जागतिक युवा दिन २०२१ निमित्त # यंग वॉरिअर्स नेक्स्ट मोहीम सादर

 जागतिक युवा दिन २०२१ निमित्त # यंग वॉरिअर्स नेक्स्ट मोहीम सादर

 
मुंबई, १३ ऑगस्ट २०२१ --आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२१ निमित्त युवा व्यवहार मंत्रालय (मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स-), संयुक्त राष्ट्रांची कार्यालये (युनिसेफ, यूएनएफपीए, यूएनडीपी, यूएनव्ही, यूएन विमन, यूएन एड्स, यूएनएचसीआर, डब्ल्यूएचओ आणि आयएलओ) आणि युवाह (भारतातील जनरेशन अनलिमिटेड) यांनी यंग वॉरिअर्स या मोहिमेचा दुसरा टप्पा म्हणजेच यंग वॉरिअर्स नेक्स्ट ही मोहीम सादर केली आहे. युवा व्यवहार विभागाच्या सचिव श्रीमती. उषा शर्मा, सायंटचे संस्थापक-अध्यक्ष आणि संचालक मंडळ सदस्य आणि युवाहचे सल्लागार मंडळ सदस्य डॉ. बीव्हीआर मोहन रेड्डी आणि इंडिया ए.आय.च्या यूएन रेसिडंट कोऑर्डिनेटर श्री. डेअड्रे बॉइड यांनी सेलिब्रेटिंग युथ इनोव्हेशन अॅण्ड रेझिलिअन्स या संकल्पनेअंतर्गत ही नवी मोहीम सादर केली आहे.
 
#यंग वॉरिअर्स ही मोहीम मे २०२१ मध्ये, कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या काळात सादर करण्यात आली. शहरी आणि ग्रामीण भारतातील १० ते १३ या वयोगटातील लाखो तरुणांनी लसीकरण मोहीम राबवणे, वंचित समुदायांना अत्यावश्यक गोष्टी मिळवून देणे, समुपदेशन, कोविड-१९ आणि लसीकरणासंदर्भात गैरसमज दूर करणे अशा प्रकारची कामे हाती घेतली. या मोहिमेला प्रचंड यश मिळाले. यातून ६.६ दशलक्ष कामे केली गेली, ७६०० हून अधिक कार्यशाळांचे आयोजन केले गेले, १४०,००० शिक्षक आणि इतर भागधारकांना सामावून घेतले गेले आणि यातून मास मीडिया कँपेनच्या माध्यमातून ५०० दशलक्षांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचता आले. भारतातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्र, यूएन संस्था, शैक्षणिक संस्था आणि नागरी संस्था अशा देशभरातील १३५० हून अधिक भागीदारांचे पाठबळ या मोहिमेला मिळाल्याने देशभरात मोहिमेला प्रचंड यश लाभले.
 
या कार्यक्रमात तरुणांना प्रोत्साहन देताना युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाच्या सचिव श्रीमती. उषा शर्मा म्हणाल्या की आपल्या देशातील तरुण बदलांचे प्रवर्तक आहेत. २१ व्या शतकातील समाज आणि कार्यस्थळांच्या वेगाने बदलणाऱ्या गरजांनुसार लागणारी साधने आणि कौशल्यांनी त्यांना सज्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. युनिसेफचे भारतातील प्रतिनिधी आणि युवाहचे सह-अध्यक्ष डॉ. यास्मिन अली हक यांनी सांगितले की , तरुणांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाला पुरक अशी आवश्यक जीवन कौशल्ये शिकण्याची संधी यंग वॉरिअर्स नेक्स्ट मुळे उपलब्ध होणार आहे. तरुणांना साध्या फोनवरून, स्मार्टफोन किंवा डीआयवाय होम किट्सच्या माध्यमातून ही कौशल्ये शिकता येतील.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth