सीएससी आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशनची हातमिळवणी - वंचित वर्गातील नागरिकांना कोविड-१९ची लस मिळावी यासाठी पुढाकार

 

कृपया प्रसिद्धीसाठी

 

सीएससी आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशनची हातमिळवणी

वंचित वर्गातील नागरिकांना कोविड-१९ची लस मिळावी यासाठी पुढाकार

 

  • वयस्क व्यक्ती, दिव्यांग, झोपडपट्ट्यांमधील निवासी आणि रोजंदारी कामगारांच्या लसीकरणासाठी मोहीम राबवून कोविन पोर्टलवर लाखो व्यक्तींची नोंदणी करण्याचे लक्ष्य

 

मुंबई/नवी दिल्ली, २० ऑगस्ट, २०२१:  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या कॉमन सर्व्हिसेस सेंटर्सने वीचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभाग वोडाफोन आयडिया फाऊंडेशनसोबत हातमिळवणी केली आहे.  कोविड-१९ या जीवघेण्या विषाणूच्या विरोधात लसीकरण करवून घेण्यासाठी नागरिकांची नोंदणी करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या उपक्रमांतर्गत समाजातील दुर्बल व वंचित समुदायांच्या लसीकरणावर विशेष भर दिला जाणार आहे.

 

सीएससीचा सीएसआर आणि शिक्षण विभाग सीएससी अकॅडेमी ग्रामस्तरीय उद्यमींमार्फत देशभरात १ दशलक्ष लाभार्थींच्या लसीकरणासाठी नोंदणी व शेड्यूलिंग करेल.  वयस्क व्यक्ती, झोपडपट्टी निवासी, रोजंदारी कामगार इत्यादींपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामस्तरीय उद्यमी हे केंद्रबिंदू म्हणून कार्यरत राहतील.

 

या भागीदारीबद्दल अधिक माहिती देताना सीएससी एसपीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश त्यागी यांनी सांगितले, "नागरिकांच्या हितासाठी राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सीएससीने नेहमीच योगदान दिले आहे.  कोविन ऍपवर नागरिकांची नोंदणी करणे हा एक असा उपक्रम आहे जो सीएससीने सर्वांना सर्वसमावेशक आरोग्यसेवा पुरवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून हाती घेतला आहे.  वोडाफोन आयडिया फाऊंडेशनसोबतची भागीदारी आम्हाला देशभरातील सर्वात उपेक्षित व वंचित समुदायांपर्यंत पोहोचून लसीकरणासाठी कोविन ऍपवर त्यांची नोंदणी करण्यासाठी व कोविड-१९ विरोधात सरकार देत असलेला लढा अधिक तीव्र करण्यासाठी मदत करेल."

 

वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी आणि कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर श्री. पी बालाजी यांनी सांगितले, "समाजातील गंभीर समस्या दूर करण्यासाठी तंत्रज्ञान व नवाचार यांचा उपयोग केला गेला पाहिजे असे व्हीआयएलचे मत आहे.  सीएससीसोबत आमच्या संयुक्त प्रयत्नांमुळे त्या १० लाख ग्रामीण नागरिकांपर्यंत पोहोचता येईल ज्यांना लसीकरणाची गरज आहे.  गावांमधील वंचित समुदायांमधील नागरिक, उपेक्षित व्यक्ती आणि झोपडपट्टी निवासी या सर्वांना कोविन ऍप या एकीकृत डिजिटल आधारस्तंभावर लसीकरण नोंदणी करण्यासाठी सेवा पुरवून त्यांच्यासाठी एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध होतील अशी सुविधा निर्माण केली जावी आणि देशात लसीकरण मोहिमेचा प्रभाव वृद्धिंगत करावा हे आमचे लक्ष्य आहे."

 

या उपक्रमामध्ये अशा नागरिकांना प्राधान्य दिले जाईल जे सेवासुविधांपासून वंचित आहेत, ज्यांच्याकडे इंटरनेट/स्मार्टफोन या सुविधा नाहीत किंवा ज्यांना डिजिटल साधने वापरण्याबाबत माहिती नाही.  ग्रामस्तरीय उद्यमी या नागरिकांची थेट कोविन ऍपवर नोंदणी करतील, ऍपवरील सध्याच्या प्रक्रियेप्रमाणे त्यांचा स्थानिक लसीकरण पुरवठादारांशी संपर्क करून देतील व त्यांच्या लसीकरणासाठी दिवस, वेळ ठरवून देतील.

 

कोविन प्लॅटफॉर्मवर नोंदणीसाठी नागरिकांना एकत्र करून त्यामध्ये त्यांची मदत करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण व आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाने सीएससीची निवड केली आहे.  प्रकल्पावर नियमितपणे देखरेख करण्यासाठी एक विशेष टीम नियुक्त करण्यात आली आहे, या प्रकल्पामध्ये संपूर्ण ट्रॅकिंग सीएससी डिजिटल सेवा पोर्टलवर तयार करण्यात आलेल्या एका सेंट्रल डॅशबोर्डमार्फत केले जाईल.  यामध्ये अहवाल तयार करणे, समस्या, तक्रारी हाताळणे आणि दैनंदिन स्थितीचे ट्रॅकिंग यांचा समावेश असेल. या लिंकमार्फत लाभार्थी आपला आधार क्रमांक देऊन सीएससीकडून कोविड-१९ लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड देखील करवून घेऊ शकतात.

 

वोडाफोन आयडिया फाऊंडेशनची सीएससी अकॅडेमीसोबत दीर्घकालीन भागीदारी आहे.  आर्थिक व डिजिटल साक्षरतेचा प्रसार तळागाळापर्यंत व्हावा यासाठी ३० पेक्षा जास्त मोबाईल व्हॅन्स तैनात करण्यासाठी वोडाफोन आयडिया फाऊंडेशनने मदत केली आहे.  गेल्या वर्षीपासून या व्हॅन्स कोविड-१९ पासून बचावासाठीच्या उपाययोजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, धनधान्य वाटप इत्यादी कामांसाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात आहेत.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy