सिडबी भारतात उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वावलंबन चॅलेंज फंड सुरू केला

 सिडबी भारतात उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वावलंबन चॅलेंज फंड सुरू केला

 ”



मुंबई : भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) च्या प्रचार आणि विकासात गुंतलेली एक सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. सिडबीने परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालय, युनायटेड किंगडम, (एफसीडीओ यूके) यांच्या भागीदारीतुन स्वावलंबन चॅलेंज फंड सुरू केला आहे.
चॅलेंज फंड ही संघटनांमध्ये स्पर्ध्येचा उपयोग करून विशिष्ट हेतूंसाठी निधी वाटप करण्यासाठी निधी सहाय्य यंत्रणा आहे. समजा एखादी कल्पना आहे ज्यावर प्रयोग करणे आवश्यक आहे किंवा ज्याचा विस्तार करणे आवश्यक आहे, परंतु निधी एक अडथळा राहिला आहे, म्हणून निधीसाठी विहित फॉर्ममध्ये कल्पना सादर करण्याचे आव्हान असते, समाधान हे अंमलबजावणी आणि वैधतेसाठी व्यासपीठ प्रदान करते. त्यानंतर, इतर दात्याच्या/फायनान्सरच्या मदतीने ते पुढे नेले जाऊ शकते.
स्वावलंबन चॅलेंज फंड ना-नफा संस्था/शैक्षणिक संस्था/सामाजिक स्टार्टअपना आर्थिक सहाय्य प्रदान करेल, ज्याचे लक्ष शाश्वत उपजीविका, आर्थिक समावेशन आणि आर्थिक सेवांमध्ये प्रवेश आणि देशातील उद्योजकतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यावर भर असेल. पात्र संस्था निवडलेल्या सहा विषयांवर त्यांचे प्रस्ताव सादर करू शकतात जसे की आजीविका, महिला सक्षमीकरण, आर्थिक साक्षरता, जबाबदार व्यवसाय इ.
डिजिटल पोर्टलसह स्वावलंबन चॅलेंज फंड (https://scf.udyamimitra.in) MSME मंत्रालयाचे सचिव श्री बी.बी.स्वाई यांनी शुभारंभ केला. यावेळी MSME चे विकास आयुक्त श्री डीके. सिंह, श्री शिवसुब्रमण्यन रमण, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिडबी, सुश्री ममता कोहली, वरिष्ठ सामाजिक विकास सल्लागार आणि श्री गौरव कपूर, एफसीडीओ यूके, चे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिवसुब्रमण्यन रमण म्हणाले, “आझादी का अमृत महोत्सव चालू आहे आणि आम्ही उद्योजक स्वातंत्र्य अधिक सुलभ करण्यासाठी कृतीशील/नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा विचार केला आहे. हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून स्वावलंबन चॅलेंज फंड सादर करण्यात आला आहे. मला खात्री आहे की या स्वावलंबन चॅलेंज फंडद्वारे, अडथळे दूर करणे आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांद्वारे वाढीचा प्रवाह सहज सुलभ होईल.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy