कनेक्ट इनसाइट्स प्रीमियर लीगने क्रिकेटचे यशस्वीपणे आयोजन केले
कनेक्ट इनसाइट्स प्रीमियर लीगने क्रिकेटचे यशस्वीपणे आयोजन केले
टीम ऑबर्न डिजिटल सोल्युशन्सने नॉट-फॉर-प्रॉफिट ‘प्रीमियर लीग’ स्टाइल क्रिकेट टूर्नामेंटची ट्रॉफी जिंकली
.
28 मार्च 2022, मुंबई: कनेक्ट इनसाइट्स, भारतातील अग्रगण्य ओम्निचॅनल ग्राहक अनुभव व्यवस्थापन प्लॅटफॉर्म ने, नॉट फॉर प्रॉफिट 'प्रीमियर लीग' शैलीतील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते, भागीदार नोलारीटी (KNOWLARITY) आणि येलो.येआय (Yellow.ai)सोबत. ज्याचे उद्दिष्ट आपल्या सहकारी समुदायाला आवश्यक असलेल्या बाहेरच्या विश्रांतीसाठी एकत्र आणणे आहे.‘कनेक्ट इनसाइट्स प्रीमियर लीग’ (KIPL) हया ब्रॅण्डने, हा विशेष कार्यक्रम डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्लब, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे आयोजीत केला होता
टीम हंसा डायरेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑबर्न डिजिटल सोल्युशन्स या टीम्सने खिलाडूवृत्तीने याचा सामना केला, ज्याचा पराकाष्ठा ऑबर्न डिजिटल सोल्युशन्सने विजयी ट्रॉफी उचलून केला आणि प्रतिस्पर्धी संघांना चिकाटीने पराभूत केले.
अंतिम सामन्यात ते 5 धावांनी विजयी झाले आणि त्यांना समीर नारकर, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, कनेक्ट इनसाइट्स - प्रुडेन्स अॅनालिटिक्स आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रा.लिमिटेड यांच्या हस्ते ट्रॉफी आणि भेट बक्षीस प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशाबद्दल श्री.समीर नारकर यांनी टिप्पणी करताना म्हणाले कि,“आम्ही काही काळा पासून ओमनीचॅनेल ग्राहक अनुभव व्यवस्थापनाच्या व्यवसायात आहोत आणि आमच्या इकोसिस्टममध्ये काही मजबूत भागीदारी वाढविण्यात सक्षम झालो आहोत ज्यामुळे आम्हाला आव्हानांवर मात करण्यात, भरभराट होण्यासाठी आणि झपाट्याने विस्तारित होण्यास मदत झाली आहे. आता आम्ही साथीच्या रोगानंतरच्या पुनर्प्राप्ती कालावधीत प्रवेश केला आहे, आम्हाला आमचा व्यवसाय नवीन उंचीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि ज्यांनी या काळात आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांच्याबद्दल आम्हाला कृतज्ञता दाखवायची आहे. आम्ही एकत्रितपणे काम करण्यास उत्सुक आहोत आणि आमच्या समुदायालाही हया प्रयत्नांद्वारे फायदा होईल अशी आशा आहे.”
समुदायाला परत देण्याच्या आणि सर्वसमावेशकतेला चालना देण्याच्या प्रयत्नात, पाच धर्मादाय संस्था देखील कनेक्ट इनसाइट्स प्रीमियर लीगमध्ये सामील झाल्या आणि त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यामध्ये अॅक्सेस लाइफ असिस्टन्स फाउंडेशन, स्पार्क ए चेंज फाउंडेशन, माय हेल्पिंग हँड्स (एमएचएच), डॉन बॉस्को डेव्हलपमेंट सोसायटी आणि यश चॅरिटेबल ट्रस्ट यांचा समावेश होता.
Comments
Post a Comment