ब्रिजस्टोन इंडियातर्फे सामाजिक योगदान देणाऱ्या शाश्वत वाहतूक शोधांचा सन्मान करण्यासाठी पुरस्कारांची घोषणा


ब्रिजस्टोन इंडियातर्फे सामाजिक योगदान देणाऱ्या शाश्वत वाहतूक शोधांचा सन्मान करण्यासाठी पुरस्कारांची घोषणा

आरोग्यसेवा व पोषण, उपजीविका, शिक्षण आणि सामाजिक अंतर्भाव या क्षेत्रांमध्ये सुलभ, सुरक्षित व स्मार्ट वाहतूक उपाययोजनांचा करणार सन्मान

रु.30 लाखांचे एकूण बक्षीस

मुंबई, २९ सप्टेंबर, २०२१: ब्रिजस्टोन इंडियातर्फे आज त्यांच्या मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट पुरस्कारांची सुरुवात करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. या वार्षिक पुरस्कारांमध्ये सामाजिक प्रगतीच्या क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान व उपाययोजनांच्या माध्यमातून शाश्वत वाहतूक नवोपक्रमांचा शोध घेण्यात येईल, त्यांची दखल घेण्यात येईल आणि त्यांचा प्रसार करण्यात येईल. एनजीओ, सामाजिक संस्था, सोशल स्टार्टअप या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ना-नफा तत्वावर चालणाऱ्या ज्या संस्था वाहतुकीचा वापर उपाययोजनेचे माध्यम म्हणून करत आहेत, वाढलेल्या किंवा पार्यायी वाहतुकीमुळे सामाजिक समस्या हाताळल्या गेल्या आहेत किंवा सामाजिक प्रगती साध्य करण्यात आली आहे, अशा संस्थांना या पुरस्कारासाठी अर्ज करण्यास आवाहन करण्यात आले आहे.

या पुरस्कारांमध्ये तीन प्रमुख घटकांवर भर देण्यात आला आहे : सुलभ, सुरक्षित आणि स्मार्ट वाहतूक उपाययोजना. आरोग्यसेवा व पोषण, उपजीविका, शिक्षण आणि समाजिक अंतर्भावासाठी सुलभता उपलब्ध करून देणाऱ्या वाहतूक उपाययोजना हा एक घटक आहे. दुसरा भाग म्हणजे सुरक्षित वाहतूक उपाययोजनांचे मूल्यमापन, ज्याने सुरक्षितता व अंतर्भाव यांची वाढ होऊन सध्याची लैंगिक तफावत कमी होईल, आपत्तीला आळा घालता येईल आणि रस्ते सुरक्षा वाढेल. तिसरा घटक आहे स्मार्ट वाहतूक उपाययोजना, ज्यात गरीबी निर्मूलन, जैवविविधतेचे संवर्धन व ग्रामीण समाजाचा विकास साध्य करून साकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या उपाययोजना स्वागतार्ह आहेत आणि त्यांचा विचार करण्यात येईल.

पर्यावरणाला लाभदायी असलेल्या आणि कामगिरीला चालना देणाऱ्या तंत्रज्ञानावर ब्रिजस्टोन इंडियाचा विश्वास आहे. या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने आपल्या समाजाला सुगम, सुलभ, सुरळीत व अखंडित वाहतूक यंत्रणा लाभली आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून नावीन्यपूर्णतेतील सर्वोत्तम कार्यपद्धती आणि सामाजिक प्रगतीसाठी वाहतुकीचा वापर उपाययोजनेचे साधन म्हणून करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. उपाययोजना व उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक सेवा करण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या शक्तीचा उपयोग केलेल्यांची या पुरस्कारांमध्ये दखल घेण्यात येणार आहे., असे ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते म्हणाले.

mobilityaward@bridgestone.co.in येथे अर्ज व चौकशी करता येऊ शकते आणि 15 ऑक्टोबर 2021 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth