कृषि सेतू वेब अॅपच्या माध्यमातून एनबीएचसीचे कृषी-उत्पादनांच्या डिजिटल लिलाव / व्यापार क्षेत्रात पदार्पण

 कृषि सेतू वेब अॅपच्या माध्यमातून एनबीएचसीचे कृषी-उत्पादनांच्या डिजिटल लिलाव / व्यापार क्षेत्रात पदार्पण

~  शेतकरी, व्यापारी आणि प्रोसेसर्ससाठी अॅक्चुअल प्राइस डिस्कव्हरीसह वस्तूंची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी शेती व डिजिटायझेशनच्या पॉवरने घडविणार बदल ~


मुंबई, 5 ऑगस्ट 2021 : नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्फोरेशन (एनबीएचसी) यांच्यातर्फे आज कृषी सेतू या इलेक्ट्रॉनिक अॅप्लिकेशनची घोषणा करण्यात आली. एंड-टू-एंड डिजिटाइझ्ड प्रक्रियांच्या माध्यमातून अखंडित युझर-अनुभव आणि व्यापाराच्या अंमलबजावणीच्या कामकाजातील असुविधा कमी करण्यासाठीचे कापणीनंतरच्या कृषी मूल्य साखळीतील वन-स्टॉप सोल्यूशन आहे. एनबीएचसीने कृषी उत्पादनांसाठी आधुनिक ई-बाजारपेठ तयार केली आहे. हे अॅप म्हणजे डिजिटली सक्षम लिलाव व व्यापाराचे सर्व प्रकार उपलब्ध करून देण्यासह तंत्रज्ञानावर आधारीत असलेला आमचा वारसा पुढे नेण्यासाठीच्या आमच्या प्रतिबद्धतेची निष्पत्ती आहे.

 

शेतकरी समाज आणि शेतकरी उत्पादन संघटना (एफपीओ) यांचे सबलीकरण करण्याच्या मिशनने रिमोट अॅक्सेससह लिलाव/व्यापार यांची क्षमता बांधणी करण्यासाठी ज्ञानावर आधारित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी सेतू प्रतिबद्ध आहे. हे अॅप देशभरातील खरेदीदार आणि विक्रेते यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जोडते आणि मधस्थांची संख्या कमी करून व्यवहार विनाअडथळा व सुकर करते. त्याचप्रमाणे बाजारपेठेतील घटकसंबंधांचा उपयोग करून आणि शेती, एफपीओ, सरकारी संस्था, कॉर्पोरेट्स, व्यापारी आणि प्रोसेसर्स या बाजारपेठेतील घटकांना जोडून कृषी सेतू संपूर्ण पारदर्शकतेसह सक्षम किंमत यंत्रणा तयार करते.

 

एनएचबीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. रमेश दोरायस्वामी म्हणाले, "भारतातील इंटरनेट जोडण्या ५०% पर्यंत पोहोचल्या आहेत आणि मोबाइल कनेक्शन्स भारतातील ७९% लोकसंख्येकडे आहेत. असे असताना सुलभ आणि वेगाने धावणाऱ्या नव्या डिजिटल युगात कृषी उत्पादनांचा व्यापार मोठी झेप घेण्यास सज्ज आहे. कृषी सेतू हा कृषी उत्पादनांसाठी अॅमेझॉनसारखा प्लॅटफॉर्म व्हावा अशी नवीन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या एनबीएचसीची महत्त्वाकांक्षा आहे आणि त्यांना बाजारपेठेचा अॅक्सेस, पारदर्शकता आणि कापणीपश्चात मूल्यवर्धित सेवा उपलब्ध करून देऊन त्यांच्या उत्पादनाच्या मार्केटिंगबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करून त्यायोगे शेतकरी आणि एफफीओंचे आयुष्य सुधारण्याची त्यांची इच्छा आहे.

 

एनबीएचसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि बिझनेस प्रमुख श्री. दीपक कुमार सिंग म्हणाले, "शेती, ऑटोमेशन आणि डिजिटलायझेशन यांची सांगड घालून आपल्या प्रगतीशील सुविधांच्या माध्यमातून कृषी मूल्य साखळीमध्ये बदल घडविण्यास कृषी सेतू सज्ज आहे. परिणामकारक प्रकियेवर आधारीत जोखीम मूल्यमापन व नियंत्रण आणि त्याला डिजिटल फायनान्सिंगच्या पर्यायची साथ या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म टेलर-मेड (ग्राहकाच्या गरजेनुसार) उपाययोजना

 

उपलब्ध करून देतो. कृषी सेतूच्या माध्यमातून आम्ही आमच्या तंत्रज्ञान-सक्षम कामकाज क्षमतांचा उपयोग करून घेत माध्यस्थ कमी करून शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत फार्म गेट प्रोक्युअरमेंट्स (शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना माल विकणे) सेवांचे विस्तारीकरण करत आहोत. न्याय्य किंमत, पारदर्शकता आणि दर्जामध्ये तडजोड न करता किफायतशील व्यवहारांची कवाडे खुली करून शेतकऱ्यांचे सबलीकरण करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत."

 

एनबीएचसीचा भारतभरातील विस्तार, या क्षेत्राविषयीचे सखोल ज्ञान आणि तंत्रज्ञान सक्षम कामकाज क्षमता यामुळे विविध ठिकाणची तृणधान्ये, डाळी, कडधान्ये, तेलबिया आणि मसाले यांच्यासह विस्तृत उत्पादन श्रेणीला कृषी सेतू सेवा उपलब्ध करून देते. हा क्रांतिकारी प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोअर, क्यूआर कोड स्कॅनिंग आणि वेबसाइटच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24