रेनो इंडियाने दक्षिण आफ्रिकेला कायगरची निर्यात सुरू केली

 रेनो इंडियाने दक्षिण आफ्रिकेला कायगरची निर्यात सुरू केली

760 रेनो कायगर कारची पहिली तुकडी चेन्नई बंदरातून दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली
नेपाळला कायगर ची निर्यात आधीच सुरू झाली आहे; लवकरच कायगरची निर्यात इंडोनेशिया, आफ्रिकेच्या इतर भागांमध्ये आणि सार्क प्रदेशातही सुरू होईल

 
मुंबई,2 ऑगस्ट 2021:- रेनॉल्ट इंडियाने आपल्या सब -4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही रेनॉल्ट कायगरची दक्षिण आफ्रिकेला निर्यात सुरू केली आहे. जागतिक स्तरावर आणण्यापूर्वी भारतीय ग्राहकांसाठी रेनॉल्ट कायगर भारतात विकसित आणि उत्पादित केली गेली आहे. रेनॉल्टने भारतात लॉन्च केलेल्या क्रांतिकारी उत्पादनांच्या लाइन-अप मध्ये ही सर्वात नवीन भर आहे. रेनॉल्ट कायगरने स्वतःला एक आकर्षक, स्मार्ट आणि स्पोर्टी बी-एसयूव्ही म्हणून स्थापित केले आहे.
रेनॉल्ट इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री. वेंकटराम ममिल्लापल्ले म्हणाले, “रेनॉल्ट कायगर लॉन्च झाल्यावर रेनोने भारतीय ऑटोमोबाईल मार्केटच्या सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या विभागात प्रवेश केला आहे. आजपासून दक्षिण आफ्रिकेला कायगरची निर्यात आणि ह्याच महिन्याच्या सुरुवातीला नेपाळला कायगरची निर्यात सुरू करणे हे रेनॉल्टच्या 'मेक इन इंडिया' मिशनसाठी दृढ बांधिलकी दर्शवते आहे. हे डिझाइन, अभियांत्रिकी आणि जागतिक दर्जाच्या निर्मितीमध्ये रेनोची क्षमता देखील प्रतिबिंबित करते. प्रवासी वाहनांमध्ये रेनॉल्टच्या विविध ऑफरना दक्षिण आफ्रिकेतील लोकांकडून सातत्याने चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आमची नवीनतम ऑफर, रेनॉल्ट कायगर, दक्षिण आफ्रिकेतील आमच्या विद्यमान पोर्टफोलिओला त्याच्या वेगळ्या एसयूव्ही लुक, अधिक जागा, स्मार्ट वैशिष्ट्ये आणि जागतिक दर्जाच्या मजबूत डिझाइनसह अधिक मजबूत करेल. ”
ते पुढे म्हणाले, “आम्ही लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारात कायगर्सची निर्यात सुरू करू. अशा बाजारपेठांमध्ये इंडोनेशिया, आफ्रिकेचे इतर भाग आणि सार्क प्रदेश यांचा समावेश आहे. त्याच वेळी, आम्ही भारतातील ग्राहकांची संख्या देखील वाढवत राहू.”

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार