मालवणी चवीसाठी २६ वर्षांचा लौकिकप्राप्त असलेले दादरस्थित दादरचे मालवण किनारा

 मालवणी चवीसाठी २६ वर्षांचा लौकिकप्राप्त असलेले 

दादरस्थित दादरचे मालवण किनारा

 
खवय्यांसाठी मालवणच्या अस्स्ल चवीची पर्वणी
 
कोकणच्या अस्सल जेवणासाठी मुंबईकरांची दादरला आल्यानंतर पहिली पसंती असते ती मालवण किनारा हॉटेलची. पोर्तुगीज चर्चच्या समोरच असलेले हे रेस्टॉरन्ट नेहमीच खवय्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात जिभेचे चोचले पुरवायला वेळ नसतो. अशा वेळी जवळ एखादं अस्सल मालवणी त्यातही नॉनव्हेज जेवण मिळणारं हॉटेल असेल तर क्या बात है, हाच विचार खवय्यांच्या मनात असतो. त्यामुळेच मालवण किनारा ही त्यांच्यासाठी पर्वणी आहे. 

 
प्रदीप राणे यांनी २६ वर्षांपूर्वी हे हॉटेल सुरु केले. त्यांचा प्रवास संघर्षमय राहिला पण त्यांनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच गुणवत्तेवर भर दिला. मासळीची रोजची खरेदी आणि स्वतः कुटलेले मसाले हे पथ्य त्यांनी आजपर्यंत पाळले आहे. याकामी त्यांना त्यांची सहचारिणी नीना यांचीही खंबीर साथ आहे. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पुरुषाला साथ लागते ती त्याच्या पत्नीची! हा व्यवसाय करताना सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर त्यांच्या पत्नी नीना राणे यांचा. मालवणी मसाले बाजारातून आणण्यापासून ते दळण्यापर्यंतची सगळी कामं हे दोघेच स्वत: करतात. हा सगळा खटाटोप केवळ घरच्यासारखा रुचकर स्वाद पदार्थाला यावा यासाठी आणि आपल्या ग्राहकांना ‘क्वांटिटी’बरोबरच ‘क्वालिटी’ही मिळावी यासाठी. यामुळे नावारुपाला आलेल्या या हॉटेलचे चक्क नावच चोरण्याची किमया काही महाभागांनी केली आहे. याचा त्रास होत असला तरी त्यांनी गुणवत्तेच्या जोरावर आपला ग्राहकवर्ग टिकवून ठेवला आहे. 
मालवणी कोंबडी-वडे, प्रॉन्स मसाला, प्रॉन्स तवा फ्राय, तळलेलं पापलेट, मालवणी चिकन, बांगडा मसाला, प्रॉन्स सुके, तिस-या मसाला, बोंबिल, तिस-या, खेकडे, त्याचबरोबर चिकन आणि मटणाच्या डिशेसची विविधता असे अनेक पदार्थ त्यांच्याकडे असून प्रत्येक पाककृतीचे एक वेगळे वैशिष्ट्यं आहे. मेनूकार्डावरील त्यांची नावे वाचतानाच खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते आणि नेमके काय मागवावे, याच्यावर त्यांची चर्चा सुरु होते. प्रत्येक पदार्थ इथला खास आहे. त्याची चव एकदम मस्तच आहे.

प्रॉन्स आणि तिस-याच्या डिशची मागणीही जास्तच असल्याचं प्रदीप राणे सांगतात. त्यांची स्पेशल डिश म्हणून याच पदार्थाचं नाव आधी येतं. कोकणातील अस्सल पदार्थाची चव जर कुठे अनुभवता येईल तर ती इथेच.
लवणी पदार्थामध्ये सोलकढीला विसरून कसं चालेल? इथं मिळणा-या सोलकढीची चवच न्यारी आहे. अस्सल मालवणी!  
याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या पदार्थांचे दर अगदी माफक आहेत. त्यामुळे खिशाला फार फटका बसत नाही. येथे अस्सल मालवणी आणि नोनव्हेज पदार्थांची चव चाखायला दूरदूरून खवय्ये येतात. येथे व्हेज थाळीदेखील आहे.  
पापलेट, सुरमई, रावस , बांगडा, बोंबील, मांदेळी  या माश्यांच्या फ्राय डिशपासून ते अगदी बोंबील भुजणं, किसमूर, मोरीचं कालवण, तिसऱ्या सुके ,जवळा मसाला  आणि खेकडे असे एकामोगामाग एक तोंडाला पाणी सुटेल अश्या रुचकर मेजवानीचे मेन्यूकार्डच इथे आपल्याला मिळते. 
ग्राहकांच्या सेवेसाठी राणे दांपत्य सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत कार्यमग्न असते. केवळ कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा गणशोत्सव आणि त्यांच्या मालवण गावातील आंगणेवाडीची यात्रा एवढाच कालावधी त्यांच्यासाठी सुट्टीचा असतो. अन्यथा वर्षभर ते खवय्यांची चव भागवत असतात.
मालवण किनारा गेल्या २६ वर्षांपासून लौकिकप्राप्त आहे. त्यामुळे दादर येणा-या प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी येऊन मालवणी जेवणाचा आस्वाद घ्यायला हवाच. एखाद्या कार्यक्रमासाठीही इथून ऑर्डर देऊन पदार्थ मागवता येतात. मुंबईत दादरपासून दूरवर राहणा-यांना ऑनलाईन पद्धतीने झोमॅटोच्या मदतीने पदार्थ मागवता येऊ शकतात. 
मालवण किनारा, दादर, मुंबई ४०००२८ इथे ९७५७४६२६९८ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE