एव्हरेस्ट फाऊंडेशन आणि सलाम बॉम्बे फाऊंडेशन यांच्या संय़ुक्त विद्यमाने नाशिकच्या ग्रामीण भागात प्रथमच राबविणार शालेय कौशल्य विकास उपक्रम
एव्हरेस्ट फाऊंडेशन आणि सलाम बॉम्बे फाऊंडेशन यांच्या संय़ुक्त विद्यमाने नाशिकच्या ग्रामीण भागात प्रथमच राबविणार शालेय कौशल्य विकास उपक्रम
मुंबई,२६ नोव्हेंबर २०२१: - नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावच्या १३ ते १५ वर्षे वयोगट असलेल्या किशोरवयीन मुलांना खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटा गवसणार आहेत. एव्हरेस्ट फाऊंडेशनच्या मदतीने सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या शालेय कौशल्य विकास उपक्रम (स्कील्स@स्कूल) या कार्यक्रमाचा लाभ या मुलांना होणार आहे. सलाम बॉम्बे फाऊंडेशन शहरातील शाळांमध्ये राबवत असलेले शालेय कौशल्य विकास उपक्रम आता ग्रामीण भागात प्रथमच राबविला जाणार आहे. करंजवणच्या जनता विद्यालय व उच्च माध्य. विद्यालयात या उपक्रमाचे उदघाटन शुक्रवार, २६ नोव्हेंबर रोजी झाले. या उदघाटनास नाशिक जिल्ह्याच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीम. अनिसा तडवी, महाराष्ट्र नाशिक विभागच्या सहाय्यक संचालिका पुष्पावती पाटील, दिंडोरी गटाचे गट शिक्षण अधिकारी कलवन कनोज, लखमपूर येथील एव्हरेस्ट इंडस्ट्रीचे प्लान्ट हेड विजेन्द्र बाबू, एव्हरेस्ट इंडस्ट्रीचे सीएसआर आणि एचआर प्रमुख श्रीम. सुलक्षा शेट्टी, सलाम बॉम्बे फाऊंडेशनचे उपाध्यक्ष गौरव अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील तरुण जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी सज्ज असायला हवा. त्यासाठी त्याला किशोरवयातच शाळेमधून आधुनिक कौशल्याचे प्रशिक्षण मिळणॆ आवश्यक आहे. त्याचप्रमाणॆ त्याला जीवन जगण्याचे धडॆ मिळणॆ सुद्धा गरजेचे आहे. २१ व्या शतकातील स्पर्धात्मक युगात नोकरी मिळवण्य़ासाठी कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.
या साऱ्या गरजा ध्यानात घेऊन सलाम बॉम्बे फाऊंडेशनने शालेय कौशल्य विकास उपक्रमाची निर्मिती केली आहे. शासकीय आणि शासकीय अनुदान संचालित शाळांमधील किशोरवयीन मुलांना कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाते. आताच्या काळात आवश्यक असलेले कौशल्य शिक्षण ही मुले पूर्ण करुन त्याद्वारे अर्थार्जन करतील. यामुळॆ त्यांचे शलेय शिक्षण सुरुच राहिल. या अशा प्रशिक्षणामुळॆ या किशोरवयीन मुलांना तांत्रिक आणि कौशल्य विकासासोबतच बाजारपेठ आणि विविध संस्थेची ओळख होते. यापूर्वी हे सारं या मुलांच्या परिघापलिकडॆ होत्ं. सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मदतीने ही तरुण शिकाऊ मुले आता स्वत:ची यशोगाथा तयार करतील.
या कार्यक्रमात सहभागी होणारा प्रत्येक मुलगा गृहोपयोगी उपकरण दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, ब्युटी ऍण्ड वेलनेस, बेकरी ऍण्ड कन्फेक्शनरी, फॅशन डिझाईन आणि ज्वेलरी डिझाईन सारखी व्यावसायिक कौशल्ये शिकणार आहे. हे अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) राष्ट्रीय कौशल्य पात्रता चौकट (एनएसक्यूएफ) शी निगडीत आहेत. महत्वाचं म्हणजे कार्यक्रमाचा भाग म्हणून या मुलांना आर्थिक साक्षरतेचे धडे देखील देण्यात येणार आहे.
या भागीदारीचा भाग म्हणून २०२१ ते २०२४ या तीन वर्षांत सुमारे ९०० मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. करंजवणचे जनता विद्यालय, लखमपूरचं कडावा इंग्लिश स्कूल, अशेवाडीचे रामशेज माध्यमिक विद्यालय या शाळेतील हे विद्यार्थी आहेत. पुढच्या पिढीसाठी विकासाच्या वाटा या आपल्या बोधवाक्यास शालेय कौशल्य विकास उपक्रम (स्कील्स ऍट स्कूल) खऱ्या अर्थाने अंमलात आणत आहे. उपक्रमाच्या दृष्टीने हा परिसर नवीन असल्याने सध्या या मुलांकरिता शिकाऊ उमेदवारी मिळणे काहीअंशी अवघड आहे. हे फक्त अर्थार्जन नसून या मुलांनी आपल्या शिक्षणासाठी हातभार लावता येणॆ शक्य होईल म्हणून मिळालेल्या संधीचे सोने करावे.
Comments
Post a Comment