बॉब फायनान्शिअल आणि क्रेडिटएआय यांनी एकत्र येऊन उन्नती को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड केवळ शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे.
बॉब फायनान्शिअल आणि क्रेडिटएआय यांनी एकत्र येऊन उन्नती को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड केवळ शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे.
'उन्नती' नावाने सादर केलेले, हे सह-ब्रँडेड क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना कॅशलेस क्रेडिटची सुविधा प्रदान करेल
मुंबई,15 मार्च, 2022: बॉब फाइनेंशियल सॉल्यूशंस लिमिटेड (BFSL), बँक ऑफ बडोदा (बॉब) ची पूर्ण मालकीची उपकंपनी, आणि क्रेडिटएआय फिनटेक प्राइवेट लिमिटेड (CAI), सिंगापूर आणि बंगळुरू येथील शेतकर्यांना डिजिटलायझेशन आणि क्रेडिट स्कोअरिंग सुविधा प्रदान करणारी कंपनी च्या सहकार्याने उन्नती एक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड केवळ शेतकऱ्यांसाठी लाँच केले आहे. हे संपर्क-रहित व्यवहार सुविधा असलेले कार्ड व्हिसा नेटवर्कवर सुरू करण्यात आले आहे.
उन्नती क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि लागवडीच्या कालावधीत कोणत्याही वेळी कृषी माल खरेदी करण्यास मदत करेल. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन (FPO) शेतकऱ्यांना या कार्डचे फायदे समजून घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी मदत करेल. उन्नती क्रेडिट कार्ड 'एंड-यूज मॉनिटरिंग' वैशिष्ट्यासह 'क्लोज-लूप सिस्टीम'मध्ये कार्य करेल, जे त्याच्या शेवटी कृषी कर्जाचा मागोवा घेण्यास आणि त्याचे निरीक्षण करण्यास सक्षम आहे.
क्रेडिटएआय च्या मालकीचे मोबाईल अॅप आणि इनपुट शॉप मॅनेजमेंट सिस्टम हे सुनिश्चित करेल की, या कर्जाचा अंतिम वापर मुख्यत्वे FPO च्या मालकीच्या दुकानांमध्ये शेतीसाठी आवश्यक असलेल्या निविष्ठांच्या खरेदीसाठी आहे. उन्नती क्रेडिट कार्ड हे विशेषत: शेतकऱ्यांना रोटेशनच्या आधारे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी, नूतनीकरणात विलंब टाळण्यासाठी डिझाइन केलेले आहे. सुरुवातीला, हे कार्ड क्रेडिट सुविधेसाठी मूलभूत मर्यादा प्रदान करेल, आणि कालांतराने, अधिक व्यवहार आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये देखील सुधारणा होईल. ही मर्यादा शेतकऱ्याच्या वैयक्तिक क्रेडिट स्कोअरवर आणि त्याच्या वास्तविक शेती गरजांवर अवलंबून वाढवता येऊ शकते.
लॉन्च विषयी माहिती देताना, बीएफएसएल (BFSL) चे एमडी आणि सीईओ, श्री. शैलेंद्र सिंग म्हणाले, “आम्ही क्रेडिटएआय या कृषी फिनटेक कंपनीसोबत ही भागीदारी करण्यास अत्यंत उत्साहित आहोत. क्रेडिटएआय ने एफपीओ (FPO) च्या बंद लूप नेटवर्कद्वारे तंत्रज्ञान शेतकर्यांच्या जवळ आणण्याचे प्रशंसनीय काम केले आहे. उन्नती को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड शेतकर्यांना त्यांच्या कृषी सायकल गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची उपलब्धता सुलभ करेल. बहुतेक शेतकर्यांना डिजिटल किंवा कॅशलेस क्रेडिटबद्दल माहिती नसते आणि हे लक्षात घेऊन उन्नती एक बंद लूप प्रोग्राम म्हणून डिझाइन केले गेले आहे जे त्यांच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर टाळेल. हे कार्ड फक्त संबंधित एफपीओ नेटवर्कवरून कृषी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वापरले जाऊ शकते. ही कल्पना अंमलात आणल्याबद्दल आणि आमच्या नेटवर्कची ओळख आणि कनेक्टिव्हिटी, ग्राहकांना माहिती पुरवण्यापासून आणि परतफेड करण्यात मदत करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर ग्राहक समर्थन पुरवल्याबद्दल आम्ही क्रेडिटएआयचे आभार मानतो. शेतकरी संपूर्ण देय रक्कम एकाच वेळी काढू शकत नाहीत हे लक्षात घेऊन आम्ही अत्यंत कमी व्याजदर देखील देऊ केला आहे. आम्हाला विश्वास आहे की वरील उपाययोजनांमुळे शेतकर्यांमध्ये कॅशलेस क्रेडिटचा प्रवेश सुलभ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या अनोख्या कार्यक्रमाबद्दल आम्ही खूप उत्सुक आणि आशावादी आहोत.”
Comments
Post a Comment