पेटीएमकडून एलपीजी सिलिंडर बुकिंगवर जवळपास २७०० रूपयांची कॅशबॅक ऑफर; युजर्स आता सिलिंडर बुक करून पुढील महिन्‍यामध्‍ये रक्‍कम भरू शकतात


पेटीएमकडून एलपीजी सिलिंडर बुकिंगवर जवळपास २७०० रूपयाची कॅशबॅक ऑफर; युजर्स आता सिलिंडर बुक करून पुढील महिन्‍यामध्‍ये रक्‍कम भरू शकतात 


 

भारताचे आघाडीचे डिजिटल आर्थिक सेवा प्रदाता व्‍यासपीठ पेटीएमने आज एलपीजी सिलिंडर बुकिंगवर आकर्षक कॅशबॅक व इतर रिवॉर्डसची घोषणा केली. नवीन युजर्स '३ पे २७००' कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊ शकतील, जेथे त्‍यांना सलग ३ महिन्‍यांच्या पहिल्‍या बुकिंगकरिता जवळपास ९०० रूपयांची खात्रीदायी कॅशबॅक मिळेल. विद्यमान युजर्सना प्रत्‍येक बुकिंगवर खात्रीदायी रिवॉर्ड व जवळपास ५००० कॅशबॅक पॉइण्‍ट्स मिळतील, जे अव्‍वल ब्रॅण्‍ड्सकडे अभूतपूर्व डील्‍स व गिफ्ट वाऊचर्ससाठी रिडिम करता येऊ शकतात.  

ही '३ पे २७००' कॅशबॅक ऑफर इंडेन, एचपी गॅस व भारत गॅस या तिन्‍ही प्रमुख एलपीजी कंपन्‍यांच्‍या सिलिंडर बुकिंगवर लागू आहे. ग्राहकांसाठी पेटीएम पोस्‍टपेड म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पेटीएम नाऊ पे लेटर प्रोग्रॅममध्‍ये नोंदणी करत बुक केलेल्‍या सिलिंडरसाठी रक्‍कम पुढील महिन्‍यामध्‍ये भरण्‍याचा पर्याय देखील असेल.  

नुकतेच कंपनीने युजर्सना त्‍यांच्‍या गॅस सिलिंडर्सच्‍या डिलिव्‍हरीवर देखरेख ठेवणा-या, तसेच रिफिल्‍ससाठी ऑटोमेटेड इंटेलिजण्‍ट रिमांइडर्स देणा-या नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्यांची भर करत सिलिंडर बुकिंग अनुभवामध्‍ये वाढ केली. पेटीएमच्‍या त्रासमुक्‍त व सुलभ बुकिंग प्रक्रियेने एलपीजी सिलिंडर बुकिंग अत्‍यंत सुलभ केले आहे. युजरला फक्‍त एवढेच करायचे आहे की, 'बुक गॅस सिलिंडर' टॅबवर जाऊन गॅस प्रदाता निवडावे, मोबाइल क्र. / एलपीजी आयडी/ग्राहक क्र. प्रविष्‍ट करावा आणि त्‍यानंतर पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्डस व नेट बँकिंग्‍स अशा त्‍यांच्‍या पसंतीच्‍या पेमेण्‍ट मोडचा वापर करून पेमेण्‍ट करावे. जवळच्‍या गॅस एजन्‍सीकडून सिलिंडर नोंदणीकृत पत्त्यावर डिलिव्‍हर केला जातो.  

पेटीएमचे प्रवक्‍त म्‍हणाले, ''आमचा देशातील सर्वांसाठी युटिलिटी पेमेण्‍ट्स एकसंधी व पूर्णत: डिजिटल करण्‍याचा मनसुबा आहे. सर्व युटिलिटीजमध्‍ये भारतीय कुटुंब एलपीजी सिलिंडर बुकिंगसाठी सर्वाधिक खर्च करतात. आम्‍ही सर्व युजर्ससाठी या युटिलिटीचे डिजिटल पेमेण्‍ट्स लाभदायी बनवण्‍याशी कटिबद्ध आहोत. काळासह एलपीजी सिलिंडर रिफिल्‍ससाठी ऑनलाइन बुकिंग व पेमेण्‍टचा वापर करणा-या युजर्सच्‍या संख्‍येमध्‍ये प्रचंड वाढ होताना दिसण्‍यात येत आहे. अनेक नवीन ऑफर्स व सुधारित यूआयसह आम्‍ही नवीन युजर्सपर्यंत पोहोचण्‍याचा आणि आमच्‍या विद्यमान युजर्ससोबतचा वारंवार व्‍यवहार वाढवण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत.''  

पेटीएमने गेल्‍या वर्षी एचपी गॅससोबत आणि त्‍यानंतर इंडियन ऑईलचे इंडेन आणि भारत गॅससोबत सहयोग करत 'बुक ए सिलिंडर' सेवा सुरू केली. त्रासमुक्‍त व सुलभ बुकिंग प्रक्रियेमुळे व्‍यासपीठावर वारंवार व्‍यवहार करणा-या ग्राहकांच्‍या संख्‍येमध्‍ये वाढ होताना दिसत आहे. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24