वोडाफोन आयडिया फाऊंडेशन- प्रेरणादायी कार्यासाठी या पाच स्त्रियांचा गौरव करण्यात आला.

वोडाफोन आयडिया फाऊंडेशन- प्रेरणादायी कार्यासाठी या पाच स्त्रियांचा गौरव करण्यात आला.

 

यशस्वी महिलांची ओळख:

 

 

  • भावना पालीवाल: राजस्थानमध्ये राहणाऱ्या श्रीमती भावना पालीवाल गावोगाव जाऊन डिजिटल साक्षरतेचा प्रसार करतात. त्या म्हणतात – महिलांना सबल व स्वतंत्र बनवण्यासाठी डिजिटल साक्षरता खूप महत्त्वाची आहे. मी वोडाफोन आयडिया फाऊंडेशनची आभारी आहे की त्यांनी माझा संदेश गावागावांमधील इतर महिलांपर्यंत नेऊन पोहोचवण्यात मला मोलाची मदत केली."

 

  • रीटा मोंडल यांच्या परिणामांवर आधारित शिक्षण पद्धतींनी छत्तीसगढमधील युवा मुलींमध्ये शिक्षण क्रांतीची ज्योत पेटवली. त्या म्हणतात – देशातील युवा मुलींना शिक्षण मिळावे ही माझी मनःपूर्वक इच्छा आहे. शिक्षण ही अशी शक्ती आहे जी युवा मुलींना रूढ गोष्टींवर प्रश्न विचारण्याची आणि त्यांना मोडून काढण्याचे बळ प्रदान करते. ही शक्ती त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवते की त्यांच्यापैकी कोणासाठीच काहीच असाध्य नाही.

 

  • किरण गुप्ता यांनी स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना अनेक व्यावहारिक विषयांचे प्रशिक्षण दिले आहे.  संवाद साधणे, नेतृत्व, इंटरनेटचा वापर व ऑनलाईन पेमेंट्स अशा अनेक विषयांची माहिती त्यांनी या महिलांना दिली.  त्या सांगतात – महिलेला सबल करायचे असेल तर ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे खूप महत्त्वाचे असल्याचे मी शिकले.  जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असते तेव्हा तिच्यावर कोणी अंकुश ठेवू शकत नाही आणि ती तिच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी मुक्तपणे भरारी घेऊ शकते."

 

  • ममता ठाकूर यांच्या कुटुंबाला खते विकत घेता यावीत यासाठी आपले दागिने देणे भाग पडले होते. श्रीमती ममता यांनी सेंद्रिय शेतीचा स्वीकार केला आणि आता त्या या पद्धतींचा आपल्या गावामध्ये प्रचार करतात.  त्या सांगतात – फक्त पुरुषांचीच मक्तेदारी चालेल असा एकही व्यवसाय नाही.  सेंद्रिय शेतीमध्ये पुढाकार घेण्याच्या कामाचा मला खूप अभिमान वाटतो, मी या कामातून माझ्या समुदायासाठी एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.

 

झेबा खान एक शिक्षिका म्हणून पुढील पिढ्यांना प्रभावित करतात जेणेकरून भारत पुढील पिढ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि अधिक समान समाज बनेल.  त्या सांगतात – जगात कुठेही कोणाही महिलेला अजिबात असुरक्षित वाटता कामा नये. महिलांसाठी अधिक समान आणि म्हणूनच अधिक सुरक्षित समाज निर्माण करणे हे माझे जीवन उद्दिष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE