सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा – इंडिया स्किल्स महाराष्ट्र 2021 ची कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली घोषणा

सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा – इंडिया स्किल्स महाराष्ट्र 2021 ची

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली घोषणा




मुंबई: शांघाय (चीन) येथे ऑक्टोबर 2022 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स चॅम्पियनशिपसाठी राज्यातील युवक-युवतींची तयारी करुन घेण्यात येत आहे. यासाठी राज्यात आयोजित स्पर्धेला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २० हजार ९० जणांनी यात सहभाग घेतला. जिल्हा आणि विभागीय स्तरावर यांची स्पर्धा झाली असून आता राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 263 उमेदवार सहभागी होत आहेत. तरुणांमधील नवसंकल्पना आणि उद्योजकतेला चालना देणारी इंडिया स्किल्स महाराष्ट्र 2021 ही सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा असून कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी याची घोषणा केली.


प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, लँडस्केप गार्डनिंग, इंडस्ट्रियल कंट्रोल, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, आयटी, अॅग्रीकल्चर, फ्लोरिस्ट्री यासारख्या कौशल्य व्यवसायांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेमुळे युवक-युवतीमधील नवसंकल्पना आणि त्यांच्यातील उद्यमशीलता यांना चालना मिळेल, असा विश्वास मंत्री श्री. मलिक यांनी व्यक्त केला.


स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2018 मध्ये झालेल्या राज्य कौशल्य स्पर्धेच्या 2400 इतक्या नोंदणी तुलनेत यंदाची संख्या 700 टक्के पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेतील जवळपास 100 विजेत्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इंडिया स्किल्स 2021 विभागीय स्पर्धेत आणि पुढे डिसेंबर 2021 मध्ये इंडिया स्किल्स राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. इंडिया स्किल्स 2021 मधील विजेत्यांना वर्ल्ड स्किल्ससह विविध आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. ऑलिम्पिकच्या बरोबरीने कौशल्यामध्ये वर्ल्ड स्किल्स ही व्यावसायिक कौशल्यांची जागतिक स्पर्धा आहे आणि दर दोन वर्षांनी जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आयोजित केली जाते. वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनलची पुढील आवृत्ती ऑक्टोबर 2022 मध्ये चीनच्या शांघाय येथे आयोजित केली जाणार आहे ज्यामध्ये 60 हून अधिक देश सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

KidZania Partners with Meetakriti Art Studio to Launch Creative Pottery & Art Role-Plays for Kids