एयू स्मॉल फायनान्स बँकेची आपल्या पॅसेंजर व्हेइकल फायनान्स सोल्यूशन्ससाठी टाटा मोटर्सशी हातमिळवणी
एयू स्मॉल फायनान्स बँकेची आपल्या पॅसेंजर व्हेइकल फायनान्स सोल्यूशन्ससाठी टाटा मोटर्सशी हातमिळवणी
~ संपूर्ण पोर्टफोलियोमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत आकर्षक वित्तयोजना ~
ठळक मुद्दे :
ग्राहकाच्या प्रोफाइलनुसार सुयोग्य उत्पादने
पूर्वमंजुरी (प्रि-अप्रुव्ह्ड) असलेल्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी AU 0101 अॅपच्या माध्यमातून कार लोनसाठी अर्ज
पगारदार, स्वयंरोजगार असलेल्या, कृषी व दूध उत्पादक शेतकऱ्यांपासून प्रथमच कर्ज घेणार असलेल्या ग्राहकांपर्यंत विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी लागू
ग्रामीण, शहरी व महानगरांमध्ये उपलब्ध
7 वर्षांपर्यंत परतफेडीची मुदत
एयू स्मॉल फायनान्स बँक या भारतातील सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेतर्फे आज टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह बँकेसोबत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कंपनीच्या प्रवासी गाड्या व युटिलिटी व्हेइकल्सच्या नव्या फॉरएव्हर रेंजसाठी ग्राहकांना आकर्षक वित्त पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रत्येक व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार या योजनेच्या अंतर्गत वाहनखरेदीसाठी कमाल वित्तसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण ईएमआय पर्याय, तसेच सात वर्षांपर्यंत परतफेड मुदत मिळणार आहे. या ऑफर्स पगारदार, स्वयंरोजगार असलेल्या, कृषी व दूध उत्पादक शेतकऱ्यांपासून प्रथमच कर्ज घेणार असलेल्या ग्राहकांपर्यंत विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी लागू असणार आहेत. त्याचप्रमाणे पूर्वमंजुरी असलेल्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहक AU 0101 अॅपच्या माध्यमातून कार लोनसाठी अर्ज करू शकतात.
या प्रसंगी एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या व्हील्स बिझनेसचे प्रमुख श्री. भास्कर करकेरा म्हणाले, “प्रवासी वाहन कर्जांसाठी वित्त सहाय्यक म्हणून टाटा मोटर्सशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. या सहयोगाच्या माध्यमातून ग्रामीण, निम-शहरी व शहरी बाजारपेठांमध्ये असलेल्या या दोन्ही ब्रँड्सच्या व्याप्तीचा आम्ही उपयोग करू घेऊ शकू आणि स्वतःच्या मालकीचे वाहन असण्याचे अनेक भारतीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना सक्षम करू शकू. बँकेने टाटा मोटरशी केलेली हातमिळवणी ही ग्राहकांसाठी दोन्ही बाजूंनी अत्यंत लाभदायी असणार आहे. कारण त्यांना सर्वोत्तम वाहतूक पर्याय एयू बँकच्या उत्तम वित्त पर्यायाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. AU 0101 अॅपचा वापर करून ग्राहकांना वाजवी किमतीत आकर्षक पूर्वमंजुरी ऑफर्स अॅक्सेस करता येतील. इलेक्ट्रिक वाहनांसाठीची मागणी वाढत असतानाच अशा उत्सर्जन-स्नेही वाहतूक पर्यायांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देत हरित, उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्यास आम्ही उत्सुक आहोत. भारतातील टारगेट बाजारपेठांमध्ये आमच्या कार लोन सुविधा आकर्षक वाटतील, याची आम्हाला खात्री आहे. उदयोन्मुख भारताच्या गरजांची पूर्तता करण्याचे बँकेचे प्रयत्न या हातमिळविणीने सिद्ध झाले आहेत.”
या सहयोगाबद्दल टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लि.च्या नेटवर्क मॅनेजमेंट अँड ईव्ही सेल्स विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री. रमेश दोराइराजन म्हणाले, “सुलभ अर्थसहाय्य व लवचिक परतफेड पर्यायांसह व्यापक प्रमाणावरील ग्राहकांना आमच्या वाहनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्यासाठी एयू स्मॉल फायनान्स बँक या भारतातील सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेशी भागीदारी करताना आम्हाला आनंद झाला आहे. वाजवी दरात व्यक्ती व कुटुंबांसाठी वाहतूक पर्याय अधिक परवडण्याजोगे व उपलब्ध करून देण्याच्या टाटा मोटर्सच्या उद्दिष्टाशी सुसंगत अशी ही हातमिळवणी आहे. या यशस्वी व परस्परलाभदायी ठरणाऱ्या भागीदारीसाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.”
Comments
Post a Comment