आनंद राठी वेल्थ लिमिटेडचे इनिशिअल पब्लिक ऑफरिंग 2 डिसेंबर, 2021 रोजी खुले होणार
आनंद राठी वेल्थ लिमिटेडचे इनिशिअल पब्लिक ऑफरिंग 2 डिसेंबर, 2021 रोजी खुले होणार
· प्रत्येकी Rs.5 इतक्या दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअर Rs.530-Rs.550 या किमतीचा प्राइस बँड (इक्विटी शेअर्स). ऑफरमध्ये कर्मचारी आरक्षित पोर्शनसाठी बिड करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी देऊ करण्यात आलेला Rs.25 चा डिस्काउंट समाविष्ट
· बिड/ऑफर सुरू होण्याची तारीख - गुरुवार, 2 डिसेंबर 2021 आणि बिड/ऑफर बंद होण्याची तारीख - सोमवार 6 डिसेंबर, 2021
· किमान बिड लॉट 27 इक्विटी शेअर्सचा असेल आणि त्यानंतर 27 इक्विटी शेअर्सच्या पटीमध्ये असेल
· फ्लोअर किंमत ही इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 106 पट आहे आणि कॅप किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 110 पट आहे.
मुंबई, 30 नोव्हेंबर 2021 : भारतातील काही आघाडीच्या नॉन-बँक वेल्थ सोल्यूशन्स फर्म्सपैकी एक असणाऱ्या आनंद राठी वेल्थ लिमिटेड या फर्मतर्फे गुरुवार, 2 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या इक्विटी शेअर्सचे (ऑफर) पब्लिक ऑफरिंग करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ही ऑफर सोमवार, 6 डिसेंबर 2021 रोजी बंद होणार आहे. या ऑफरसाठी प्रत्येकी Rs.5 दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्ससाठी Rs.530 - Rs550 हा प्राइस बँड निर्धारीत करण्यात आला आहे.
इनिशिअल पब्लिक ऑफरिंगमध्ये आनंद राठी फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, आनंद राठी, प्रदीप गुप्ता, अमित राठी, प्रीती गुप्ता, सुप्रिया राठी, राकेश रावल यांच्या माध्यमातून कारभार करत असलेली रावल फॅमिली ट्रस्ट, जुगल मंत्री, फिरोझ अझीझ (सेलिंग शेअरहोल्डर्स) यांच्याकडून Rs.5 इतके दर्शनी मूल्य असलेल्या 1,20,00,000 पर्यंत इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर समाविष्ट आहे.
कंपनी आणि सेलिंग शेअरहोल्डरर्सनी, बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून सेबी आयसीडीआर नियमनांनुसार अँकर इन्व्हेस्टर्सच्या सहभागाचा विचार केला आहे, जो बिड / ऑफर उघडण्याच्या तारखेच्या एक दिवस आधी म्हणजे 1 डिसेंबर 2021 रोजी काम करेल. ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन 31 सह सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन्स) नियम, 1957 नियम 19(2) नुसार देण्यात आली आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन 6(1) नुसार करण्यात आली आहे. यात 50% हून अधिक ऑफर क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल खरेदीदारांना वाटपासाठी उपलब्ध नसेल आणि नॉन इन्स्टिट्युशनल खरेदीदारांना वाटप करण्यासाठी 15% हून अधिक ऑफर उपलब्ध नसेल आणि रिटेल वैयक्तिक बिडर्सना वाटप करण्यासाठी 35% हून अधिक ऑफर उपलब्ध नसेल
या कंपनीचा कारभार आर्थिक वर्ष 2002 साली सुरू झाला आणि ही एएमएफआय नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक आहे आणि वेल्थ सोल्यूशन्सचे मिश्रण, आर्थिक उत्पादन वितरण आणि तंत्रज्ञान सोल्यूशन्स विविध प्रकारच्या ग्राहकवर्गाला सखोल संशोधन करून सोल्यूशन्स पुरविण्यात येतात. CARE अॅडव्हायजरी रिसर्चनुसार कंपनीला आर्थिक वर्ष 2021, 2021 आणि 2019मध्ये प्राप्त केलेल्या कमिशनच्या आधारे भारतातील आघाडीच्या तीन नॉन-बँक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्समध्ये मानांकन मिळाले आहे.
31 मार्च 2019 पासून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत कंपनीची व्यवस्थापनांतर्गत मत्ता 22.74% च्या सीएजीआरने वाढून ती Rs.302.09 अब्ज इतकी झाली आहे. 31 ऑगस्ट 2021 रोजी कंपनीच्या फ्लॅगशिप प्रायव्हेट वेल्थ व्हर्टिकलने देशबरातील 6,564 क्लाएंट कुटुंबांचे आर्थिक नियोजन केले. आनंद राठी वेल्थ लिमिटेडचे 50% ग्राहक त्यांच्यासोबत तीन वर्षांहून अधिक काळ आहेत. 2021 या वर्षी कंपनीने 50% दराने लाभांश दिला आणि ऑगस्ट 2016 व जुलै 2021 मध्ये त्यांनी बोन शेअर्स देऊ केले.
प्रायव्हेट वेल्थ व्हर्टिकलव्यतिरिक्त कंपनीची दोन नव्या युगातील तंत्रज्ञानाधारित बिझनेस व्हर्टिकल्स आहेत. यात डिजिटल वेल्थ (डीडब्ल्यूएम) आणि ओम्नि फायनान्शिअल अॅडव्हायझर्सय यांचा समावेश आहे. डीडब्ल्यूएम व्हर्टिकल उच्च उत्पन्न वर्गासाठी कंपनीच्या प्रपोझिशनचे फिन-टेक विस्तारीकरण आहे. त्यांना मानवी इंटरफेसने सक्षम झालेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेल्थ सोल्यूशन उपलब्ध करून देण्यात येते. ओएफए व्हर्टिकलमध्ये तंत्रज्ञान प्लॅटऑर्म वापरून स्वतंत्र आर्थिक सल्लागारांच्या माध्यमातून क्लाएंट्सना सेवा देण्यासाठी संपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रासाठीचे धोरणात्मक विस्तारीकरण आहे.
भारताकडे उच्च ग्रोथ वेल्थ मॅनेजमेंट मार्केटसाठीचे घटक आहेत आणि 2028 पर्यंत भारत चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी संपत्ती बाजारपेठ होण्याकडे वाटचाल करत आहे. कार्वी इंडिया वेल्थ रिपोर्ट 2020 नुसार आर्थिक वर्ष 2025 पर्यंत आर्थिक मत्ता व फिजिकल मत्ता अनुक्रमे Rs512 ट्रिलिअनपर्यंत आणि Rs299 ट्रिलिअनपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा सीएजीआर अनुक्रमे 14.27% आणि 8.14% असेल (स्रोत : CART इंडस्ट्री रिपोर्ट)
इक्विरिअस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, बीएनपी पारिबास, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि आनंद राठी अॅडव्हायझर्स लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) आहेत.
Comments
Post a Comment