कॅननने समाजातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी दत्तक घेतलेल्या गावात मास्क बनवण्याच्या कार्यशाळेला सुरुवात
कॅननने समाजातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी दत्तक घेतलेल्या गावात मास्क बनवण्याच्या कार्यशाळेला सुरुवात
National, 2022: आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना कॅनन इंडियाने दत्तक घेतलेल्या गावामधील महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतल्याची घोषणा केली. यातून या महिलांसाठी उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकेल. सध्याच्या आव्हानात्मक काळात ग्रामीण महिलांमध्ये स्वावलंबन निर्माण करण्यासाठी दत्तक घेतलेल्या सर्व गावांमधील महिलांना शाश्वत रोजगार आणि हितकारक सुविधा पुरवण्याची आपली बांधिलकी कॅननने अधिक दृढ केली आहे.
आपल्या 4Es सीएसआर धोरणांनुसार, कॅनन इंडियाच्या ‘अडॉप्ट अ विलेज’ प्रकल्पात सक्षमीकरण हा मुख्य मुद्दा आहे. समुदायाच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्याचा दृष्टिकोन बाळगत या संस्थेने दत्तक घेतलेल्या गावांमधील महिलांसाठी शिवणक्लास आणि तरुणांसाठी सुरू करण्यात आलेल्या व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर्सच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत.
जागतिक महासंकटाच्या काळात ग्रामीण महिलांचा रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी कॅनन प्रयत्नशील होतीच. आता या महिलांना स्वतंत्रपणे उभे राहता यावे आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावता यावा यासाठी सक्षम करण्यासाठी कॅननने खास उपक्रम हाती घेतले आहेत. सध्याच्या काळात मास्कचे महत्त्व लक्षात घेऊन कॅननने दक्षिण भारतात बंगळुरुजवळ दत्तक घेतलेल्या अन्नादोडी गावात महिलांसाठी मास्क बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. यातील पहिल्या बॅचमध्ये 15 महिला आहेत. त्या पुढील तीन महिन्यांच्या काळात 5000 मास्क बनवतील. महिला उद्योजक तयार करण्याच्या आपल्या उद्दिष्टासह कॅनन या महिलांकडून हे मास्क विकत घेईल आणि सर्व दत्तक घेतलेल्या गावांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये ते वितरित केले जातील.
या भागीदारीबद्दल कॅनन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष मानाबु यामाझाकी म्हणाले, “आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांचे अभिनंदन करतो. घरी, बाहेर तुम्ही जे अथक महान काम करत असता त्यासाठी आभार मानायचे तर शब्द अपुरे पडतील, यावर माझा ठाम विश्वास आहे. ग्रामीण भागातील महिलांसमोर जी आव्हाने आहेत ती शहरी महिलांपेक्षा वेगळी आहेत. कॅननमध्ये आम्ही ‘क्योसेई’ हे आमचे कॉर्पोरेट तत्व कायम पाळतो. याचा अर्थ आहे सर्वांच्या भल्यासाठी एकत्र राहणे आणि काम करणे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी आम्ही दत्तक घेतलेल्या गावांमध्ये त्यांच्यासाठी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे आणि या महिलांना स्वावलंबी बनवणे हा आमच्या उपक्रमाचा उद्देश आहे. आम्ही गरजू समुदायाला मदत करत आहोत आणि त्याचवेळी सुसंगत सामाजिक मुद्द्यांवर जागरुकता निर्माण करून त्यांना उत्पन्न मिळवण्यासाठी विविध कौशल्यांनी सक्षम करत आहोत. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी आणि अधिक चांगल्या भविष्याची निर्मिती करण्यासाठी त्यांनी सक्षम बनावे यासाठी या महिलांनी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारावा म्हणून आम्ही त्यांना सक्षम बनवत आहोत.”
Comments
Post a Comment