ग्लेनमार्क फार्माने आरोग्यसेवा योद्ध्यांच्या सन्मानार्थ जागतिक विक्रम
ग्लेनमार्क फार्माने आरोग्यसेवा योद्ध्यांच्या सन्मानार्थ जागतिक विक्रम
मुंबई, २० ऑगस्ट २०२१ --- ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने १८ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईत प्राइड ऑफ इंडिया या सर्वात मोठ्या पिन बॅज वाक्यासाठी जागतिक विक्रम स्थापित केला. हे वाक्य तयार करण्यासाठी एकूण २२ ,३७३ भारतीय ध्वज पिन बॅज वापरण्यात आले. देशभरातील १५,००० हून अधिक मधुमेह शास्त्रज्ञ, हृदयरोग तज्ञ आणि चिकित्सकांनी यात सहभाग घेतला आणि आमच्या आघाडीच्या योद्ध्यांचा सन्मान करणाऱ्या या अनोख्या उपक्रमाला पाठिंबा दिला.
हे यश आमच्या आरोग्यसेवा योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी आहे, जे कोविड -१९ विरूद्ध आपल्या राष्ट्राच्या लढाईत आघाडीवर आहेत, आणि त्यांचे जीवन धोक्यात घालून आमच्या जीवनाचे रक्षण करतात!
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स भारतातील मधुमेह उपचार क्षेत्रात अग्रणी आहे. ही नवीनतम, पेटंट संरक्षित आणि जागतिक स्तरावर संशोधित सोडियम ग्लुकोज को-ट्रांसपोर्टर-२ (एसजीएलटी2) इन्हिबिटर रेमोग्लिफ्लोजि़न इटाबोनेट या ब्रँडने रेमोझेन लाँच करणारी जगातील पहिली कंपनी आहे तिने बाजारामध्ये रेमोझेन -एम, रेमोझेन व्ही सारखे अनेक ब्रँडचा विस्तार सुरू केला आहे. ग्लेनमार्क कंपनी आपल्या फेविपिरविर ब्रँड फॅबिफ्लू सह देशातील कोव्हीड-१९ विरूद्धच्या लढाईतही आघाडीवर आहे.
Comments
Post a Comment