भारताचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी नेटफ्लिक्स आणि युनेस्कोने जपली

 भारताचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी
नेटफ्लिक्स आणि युनेस्कोने जपली


 


भारत, भूतान, श्रीलंका आणि मालदीवसाठीचे युनेस्कोचे प्रतिनिधी आणि संचालक एरिक फाल्ट आणि नेटफ्लिक्स इंडियाच्या आशय विभागाच्या उपाध्यक्षा मोनिका शेरगिल यांच्या तर्फे

ऑनलाईन पद्धतीने लड्डू कसे बनवायचे याचा शोध घेण्यापासून वेगवेगळे थीम केक्स बनवण्यापर्यंत माईटी लिटल भीम २०१९ मध्ये सादर झाल्यापासून जगभरात लाखो प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. ग्रीन गोल्ड अॅनिमेशनची निर्मिती असलेली ही मालिका या छोट्या मुलाच्या पोंगल मधील स्वयंपाकापासून त्याच्या खेड्यात पतंग उडविण्यापर्यंतच्या विविध साहसांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे अस्सल दर्शन घडविते.

मायटी लिटल भीमच्या माध्यमातून भारताचा वैविध्यपूर्ण आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी नेटफ्लिक्स आणि युनेस्को (संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, शास्त्रीय आणि सांस्कृतिक संस्था) यांनी भागीदारी केली आहे. पुढच्या वर्षापर्यंत ‘एक देश, अतुलनीय विविधता’ या सूत्रावर आधारित मजेदार छोट्या व्हिडिओची मालिका सादर होईल. यामध्ये दसरा, दिवाळी आणि होळी यासारखे सण, भारताचा सांस्कृतिक प्रवास, स्मारके, वारसास्थळे, कलाप्रकार, सामाजिक चालीरीती या सर्वांवर प्रकाश टाकण्यात येईल. मानवतेच्या मूल्याच्या जपणुकीसाठी युनेस्को याप्रकारच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या जोपासण्याला, संवर्धनाला आणि सुरक्षेला प्रोत्साहन देत आहे.

हे शॉर्ट व्हिडीओ युनेस्को नवी दिल्लीच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि ट्विटर वर सादर होणार असून कशाप्रकारे सांस्कृतिक इतिहास लोकांचे रोजचे आयुष्य समृद्ध करतो हे यातून दाखवले आहे. खाद्यपदार्थ, परंपरा यापासून भाषा आणि कथा या सगळ्यांचा यात अंतर्भाव आहे. संपूर्ण देशाला एकत्र आणणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने (आझादी का अमृत महोत्सव) पहिला व्हिडिओ आज सादर झाला.

यातून भारताच्या सांस्कृतिक विविधतेबद्दल साऱ्या जगात कुतूहल निर्माण होईल आणि माईटी लिटल भीम प्रमाणेच जगभरातील मुलं आणि पालक दोघानांही याची भुरळ पडेल असा आम्हांला विश्वास वाटतो.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth