एमजी मोटर्स बनली पवन-सौर संकरित ऊर्जेचा वापर करणारी भारतातील पहिली पॅसेंजर कार कंपनी
एमजी मोटर्स बनली पवन-सौर संकरित ऊर्जेचा
वापर करणारी भारतातील पहिली पॅसेंजर कार कंपनी
~ हलोल येथील एमजी उत्पादनकेंद्राला ५० टक्के ऊर्जा क्लीनमॅक्स विंड सोलार हायब्रिड पार्कमधून पुरवली जाणार ~
मुंबई, २६ नोव्हेंबर २०२१: एमजी मोटर इंडियाने हलोल येथील आपल्या एमजी उत्पादनकेंद्राला ४.८५ मेगावॅट पवन-सौर संकरित ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी आशियाची सर्वात विश्वासार्ह शाश्वत ऊर्जा सहकारी कंपनी क्लीन मॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि. (क्लीनमॅक्स) बरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे एमजी मोटर्स कंपनी १५ वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे २ लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन टाळण्यात यशस्वी होणार आहे, ज्याचे मूल्य १३ लाखांहून अधिक झाडे लावण्याइतके आहे.
क्लीनमॅक्सचे ध्येयधोरण एमजीच्या शाश्वत भवितव्याप्रती असलेल्या कटिबद्धतेशी मेळ साधणारे आहे. भारताची पहिलीवहिली प्युअर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही–एमजी झेडएस ईव्ही बाजारात दाखल करणारी ही कार कंपनी भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या (ईव्ही) वापराला प्रोत्साहन देण्याच्या कामी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. विजेवर चालणारी ही एसयूव्ही लोकांना शून्य कार्बन उत्सर्जन करणारी वाहने अंगिकारण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कंपनीने राबविलेल्या ‘चेंज व्हॉट यू कॅन’ या उपक्रमाचा भाग म्हणून बाजारात दाखल करण्यात आली.
खासगी ग्राहक आणि कॉर्पोरेट्सना हरितऊर्जेची विक्री करण्यासाठी गुजरातमध्ये एक पवन-सौर संकरित ऊर्जा उद्यान उभारणारी क्लीनमॅक्स ही पहिली पुनर्नवीकरणीय ऊर्जाउत्पादक कंपनी आहे. २०२२ पर्यंत आपली क्षमता १२० मेगावॅटपर्यंत वाढविण्याची कंपनीची योजना आहे. एमजी कंपनीचे हलोल केंद्र फेब्रुवारी २०२२ पासून राजकोटमधील क्लीनमॅक्स हायब्रिड पार्कमधून ऊर्जा स्वीकारणे सुरू करेल अशी अपेक्षा आहे व पुढील १५ वर्षे कंपनीकडून ही ऊर्जा स्विकारता येईल.
एमजी मोटर इंडियाचे प्रेसिडंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजीव छाबा म्हणाले, “शाश्वत भविष्याप्रती आमच्या बांधिलकीची हमी आम्ही दिली आहे आणि या गोष्टीने अनेकांना शून्य कार्बन उत्सर्जन करणारी वाहने अंगिकारण्यास आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या कामी आपले योगदान देण्यास प्रोत्साहित केले आहे. क्लीनमॅक्सबरोबर आम्ही साधलेला सहयोग म्हणजे हरित उत्पादन परिसंस्था विकसित करण्याच्या दिशेने आम्ही उचललेले आणखी एक पाऊल आहे. या निर्णयाद्वारे आम्हाला एका शाश्वत पर्यावरणाची उभारणी करण्याच्या कामातील आपली भूमिका अधिक चांगल्या प्रकारे पार पाडता येईल, अशी आम्हाला आशा आहे.“
क्लीनमॅक्सचे संस्थापक आणि एमडी कुलदीप जैन म्हणाले, “एमजी मोटर इंडियाने आपला सस्टेनिबिलीटी पार्टनर म्हणून क्लीनमक्सची निवड केली हा आमचा सन्मान आहे. कंपनीच्या एकूण ऊर्जा आवश्यकतेपैकी ५० टक्के ऊर्जा आमच्या संकरित प्रकल्पातून पुरविली जाणार असल्याने एमजी मोटर इंडियाच्या कार्यान्वयन खर्जामध्ये मोठी बचत झालेली दिसणार आहे व त्याचवेळी त्यांच्या कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घटही होणार आहे. एमजीआयला आमच्या सोल्यूशनचा भाग म्हणून, ते हे लाभ किमान रिस्क व विनासायास मिळवून देतील. कारण संपूर्ण कॅपेक्स व ऑपरेशन्स क्लीनमॅक्सकडे आहे. पवन-सौर संकरित ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी ऊर्जा एकल सौर किंवा पवन ऊर्जा केंद्रांप्रमाणे खंडित न होता अखंडपणे मिळत राहते, ज्यामुळे ग्राहकांना अधिक प्रमाणात पुनर्नविकरणीय ऊर्जेचा वापर करून आपली विजेची दैनंदिन गरज भागवता येते.“
Comments
Post a Comment