विदेशी कर्जाबाबत डॉ. आशुतोष रारावीकर यांचे `इंडियाज एक्स्टर्नल कमर्शिअल बॉरोईंग’ पुस्तक

पुस्तक समीक्षा

 विदेशी कर्जाबाबत डॉ. आशुतोष रारावीकर यांचे

`इंडियाज एक्स्टर्नल कमर्शिअल बॉरोईंग पुस्तक

बँका किंवा वित्तीय संस्थांमधून कर्ज घेण्याची प्रक्रिया अनेकांना ठावूक असते. मात्र, परदेशातील वित्तीय संस्थांकडून कर्ज म्हणजे ईसीबी घ्यायचे झाले तर नेमके काय करावे लागेल? त्याची प्रक्रिया काय आहे? याचा अभ्यास असणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती जरी किचकट असली तरी ती अत्यंत सोप्या पद्धतीने समाजवून देण्यासाठी `इंडियाज एक्स्टर्नल कमर्शिअल बॉरोईंग  – फिचर्स, ट्रेण्ड्स, पॉलिसी अँड इश्यूज हे डॉ. आशुतोष रारावीकर यांचे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.

भारत सरकार, रिझर्व्ह बँकेची धोरणे, कर्जाविषय़क संकल्पनात्मक मांडणी, विस्तार या अनुषंगाने त्यांनी ही माहिती दिली आहे. भारतात या प्रक्रियेचा प्रारंभ १९७० पासून झाला आहे. यात कर्ज घेण्याच्या पद्धतींविषयी माहिती देताना त्यातील जोखीमदेखील समजावून दिली आहे. त्यामुळेच वेळोवेळी बदललेले धोरण तसेच नियमावली हे देखील अभ्यासकांना यातून समजून घेता येऊ शकते. जागतिक अर्थव्यवस्थेत बदल सध्या झपाट्याने होत आहे. कोरोना काळानंतर तर त्याचे विशेष महत्व वाढले आहे. अर्थव्यवस्था अधिक सक्षम आणि बळकट करण्याच्या दृष्टीने प्रत्येक देश धडपडत आहे. अशा परिस्थितीत हा परदेशातील कर्जाविषयीचा तपशील हा कंपन्या तसेच कार्पोरेट क्षेत्रासाठी माहितीपूर्ण आहे.

अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याच्या प्रक्रियेत ईसीबीचाही महत्वाचा वाटा आहे. भारतातील अनेक उद्योगांसाठी परदेशातून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. भारतीय उद्योगांना परदेशी गुंतवणूक तर मिळावीच, त्याचबरोबर विदेशातून तिथल्याच चलनातील अल्प दरातील व्याजाने पतपुरवठा उपलब्ध व्हावा, हा यामागचा हेतू असून सरकारनेही त्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. ही प्रक्रिया आर्थिक धोरण खुले झाल्यानंतर होणारच होती. पण तिचा हा वेग कसा आहे, ही प्रक्रिया कशी विकसित होत आहे, याबाबतचा आढावा या पुस्तकातून डॉ. आशुतोष रारावीकर यांनी मांडला आहे.

विदेशी कर्ज आकर्षक वाटत असले तरी भारतीय उद्योगांना त्या कर्जात रुपयाच्या मूल्यात त्याची वाढ ही अधिक दिसणार आहे. त्याचा परतावादेखील त्यानुसारच असेल. जर रुपयाचे मूल्य घसरले तर मात्र त्याचा फार मोठा धोका किंवा जोखीम ही कर्ज घेणा-यांना सहन करावी लागेल. विदेशी कर्जाची परतफेड करता करता त्यांच्या नाकी नऊ येऊ शकते. चलनाचा दर आणि त्यातील अस्थिरता यांचे फार मोठे आव्हान उद्योगाला सहन करावे लागणार आहे. निर्यातीवरदेखील त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, या घटकांचाही विचार केला गेला पाहिजे. त्यातूनच मग संतुलनात्मक व्यवहार्य बाब विचारात घ्यावी लागेल, असा विचारदेखील यातून मांडला गेला आहे.

लेखक स्वतः रिझर्व्ह बँकेचे संचालकपदी कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचा दैनंदिन अर्थिक व्यवहाराशी बारकाईने संबंध येत असतो. अशावेळी त्यांनी परदेशातील कर्जाबद्दलच्या विषयाला घेऊन त्याची केलेली मांडणी तसेच विश्लेषण हे सर्वसामान्यांनाही समजू शकेल, असे लिहिले आहे. वास्तविक हा विषय अनेकदा क्लिष्ट वाटत असल्यामुळे अनेकांचा तो समजून घेण्याकडे कमी कल असतो. मात्र, उत्तम भाषा आणि त्याची योग्य मांडणी यामुळे पुस्तकाचा विषय सोपा झाला आहे.  

इंडियाज एक्स्टर्नल कमर्शिअल बॉरोईंग – फिचर्स, ट्रेण्ड्स, पॉलिसी अँड इश्यूज

लेखक – डॉ. आशुतोष रारावीकर

प्रकाशक – अल्टिमेट असोसिएट्स

पाने ५६, किंमत १०० रुपये.

 

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202