सूर्या रोशनीने डाऊनलाइटर्सची नवीन श्रेणी सादर केली
सूर्या रोशनीने डाऊनलाइटर्सची नवीन श्रेणी सादर केली
~ ऊर्जा बचतीसह वायफाय किंवा इंटरनेटशिवाय काम करू शकतात ~
मुंबई, ५ ऑक्टोबर २०२१: ग्राहकांची मनपसंत भारताची दुसरी सर्वात मोठी प्रकाशदिव्यांची कंपनी सूर्या रोशनीने आपल्या नाविन्यपूर्ण स्मार्ट लाईट मालिकेचा एक भाग म्हणून १५ डब्ल्यू स्मार्ट डाऊनलाइटर्सची नवीन श्रेणी सुरू केली आहे. प्रत्येक मूडशी जुळण्यासाठी डिझाइन केलेल्या, उच्च तंत्रज्ञानाच्या दिव्यांना कार्य करण्यासाठी वाय-फाय किंवा इंटरनेटची आवश्यकता नाही तर रिमोटद्वारे ते ऑपरेट केले जाऊ शकतात.
सूर्या स्मार्ट डाऊनलाइटर्स कोणत्याही तीव्रतेत सहजतेने उबदारतेपासून थंड प्रकाशात बदलण्यास सक्षम आहेत,अगदी तुमच्या मनःस्थितीनूसार, तुम्ही ठरवाल तसं प्रकाशयोजना बदलण्याची तुम्हाला मुभा आहे, त्यानूसार ते मंदावतात ही. एकाधिक स्मार्ट डाऊनलाइटर्स एकाच रिमोटने नियंत्रित केले जाऊ शकतात आणि दिवे बंद करण्यासाठी टायमर सेट केले जाऊ शकते. प्रत्येक एलईडी स्मार्ट डाऊनलाईटची किंमत १५०० रुपये आहे, तर रिमोटची किंमत फक्त ५०० रुपये आहे.
सूर्या रोशनीचे प्रकाश योजना आणि ग्राहक टिकाऊ संशोधनाचे ईडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निरुपम सहाय म्हणाले, “सूर्या रोशनीने गेल्या चार दशकांमध्ये भारताच्या प्रकाश उद्योगात आघाडीवर राहून जे यश मिळवले आहे ते आम्हाला असेच पुढे सुरु ठेवायचे आहे. या नाविन्यपूर्ण, स्मार्ट परंतु परवडणाऱ्या डाऊनलाइटर्सची ओळख करून देतानाच, आम्ही या नेतृत्वाच्या स्थितीला बळकटी देत आहोत आणि आम्ही देशातील ग्राहक आणि व्यावसायिक दोन्ही विभागांमध्ये एलईडी आणि स्मार्ट लाइटिंगचे नेतृत्व करत राहू. आमचे स्मार्ट डाऊनलाइटर्स कार्यक्षम, वापरण्यास सोपे आणि तरीही परवडणारे आहेत.”
Comments
Post a Comment