कलर्सवरील शो 'डान्स दिवाने ज्युनिअर्स'मधील परीक्षकाच्या भूमिकेसह नीतू कपूर टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यास सज्ज
कलर्सवरील शो 'डान्स दिवाने ज्युनिअर्स'मधील परीक्षकाच्या भूमिकेसह नीतू कपूर टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यास सज्ज
शो सादर करेल 'दिवानी मोअर, डान्स होर्डकोअर
मुलांमध्ये सर्वात निर्मळ मन असण्यासोबत ते प्रतिभासंपन्न देखील असतात आणि आता ते कलर्सवरील नवीन शो 'डान्स दिवाने ज्युनिअर्स'सह नृत्याच्या मंचावर झळकण्यास सज्ज आहेत. 'डान्स दिवाने'ला मिळालेल्या भव्य यशानंतर कलर्स ज्युनिअर्स व्हर्जन घेऊन येत आहे, जेथे ४ ते १४ वर्षे वयोगटातील मुले दिवानगीने भरलेले त्यांचे नृत्यकौशल्य दाखवू शकतात आणि राष्ट्रीय मंचावर सोलो, ड्युएट किंवा ग्रुपमध्ये परफॉर्म करू शकतात.
तरूण डान्सर्स त्यांच्या प्रतिभेसह मंचावर धमालसादरकरण्यास सज्ज असताना चॅनेलने या शोची परीक्षक म्हणून बॉलिवुडच्या टाइमलेस ब्युटी स्टार अभिनेत्री नीतू कपूर यांची निवड केली आहे. त्या या शोच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहेत. त्यांच्यासोबत परीक्षक पॅनेलमध्ये असणार आहेत बॉलिवुड दिवा नोरा फतेही आणि प्रख्यात नृत्यदिग्दर्शक मर्झी पेस्टोन्जी.
परीक्षकाची भूमिका साकारण्याबाबत नीतू कपूर म्हणाल्या, ''आगामी डान्स प्रतिभांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी देणा-या शोचा भाग होण्याचा मला खूप आनंद होत आहे. मी शो 'डान्स दिवाने ज्युनिअर्स'मधील माझ्या भूमिकेला या लहानग्यांना मार्गदर्शन व पाठिंबा देण्याची एक जबाबदारी मानते. मी त्यांना मंचावर पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.''
'डान्स दिवाने ज्युनिअर्स'च्या ऑडिशन्सना सुरूवात झाली आहे आणि शो लवकरच कलर्सवर सुरू होणार आहे.
Comments
Post a Comment