ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलद्वारे मुलुंडच्या ६०व्या शाखेचे उद्घाटन
ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलद्वारे मुलुंडच्या ६०व्या शाखेचे उद्घाटन
पुढील दोन वर्षांत भारतभर १०० पेक्षा अधिक पर्यंत शाखा खोलण्याचे समूहाचे उद्दिष्ट आहे.
मुंबई, ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, भारतातील अग्रगण्य के१२ शाळा शृंखलेने मुलुंड, मुंबई येथे आपली ६०वी शाखा उघडली आहे. शाखा ही सर्वात सोयीस्कर ठिकाणी स्थित असल्याने आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास जवळच हॉस्पिटल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन सुविधा असल्यामुळे, या शाखेकडे आधीच विद्यार्थ्यांची समाधानकारक संख्या आकर्षित होत आहे. ऑर्किड्स इंटरनॅशनल ट्रस्टचे अध्यक्ष श्री रणजीत एस, चव्हाण यांच्या हस्ते पूजन करून शाखेचे दरवाजे उघडण्यात आले.
ही शाळा हिरवाईच्या मधोमध वसलेली आहे, जी गजबजलेल्या शहराच्या गजबजाटात नैसर्गिक वातावरणात वाढण्याची एक अनुभूती प्राप्त करून देईल. ही शाळा २६,००० चौरस फूट क्षेत्रफळावर बांधली गेली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट सुविधांसाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या सोयींमध्ये सुसज्ज ग्रंथालय, फुटबॉल मैदानात प्रवेश, थिएटर रूम, इनडोअर जिमखाना, सॉफ्ट प्ले एरिया, आउटडोअर जिम, म्युझिक रूम, सायन्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, इन्फर्मरी आणि समुपदेशन कक्ष इ. चा समावेश आहे. तथापि, सर्व ओआयएस शाखांप्रमाणे, प्रमाणित विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर राखण्यासाठी शाळा केवळ १,५०० विद्यार्थ्यांना प्रवेश देईल.
अधिकृत उद्घाटनप्रसंगी, श्री विवेक पटेश्वरी, उपाध्यक्ष मार्केटिंग यांनी टिप्पणी केली की, “कोविड-१९ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे अनेक स्वतंत्र शाळांना, त्यांच्या संस्था अपुऱ्या निधीमुळे बंद कराव्या लागल्या, ज्यामुळे हजारो मुलांचे शिक्षण खंडित झाले. आम्ही, ऑर्किड्स येथे, या शाळांचे पुनरुज्जीवन करण्याचे आणि सर्व प्रकारच्या सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, तांत्रिक आणि पायाभूत सुविधा पुरवण्याचे वचन दिले आहे आणि त्यांना ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल असे नवीन नाव दिले आहे.” "या प्रचंड लोकसंख्येच्या परिसरात सीबीएसईचा शाळा नसल्यामुळे, आम्ही तेथे पाऊल टाकून स्थानिकांसाठी नाविन्यपूर्ण आणि प्रगत शैक्षणिक कौशल्य आणण्याचा निर्णय घेतला," त्यांनी शेवटी म्हटले.
Comments
Post a Comment