लक्स इंडस्ट्रीजने आणली आहे आपल्या 'लक्स कोझी' ब्रॅण्डच्या चोखंदळ ग्राहकांसाठी 'चेहरे पे मुस्कान'
लक्स इंडस्ट्रीजने आणली आहे आपल्या 'लक्स कोझी' ब्रॅण्डच्या चोखंदळ ग्राहकांसाठी 'चेहरे पे मुस्कान'
~ तरुणाईच्या मनावर राज्य करणा-या वरुण धवनची प्रमुख भूमिका असलेल्या जाहिरात मोहिमेच्या फिल्ममध्ये लक्स कोझीकडून ग्राहकांना देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट आरामदायी आणि उंची अनुभव अधोरेखित केला गेला आहे ~
राष्ट्रीय, १५ मार्च २०२२: आपल्या अभिनव आणि ग्राहकांच्या मागणीला प्राधान्य देणा-या उत्पादनांसाठी ओळखला जाणारा, पुरुष, महिला आणि मुलांसाठी अंतर्वस्त्र आणि इतर कपड्यांची संपूर्ण श्रेणी पुरविणा-या १४ प्रमुख ब्रॅण्डस् द्वारे १०० हून अधिक उत्पादने बाजारात आणणारा लक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (BSE: 539542 | NSE: LUXIND) हा अंतर्वस्त्र उत्पादनाच्या क्षेत्रातील भारताचा सगळ्यात मोठा ब्रॅण्ड 'चेहरे पे मुस्कान' या आपल्या नव्या जाहिरात मोहिमेद्वारे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'लक्स कोझी' या ब्रॅण्डसाठी तयार करण्यात आलेली ही नवी जाहिरात मोहीम प्रामुख्याने लक्स कोझी उत्पादनांद्वारे ग्राहकांना मिळणा-या सर्वोच्च आरामदायी आणि उंची अनुभवाला अधोरेखित करते. हा अनुभव त्यांना मनापासून आनंदी बनवतो आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या चेह-यावरील हास्यामध्येही उमटते असा संदेश या जाहिरातीतून देण्यात आला आहे. १८ ते ३० वर्षे (शहरी+ग्रामीण) वयोगटातील पुरुष ग्राहकांना अनुलक्ष्यून तयार करण्यात आलेल्या या जाहिरात मोहिमेमध्ये भारताच्या युवावर्गाच्या मनावर राज्य करणारा अभिनेता आणि लक्स कोझीचा ब्रॅण्ड अम्बॅसेडर वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. ऑगिल्व्ही मुंबई ही संस्था या फिल्मची क्रिएटिव्ह एजन्सी आहे तर कॉरकॉइस फिल्म्सच्या श्रीम. नेहा कौल यांनी या फिल्मचे दिग्दर्शन केले आहे. सध्या टेलिव्हिजन, सोशल मीडिया, आउटडोअर, प्रिंट आणि ऑन ग्राऊंड चॅनल्स अशा सर्व माध्यमांतून ही मोहीम प्रदर्शित होत आहे.
बाजारात नव्याने दाखल होत असलेल्या या मोहिमेबद्दल लक्स कोझी इंडस्ट्रीजचे एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर श्री. साकेत तोडी म्हणाले, "लक्समध्ये आम्हाला नेहमीची इतर कशाहीपेक्षा ग्राहकांचे विचार आणि त्यांचे वागणे महत्त्वाचे वाटत आले आहे. त्यांची पसंती आणि मते यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेत आलो आहोत, तर त्यांच्या विचारांनी आम्हाला आमच्या ब्रॅण्डची प्रतिमा घडविण्यासाठी व आपला व्यवसाय योग्य दिशेने वेगाने घेऊन जाण्यासाठी मदत केली आहे. ही मोहीम म्हणजे आमच्या याच तत्त्वाचे द्योतक आहे. एक ब्रॅण्ड म्हणून लक्स कोझीने गतीशील असावे आणि ग्राहकांच्या पावलांशी पावले जुळवून पुढे वाटचाल करावी असे आम्हाला वाटते. लक्स कोझीच्या आजच्या ग्राहकवर्गाला एका हॅपी झोनची, स्वत:च्या आनंदी कोप-याची गरज वाटत आहे आणि या जाहिरातीमुळे त्यांच्या चेह-यावर हसू उमटेल याची आम्हाला खात्री आहे."
लक्स इंडस्ट्रीजचे एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर श्री. उदीत तोडी म्हणाले, "लक्समध्ये आम्ही आपली उत्पादने ग्राहकांच्या गरजांना साजेशी असावीत यासाठी नेहमीच प्रयत्नरत राहिलो आहोत. या ग्राहकवर्गाच्या प्राधान्यक्रमामध्ये आरामशीरपणा आणि उंची अनुभव या दोन गोष्टींना सर्वोच्च स्थान असल्याचे आमच्या संशोधनातून दिसून आले आहे आणि म्हणूनच अपेक्षित ग्राहकवर्गासाठी या दोन्ही गोष्टींचा मिलाफ साधणारी उत्पादने आदर्श ठरतील असे आम्हाला वाटते. आमच्या ब्रॅण्डला आपल्या थर्ड जनरेशनच्या गरजांची किती चांगली जाण आहे हे या जाहिरातीमधून ठळकपणे दिसून येते. नव्या जाहिरातीने प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे चांगलेच वळवून घेतले आहे आणि सर्व सोशल मीडिया चॅनल्सवर या जाहिरातीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे असे मी ऐकून आहे.
Comments
Post a Comment