डॉ. सदानंद मोरे लिखित स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा घेतलेला वेध 'लोकमान्य ते महात्मा' आता ऐका स्टोरीटेलवर!



डॉ. सदानंद मोरे लिखित स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा घेतलेला वेध 'लोकमान्य ते महात्मा' आता ऐका स्टोरीटेलवर!



विसाव्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तेजस्वी पर्व. या पर्वात स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्वाची मशाल लोकमान्य टिळकांच्या हातातून महात्मा गांधींच्या हाती सोपवली गेली. या महत्वपूर्ण घडामोडीचा विश्लेषक आढावा घेणारा बहुमोल द्विखंडात्मक ग्रंथ म्हणजे डॉ. सदानंद मोरे लिखित 'लोकमान्य ते महात्मा'. हा अत्यंत मौल्यवान असा संपूर्ण ग्रंथ स्टोरीटेल मराठीने आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऑडिओबुकमध्ये इतिहासप्रेमी साहित्यरसिकांसाठी उपलब्ध करून दिला असून विशेष म्हणजे स्टोरीटेलने 'फ्रीडम मंथ' ही विशेष योजनाही या निमित्ताने सुरु केली आहे.


गेल्या काही दशकांत समाजसुधारक हे अलिखित पद जसे कालबाह्य़ झाले आहे, तसेच सामाजिक विचारवंतांची परंपराही खंडित झाली आहे. केवळ इतिहासाचे आकलन करण्यापेक्षा समाजातील सर्व घटकांमध्ये घडलेल्या घटना-घडामोडींचा एकत्रित विचार करण्याची क्षमता असणारे विचारवंतही एका हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढय़ाच संख्येने आहेत. त्यामध्ये अग्रणी असण्याचा मान डॉ. सदानंद मोरे यांच्याकडे जातो. गेल्या पस्तीस वर्षांमध्ये संतपरंपरेचा अभ्यास करून त्यांनी जो अन्वयार्थ लावला, तो त्यांच्यातील अभ्यासकाचे दर्शन घडवणारा आहे.


स्टोरीटेल ही जगातील सर्वाधिक ऑडिओबुक्स निर्माण करणारी आघाडीची संस्था आहे. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य उत्सवा निमित्त 'स्टोरीटेल'ने सब्स्क्रिप्शन प्लानमध्ये ‘स्टोरीटेल सिलेक्ट फ्रीडम ऑफर’ जाहीर करून स्वातंत्र्यप्रेमी साहित्यरसिकांचा आनंद द्विगुणित केला आहे. इंग्रजीसह ११ भारतीय प्रादेशिक भाषांमधे दर्जेदार ऑडिओबुक्स निर्मितीत अग्रेसर असलेली जगविख्यात 'स्टोरीटेल' ऑडिओबुक संस्था अनोख्या पद्धतीने हा उत्सव साजरा करीत आहे. मराठीतील हजारो सर्वोत्तम पुस्तके कुठेही, कधीही ऐकण्याचे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी 'स्टोरीटेल सिलेक्ट फ्रीडम ऑफर'चा लाभ सर्वांना घेता येणार आहे. दरमहा रू.५९/- किंवा सहा महिन्यांसाठी रू.३४५/- इतक्या नाममात्र किंमतीत स्टोरीटेल अॅप ही योजना उपलब्ध झाली आहे.


'स्टोरीटेल इंडिया'चे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ, म्हणतात “आपला अमृतमहोत्सवी 'स्वातंत्र्य उत्सव' स्टोरीटेलला अविस्मरणीय करायचा आहे. महाराष्ट्राचे चिकित्सक विचारवंत जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे लिखित स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा घेतलेला वेध 'लोकमान्य ते महात्मा' हा संपूर्ण ग्रंथ आम्ही ऑडिओबुक मध्ये प्रकाशित करीत आहोत जो तुम्ही कधीही, कुठे आणि कितीही वेळा ऐकू शकणार आहात. तसेच मर्यादित काळासाठी असलेल्या 'फ्रीडम ऑफर' या विशेष योजनेचा लाभ घेऊन आपल्या मातृभाषेतील अमर्याद ऑडिओबुक्स ऐकून आपलं अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्ष संस्मरणीय करावं.”


सध्याची परिस्थिती पहाता सर्वांकडे तसा मुबलक वेळ आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या वेगवेगळया साहित्यकृती ऐकण्यासाठी ही अतिशय योग्य संधी म्हणता येईल. 'स्टोरीटेल सिलेक्ट' सब्स्क्रिप्शन प्लानचे मूल्य 'फ्रीडम ऑफर'मध्ये अनुक्रमे दरमहा रू.५९/- किंवा सहा महिन्यांसाठी रू.३४५/- इतक्या नाममात्र किंमतीत स्टोरीटेल अॅप उपलब्ध झाली असल्याने आपल्याला ‘स्टोरीटेल’ हे app डाऊनलोड करावं लागणार आहे. 'स्टोरीटेल'द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्यारसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth