सिडबीने सुरू केला “डिजिटल प्रयास” कार्यक्रम, उपजीपिका उद्योजकांपर्यंत पोहोचण्याचा ॲपवर आधारित उपक्रम

 सिडबीने सुरू केला “डिजिटल प्रयास” कार्यक्रम, उपजीपिका उद्योजकांपर्यंत पोहोचण्याचा ॲपवर आधारित उपक्रम


'डिजिटल प्रयास' कार्यक्रमांतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बिगबास्केटची निवड


सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) आवश्यक आर्थिक सहाय्यासाठी मदत करण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) प्रसार, वित्तसहाय्य आणि विकासासाठी काम करणाऱ्या प्रधान वित्त संस्थेतर्फे पिरॅमिडच्या सर्वात खालच्या बाजूला असलेल्या उदयोन्मुख उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी, ज्यांच्यापैकी बरेच जण न्यू टू बँक (एनटीबी) आहेत, त्यांच्यासाठी डिजिटल प्रयास हा प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे. हा ॲपवर आधारित एंड टू एंड डिजिटल कर्जवाटप टूल प्लॅटफॉर्म असून या अंतर्गत एका दिवसात कर्ज मंजुरी देण्यात येते.

 

त्याचप्रमाणे, शहरी भागांमधील महत्त्वाकांक्षी तरुणांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सिडबीने बिगबास्केट या प्रमुख ॲग्रिगेटरसोबत हातमिळवणी केली आहे. या माध्यमातून त्यांच्या देशभरातील डिलिव्हरी पार्टनर्सना समाविष्ट करून घेता येईल आणि ई-बाइक्स आणि ई-व्हॅन्स खरेदी करण्यासाठी वाजवी व्याज दरात कर्जे उपलब्ध करून देता येतील.

 

या दोन उपक्रमांचे उद्घाटन करताना आयएएस आणि वित्त सेवा विभागाचे सचिव श्री. देबाशीष पांडा यांनी, 'डिजिटल प्रयास' कार्यक्रमाच्या माध्यमातून वाजवी व्याज दराने पिरॅमिडच्या सर्वात खालच्या भागात असलेल्यांच्या आर्थिक आवश्यकतांची पूर्तता करण्यात सिडबीने बजावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली. ते म्हणाले की, सिडबी-बिगबास्केट उपक्रम ऑनलाइन माहिती साठा तयार करेल. या माध्यमातून कर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या सूक्ष्म उद्योगांसाठी कर्जे उपलब्ध होतील. याची व्याप्ती वाढविण्यासाठी सिडबीने अशा प्रकारची व्यवस्था अधिकाधिक पार्टनर संस्थांसोबत करावी, यावर त्यांनी भर दिला.


आयएअँडएएस आणि सिडबीचे व्यवस्थापकीय संचालक(सीएमडी) श्री. शिवसुब्रमण्यन रमण म्हणाले, " ॲपमुळे कर्जासाठी अर्ज केलेल्यांचे डिजिटल व इंटिग्रेटेड प्रक्रियेमध्ये लवकर ऑनबोर्डिंग होते. त्यामुळे हा प्रोग्रॅम व्यापक प्रमाणावर होतो आणि अधिक चांगल्या प्रकारे जोखीम व्यवस्थापन होऊ शकते आणि ग्राहकांच्या अधिक समाधान मिळते. पर्यावरणस्नेही ई-वाहनांची खरेदी करण्यासाठी आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल प्रोग्रॅमअंतर्गत बिगबास्केट भागीदार संस्था म्हणून लाभल्याबद्दल सिडबीला आनंद झाला आहे."


या वेळी बिगबास्केटचे सीईओ श्री. हरी मेनन म्हणाले, "या भागीदारीसाठी सिडबीने बिगबास्केटची निवड केल्याचा त्यांना आनंद आहे. कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमामुळे आमच्या शेकडो डिलिव्हरी असोसिएट्सच्या उपजीविकेवर सकारात्मक परिणाम होणार आहे आणि त्याचा समाजिक हेतूसुद्धा साध्य होणार आहे."

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202