भारतीय रेल्वेने मध्यप्रदेशमध्ये फ्लाय अॅश वाहून नेण्यासाठी एमबी पॉवर आणि एसीसीची हातमिळवणी
भारतीय रेल्वेने मध्यप्रदेशमध्ये फ्लाय अॅश वाहून नेण्यासाठी
एमबी पॉवर आणि एसीसीची हातमिळवणी
27 नोव्हेंबर 2021 - मुंबई : पर्यावरण संरक्षणाप्रती असलेली बांधिलकी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एमबी पॉवर या डायव्हर्सिफाइड वीज उत्पादक कंपनीने कटनी येथील कैमोअरमधील कारखान्यातील कंडिशन्ड फ्लाय अॅश भारतीय रेल्वेमार्गाने एसीसी सिमेंटमध्ये वाहून नेण्यास सुरुवात केली आहे. एमबी पॉवरतर्फे त्यांच्या मध्यप्रदेशमधील अनूपपुरमधील जैठारी येथील फ्लॅगशिप थर्मल पॉवर प्लँटच्या माध्यमातून एसीसी सिमेंटला सीएफए वाहून नेण्यात येणार आहे, जेणेकरून फ्लाय अॅशचा सुयोग्य उपयोग होईल. एमबी पॉवरचा अनूपपुरमधील कारखाना हा अशा प्रकारचा उपक्रम सुरू करणारा देशातील पहिल्या काही कारखान्यांपैकी एक आहे.
मध्यप्रदेशमधील शहडोल डिव्हिजनमधून कोळशाच्या भुकटीच्या राखेची पहिली बोगी निघाली. या विभागातील अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाला शहडोल डिव्हिजनचे आयुक्त श्री. राजीव शर्मा, अनूपपुर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सोनिया मीणा यांनी एमबी पॉवरचे प्लँट हेड आणि सीओओ श्री. बी. के. मिश्रा यांच्या उपस्थितीत हिरवा कंदिल दाखवला.
शहडोल डिव्हिजनचे पोलीस आयुक्त श्री. राजीव शर्मा म्हणाले, "फ्लाय अॅशच्या व्यवस्थापनासाठी आणि वीजनिर्मिती कारखान्यातील जोड उत्पादनाच्या सुयोग्य वापरासाठी हा उपक्रम अत्यंत परिणामकारक आहे. या भागातील वाहतुकीपासून ते पर्यावरणापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या समस्यांवरील हा उपाय आहे. याने इतर उद्योगक्षेत्रांनाही प्रेरणा मिळेल.
अनूपपुर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती सोनिया मीणा म्हणाल्या, "अवजड वाहनांमधून कोळशाच्या भुकटीची वाहतूक हे या भागातील मोठे आव्हान होते. हे पाऊल उचलल्याने एमबी पॉवरने या भागातील वाहतुकीची कोंडी आणि पर्यावरणाला असलेल्या धोक्यांपासून दिलासा देण्यासाठी मदत केली आहे. इतरांनी अनुकरण करण्याजोगा हा उदात्त उपक्रम आहे."
अनूपपुरचे प्लँट हेड आणि एमबी पॉवरचे सीओओ श्री. बी. के मिश्रा म्हणाले, "हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे; या उपक्रमातून आमची जबाबदार कॉर्पोरेट नागरिक होण्याच्या आमच्या बांधिलकी दिसून येते. स्थानिकां तसेच या उपक्रमाशी निगडित असलेल्या सर्वच भागधारकांसाठी हा लाभदायक उपक्रम आहे."
रेल्वेचा वापर करून या भुकटीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करता येऊ शकते, त्याचप्रमाणे भुकटीच्या वाहतुकीचा हा मार्ग वाजवी खर्चातील, वेगवान व वेळेची बचत करणारा आहेच, त्याचप्रमाणे हा मार्ग पर्यावरणस्नेहीसुद्धा आहे. फ्लाय अॅश वाहून नेणाऱ्या बल्करच्या माध्यमातून एका वेळी 20 मेट्रिक टन इतकी फ्लाय अॅश वाहून नेता येऊ शकते तर रेल्वेने एका वेळी सुमारे 3500-4000 मेट्रिक टन भुकटीची राख वाहून नेता येऊ शकते. यामुळे, अवजड वाहनांमुळे होणारे रस्ते अपघात कमी होण्यास, रहदारी व वाहतुकीच्या समस्या कमी होण्यास मदत होईलच, त्याचप्रमाणे हा उपक्रम पर्यावरणस्नेहीसुद्धा असेल.
"हे पाऊल उचललल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे आणि वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या फ्लाय अॅशच्या अधिक पर्यावरणस्नेही उपयोगाची खातरजमा करण्यासाठी या कारखान्यात अपग्रेड करण्यासाठी आम्ही सक्रियपणे प्रयत्न करत आहोत.", अशी पुष्टी मिश्रा यांनी जोडली.
"पुढील दशकासाठी एसीसीचे शाश्वतता धोरण ही त्यांची शाश्वत विकास (एसडी) 2030 योजना आहे, जी या समूहाच्या एकूण शाश्वत विकास योजनेशी सुसंगत आहे. या योजनेमध्ये चार महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे - वातावरण, चक्रीय अर्थव्यवस्था, पाणी आणि निसर्ग व लोक आणि स्थानिक समूह. रेल्वे मार्गाचा वापर करून भुकटीची वाहतूक करणे हा त्यापैकीच एक आहे. एसीसी आणि एमबी पॉवर यांचे अत्यंत मजबूत नाते आहे आणि पुढे जाताना, कंडिशन्ड फ्लाय अॅशची (सीएफए) वाहतूक रेल्वेमार्गाने केल्यामुळे फ्लाय अॅश पर्यावरणस्नेही वाहतूक मार्गाने करण्यासाठी परस्परांना मदत होईल.", असे एसीसी लिमिटेडचे अधिकृत प्रवक्ता म्हणाले.
Comments
Post a Comment