद्यकीय समुदायाला शक्य त्या मार्गाने सहाय्य करण्यासाठी योगदान द्यायचे आहे.” मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. योगेश ह्यांनी ह्या सद्भावनेच्या कृतीबद्दल व्हॅल्व्होलीन कमिन्सचे आभार मानले. “ह्या भागामध्ये राहणा-या समुदायाला उपचार देण्यासाठी हे केंद्र उपयोगी ठरेल आणि ते भविष्यासाठी तयारी करेल. आमचा विश्वास आहे की, प्रत्येकाला योग्य आरोग्य देखभाल सेवा मिळणे आवश्यक असते आणि व्हॅल्व्होलीन कमिन्स ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे.”.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202