सनटेकने निसर्गरम्य सुरुची बीचवर समुद्रप्रेमींना दिली प्रेरणा
सनटेकने निसर्गरम्य सुरुची बीचवर समुद्रप्रेमींना दिली प्रेरणा
वसई (प) येथील सुरुची बीच येथे सनटेकने राबविले शाश्वत जीवनशैली अभियान
वसई (प) येथील सुरुची बीच येथे सनटेकने राबविले शाश्वत जीवनशैली अभियान
वसई (प.) येथील सुरुची बीचवर सनटेक रिअल्टीने युनायडेट वे मुंबई या एनजीओच्या सहयोगाने शाश्वत जीवनशैली अभियानाची सुरुवात केली. सुरुची बीच येथे शाश्वत जीवनशैली अभियानात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झा, प्रतिष्ठित नागरिक आणि मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील इतर उत्साही व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई महानगर क्षेत्राच्या परिसरातील एक सर्वात स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही बीच म्हणून सुरुची बीच ओळखला जातो. येतील सुरुच्या बनासाठी तो प्रसिद्ध आहे. येथील निसर्गसुंदर सूर्योदय व सूर्यास्तासाठी हा बीच समुद्रप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे या बीचच्या आजुबाजूचा परिसरही तितकाच निसर्गसुंदर आहे. येथे अनेक कुटुंबे निवांतपणासाठी येतात, खेळतात, आराम करतात, मुलांसह मजा करतात आणि अनेक साहसी जलक्रीडाप्रकारांचा आनंद घेतात.
हे अभियान म्हणजे अधिवास व पर्यावरणाच्या अपग्रेडेशनमध्ये योगदान देण्यासाठी सुरू असलेल्या सनटेकच्या एन्व्हायरोन्मेंटल सोशल गव्हर्नन्स (ईएसजी) उपक्रमांचा एक भाग आहे. सनटेक रिअल्टीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कमल खेतान म्हणाले, “निसर्गसुंदर सुरुची बीचचे सागरी सौंदर्य राखण्यासाठी हा आमचा उपक्रम आहे. मुंबईमध्ये हरित वातावरण निर्माण करण्याची आणि निवांत व स्वच्छ समुद्रकिनाऱ्याचा अनुभव घेण्यासाठीची सुनिश्चितता करण्यासाठी उचललेले हे अजून एक पाऊल आहे. एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून आम्ही शाश्वततेसाठी प्रतिबद्ध आहोत. माझा समुद्रकिनारा ही माझी जबाबदारी आहे, अशी आमची धारणा आहे. निसर्ग आणि आपल्या ऐतिहासिक वारशाने दिलेल्या या निसर्गसुंदर भेटी जतन करण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा देण्याचे व सहभागी करून घेण्याचे सनटेकचे मिशन आहे, हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे."
चौपाटीचे सुशोभीकरण करण्याव्यतिरिक्त या कार्यक्रमांतर्गत चौपाटीवर जायचा मार्ग विस्तारीत केला आहे, त्यावर पामची झाडे लावली आहेत आणि पेव्हर ब्लॉक घातले आहेत. त्यामुळे हा बीच आता जगातील सुंदर बीचसारखा दिसतो आणि त्यामुळे येथे येणाऱ्यांचा आनंद वृद्धिंगत होतो.
युनायटेड वे, सुशोभीकरण मोहिमेने मोठा उत्साह निर्माण केला: या प्रेरणादायी अभियानाला पाठिंबा देण्यासाठी अनेक स्वयंसेवक तसेच उत्साही स्थानिक सहभागी झाले होते. युनायटेड वे मुंबई या संस्थेच्या कम्युनिटी इम्पॅक्ट विभागाचे उपाध्यक्ष अजय गोवळे म्हणाले, “सनटेक फाउंडेशनच्या सहकार्याने, सुरुची बीच दत्तक घेणे ही सुरुची बीचच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठीची आमची प्रतिबद्धतता आहे. आजच्या शाश्वतता जीवनशैली अभियानासह आपल्या चौपाट्यांसाठी आपल्या नागरिकांमध्ये अधिक प्रभाव पाडण्याची आणि संवेदनशील करण्याची आमची अपेक्षा आहे.”
या यशस्वी शाश्वतता उपक्रमाने समुद्रकिनाराप्रेमींमध्ये उत्साह निर्माण केला आणि प्रेरणा दिली. अभिनेत्री आणि संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाची गुडविल अॅम्बेसेडर दिया मिर्झा म्हणाली, “सनटेक शाश्वत जीवनशैली अभियानाच्या उदात्त ध्येयामुळे या अभियानात सहभागी झाल्याने मी रोमांचित झाले आहे. एक मुंबईकर म्हणून मी नेहमीच निसर्गाचे सौंदर्य जपण्यासाठी इच्छुक असते. त्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल आहे.
सनटेक रिअल्टीबद्दल
सनटेक रिअल्टीज लिमिटेड (एसआरएल) ही मुंबई एक वेगाने वाढणारी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे. निव्वळ डेट/इक्विटीचे नगण्य प्रमाण, आर्थिक दूरदृष्टी आणि शाश्वत वाढ असण्याचा एसआरएलचा निष्कलंक ट्रॅक रेकॉर्ड आहे. 19 प्रकल्पांमध्ये विस्तारलेल्या एकूण सुमारे 50 दशलक्ष चौरस फुटांच्या शहरकेंद्री विकास पोर्टफोलिओवर कंपनीचा भर आहे. सनटेक रिअल्टीने आपले प्रकल्प त्यांच्या पाच ब्रँडअंतर्गत विभागले आहेत - ‘सिग्नेचर’ उबर लक्झरी रेसिडन्सेस, ‘सिग्निया’ : अल्ट्रा लक्झरी रेसिडन्सेस, ‘सनटेक सिटी’ : प्रीमिअम लक्झरी रेसिडन्सेस, ‘सनटेक वर्ल्ड’ : अॅस्पिरेशनल लक्झरी रेसिडन्सेस, ‘सनटेक’ : व्यावसायिक आणि रिटेल विकास. वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) सिग्नेचर आयलंड फ्लॅगशिप प्रकल्प, गोरेगाव येथील ओशिवरा डिस्ट्रिक्ट सेंटरमधील (ओडीसी) सनटेक सिटी, मुंबई महानगर क्षेत्राच्या पश्चिम उपनगरांमधील सर्वात मोठी टाऊनशिप असलेला नायगाव येथील सनटेक वर्ल्ड अशी आयकॉनिक ठिकाणी उभारण्यामध्ये कंपनी ट्रेंडसेटर आहे.
Comments
Post a Comment