इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडतर्फे Rs.1,000 कोटींचा सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड रीडिमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सचा (एनसीडी) पब्लिक इश्यु जाहीर

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडतर्फे Rs.1,000 कोटींचा सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड रीडिमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सचा (एनसीडी) पब्लिक इश्यु जाहीर

 

·         कूपन दर वार्षिक 9.75%पर्यंत*

·         मुद्दल रक्कम आणि त्यावरील व्याजावर 1.25 पट सिक्युरिटी कव्हर

·         ट्रान्च I इश्युला क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेडने क्रिसिल एए/स्टेबल असे मानांकन दिले आहे आणि ब्रिकवर्क रेटिंग्ज इंडिया प्रा. लि.ने बीडब्ल्यूआर एए+/निगेटिव्ह (डबल ए प्लस/निगेटिव्ह) असे मानांकन दिले आहे.

·         ट्रान्च I इश्यु 6 सप्टेंबर, 2021 रोजी खुला होईल आणि 20 जुलै, 2021 रोजी बंद होईल**

·         हे ट्रेडिंग डिमटेरिअलाइझ्ड प्रकारातच होईल

·         प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर वाटप

·         हे एनसीडी एनसीडी बीएसई आणि एनएसईमध्ये सूचिबद्ध होण्यासाठी प्रस्तावित आहेत


 

 

मुंबई, 03 सप्टेंबर, 2021 : इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे नियंत्रित होणाऱ्या हाउसिंग फायनान्स कंपनीने प्रत्येकी रु.1000 दर्शनी मूल्य असलेल्या सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड, रीडिमेबल, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सचा पब्लिक इश्यु जाहीर केला आहे. ट्रांन्च I इश्यु 6 सप्टेंबर 2021 रोजी खुला होईल आणि 20 जुलै 2021 रोजी बंद होईल.

 

ट्रान्च I इश्युमध्ये रु. 200 कोटी रकमेसाठीची बेस इश्यु साइझ (बेस इश्यु साइझ) आहे. यात एकूण रु.800 कोटींपर्यंतच्या ग्रीन शू (जास्त वाटप) पर्यायाचा समावेश असून तो एकूण रु.1,000 कोटींपर्यंत असू शकतो (ट्रान्च I इश्यु). एनसीडी इश्युतर्फे सबस्क्रिप्शनसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांचा कूपन दर वार्षिक 8.05% पासून 9.75%पर्यंत आहे. फिक्स्ड कूपन धारण केलेल्या एनसीडीच्या एकूण 10 सीरिज आहेत आणि त्यांचा मुदत कालावधी 24 महिने, 36 महिने, 60 महिने, 87 महिने असा असून त्यात वार्षिक, मासिक आणि संचयी पर्याय उपलब्ध आहे.

 

हे एनसीडी एनसीडी बीएसई आणि एनएसईमध्ये (एकत्रितपणे स्टॉक एक्सेंजेस) सूचिबद्ध होण्यासाठी प्रस्तावित आहेत आणि बीएसई हे या इश्युसाठी नियुक्त स्टॉक एक्स्चेंज आहेत. या एनसीडींना क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेडने क्रिसिल एए/स्टेबल असे मानांकन दिले आहे आणि ब्रिकवर्क रेटिंग्ज इंडिया प्रा. लि.ने बीडब्ल्यूआर एए+/निगेटिव्ह (डबल ए प्लस/निगेटिव्ह) असे मानांकन दिले आहे.

 

जे कंपनीने आणि/किंवा त्यांच्या उपकंपन्यांनी या आधी इश्यु केलेल्या एनसीडी/बाँड(बाँड्स)चे धारक, जसे प्रकरण असेल त्याप्रमाणे, आणि/किंवा इंडिया बुल्स फायनान्स लिमिटेडचे इक्विटी शेअरहोल्डर (शेअरहोल्डर्स) आहेत जसे प्रकरण असेल त्यानुसार, त्यांना वाटपासाठी निश्चित केलेल्या दिवशी कॅटेगरी III (एचएनआय) आणि कॅटेगरी IV (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी या प्रस्तावित इश्युमध्ये कमाल 0.25% पर्यंत अतिरिक्त प्रोत्साहनलाभ ऑफ करण्यात येईल.

या इश्युसाठी लीड मॅनेजर्स म्हणून एडलवाइज फायनान्शिअल सर्व्हिसेस लि., आयआयएफएल सिक्युरिटीज लि. आणि ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स प्रा. लि. हे काम पाहणार आहेत.

 

या ट्रान्च I इश्युच्या माध्यमातून संकलित झालेला किमान 75% निधी कर्ज, आर्थिक सहाय्य आणि कंपनीच्या विद्यमान कर्जाच्या व्याजाच्या व मुद्दल रकमेच्या परतफेडीसाठी वापरण्यात येईल आणि शिल्लक निधी सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्याचे प्रस्तावित आहे. ट्रान्च I इश्युमध्ये जमा झालेल्या रकमेच्या 25% पेक्षा जास्त नसलेल्या वापराच्या अधीन असेल. अनसिक्युअर्ड एनसीडी या सबॉर्डिनेटेड ऋण प्रकारातील असतील आणि श्रेणी II भांडवलासाठी पात्र असतील.

 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24