वैद्यकीय निदान त्वरीत करून घेण्यास लोकांना उद्युक्त करण्यासाठी ‘टाटा हेल्थ’ची #SochMatPoochLe ही देशव्यापी मोहीम सुरू
वैद्यकीय निदान त्वरीत करून घेण्यास लोकांना उद्युक्त करण्यासाठी ‘टाटा हेल्थ’ची #SochMatPoochLe ही देशव्यापी मोहीम सुरू
विश्वासार्ह, लवकर व योग्य निदान मिळवण्याचे महत्त्व
लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी टीव्हीसी व डिजिटल फिल्म यांचा वापर
मुंबई, 25 ऑगस्ट, 2021 : एखाद्या दुखण्याची काही लक्षणे वा आरोग्यविषयक समस्या दिसू लागल्यास अनेकजण अतिविचार करू लागतात. वेगवेगळ्या शंकांमुळे त्यांच्या मनात एक द्वंद्व सुरू होते. ही सवय त्यांनी सोडून द्यावी आणि तज्ज्ञांना विचारून वैद्यकीय निदान वेळेवर शोधावे, असा सल्ला देणारी #SochMatPoochLe ही एक नवीन टीव्ही जाहिरातपट मालिका (टीव्हीसी) आणि डिजिटल चित्रपट ‘टाटा हेल्थ’ या कंपनीने सादर केले आहेत.
यातील टीव्हीसी देशभरात हिंदी भाषेत सादर झाली असून डिजिटल चित्रपट कन्नड, तेलुगू व तामिळ या अन्य तीन भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.
एखाद्याने स्वत:च निदान करण्याऐवजी आणि त्यातून स्वतःचे आरोग्य धोक्यात आणण्याऐवजी, त्याला कोणतीही लक्षणे अनुभवास आल्यास, त्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, यावर ‘#SochMatpoochLe’ ही जाहिरात जोर देते. परिस्थिती गंभीर बनू नये, यासाठी लोकांनी वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्यावा. छातीत दुखणे, डोकेदुखी, पोटदुखी किंवा पाठदुखी ही दुखणी असल्यास, ही लक्षणे सौम्य किंवा गंभीर स्वरुपाच्या आजाराची असू शकतात, असे थट्टेच्या स्वरुपातील, हलक्या-फुलक्या रितीचे संभाषण या चित्रपटात आहे. कोणताही विश्वासार्ह नसलेला सल्ला, कसलीतरी घरगुती औषधे, स्वतःच केलेली स्वतःची चिकीत्सा यांचा अवलंब केल्यास, त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात, असे यात दाखविण्यात आले आहे.
या चित्रपटात आरोग्याच्या लक्षणांमुळे उद्भवणारी भीती आणि गोंधळ यांचे चित्रण करण्यात आले आहे. या गोंधळामुळेच अनेकदा अचूक निदान करण्यास विलंब लागत असतो आणि त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 'इतरांना असे होऊ शकते, पण मला नाही', असे मानण्याची प्रवृत्ती माणसामध्ये असते; यातूनच एखादी व्यक्ती चुका करू शकते आणि काही गंभीर इशाऱ्यांकडे तिचे दुर्लक्ष होऊन त्यातून आरोग्याची आणीबाणी निर्माण होऊ शकते, असे या चित्रपटातून निदर्शनास आणण्यात आले आहे.
नवीन जाहिरात मोहिमेबद्दल बोलताना ‘टाटा हेल्थ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंझूर अमीन म्हणाले, “कोविड-19 साथीने आपल्याला प्रतिबंधात्मक आणि सक्रिय वैद्यकीय सेवेचे महत्त्व दाखवून दिले आहे. प्राथमिक आरोग्य सुविधा लोकांना सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात, असा ‘टाटा हेल्थ’मध्ये आमचा प्रयत्न असतो. अनारोग्याबाबतचे एखादे लक्षण दिसून आले, तर लोकांनी स्वतःच त्याची चिकीत्सा करीत बसण्यापेक्षा आणि आपले आरोग्य धोक्यात घालण्यापेक्षा वैद्यकीय सल्ला घ्यावा, याचे महत्त्व नमूद करण्यावर आमच्या नवीन जाहिरातींमध्ये भर देण्यात आला आहे. सर्वोत्तम स्वरुपाचे तंत्रज्ञान आणि वैद्यकीय विज्ञान यांचा उपयोग करून, ‘टाटा हेल्थ’ हे अल्पावधीतच भारतातील सर्वात विश्वसनीय ‘हेल्थ अॅप्स’पैकी एक बनले आहे. लोकांपर्यंत व्यक्तिगत पातळीवर प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचावी, या हेतूने आम्ही डॉक्टरांच्या एका पथकासोबत सातत्याने काम करीत असतो. आम्हाला आशा आहे की ही जाहिरात मोहीम लोकांना वेळेवर वैद्यकीय मदत घेण्यास प्रोत्साहित करील.”
हा चित्रपट ‘मॅवरीक आणि मंक कम्युनिकेशन्स’ने बनवला आहे; टीव्हीसीबाबत भाष्य करताना, ‘मॅवरीक आणि मंक कम्युनिकेशन्स’चे मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी व संस्थापक भावेश दोशी म्हणाले, “लोकांना अतिविचार करण्यापासून रोखण्याचा या जाहिरात मोहिमेचा हेतू आहे. यामागील धोरण असे, की बहुतेक वेळा आपण आपल्या डोक्यात विचारांचा गुंता करून राहतो; विशेषतः, जेव्हा आपण काही प्रकारची लक्षणे अनुभवतो. आपण चांगले, वाईट, अतिवाईट, अशा विविध शक्यतांचा विचार करू लागतो. यामुळे आपल्या डोक्यात एक वाद निर्माण होतो, जो अंतहीन असू शकतो व त्यातून कोणतेही वास्तविक निदान होत नाही. ‘#SochMatPoochLe’ ही एक आगळीवेगळी, हलकीफुलकी जाहिरात मोहीम आहे, जी लोकांना त्यांच्या 'विचार' करण्याच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, तसेच त्यांना योग्य वैद्यकीय निदान करण्यासाठी अॅपवर सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहित करते.
लिंक्स –
• छातीत दुखणे - https://youtu.be/Lb1nAZC2lGY
• पोटदुखी - https://youtu.be/TFz7txKQ9Bs
• डोकेदुखी - https://youtu.be/roJ61534JvI
• पाठदुखी - https://youtu.be/rahB7iM8P5c
Comments
Post a Comment