ग्राहकांसाठीच्या बहुप्रतिक्षित टेस्ट राइड्सद्वारे बाऊन्स इन्फिनिटीने मुंबई आणि पुण्यामध्ये आपला गती ठेवली कायम
ग्राहकांसाठीच्या बहुप्रतिक्षित टेस्ट राइड्सद्वारे बाऊन्स इन्फिनिटीने
मुंबई आणि पुण्यामध्ये आपला गती ठेवली कायम
- मुंबई, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद येथे ग्राहकांसाठीच्या टेस्ट राइड्सना सुरुवात
बंगळूरू, ८ मार्च २०२२: बंगळुरूमध्ये टेस्ट राइड्सचा पहिला आठवडा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर बाऊन्स इन्फिनिटीने चार प्रमुख शहरांमध्ये बाऊन्स इन्फिनिटी ई१ साठी टेस्ट राइड्स सुरू केल्या आहेत. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये ग्राहकांना वेगळा अनुभव देणाऱ्या या बहुप्रतिक्षित टेस्ट राइड्स सुरू होत आहेत. या शहरांमध्ये अनेक टच पॉईंटवर स्कूटर उपलब्ध असतील, तसेच स्मार्ट स्कूटर जागेवरच बुक करण्याचा पर्याय असेल. इच्छुक ग्राहक त्यांचे चाचणी राइड स्लॉट बाऊन्स इन्फिनिटी वेबसाइट - https://bounceinfinity.com/ वर आरक्षित करू शकतात.
बंगळुरूमध्ये टेस्ट राइड्सच्या पहिल्या आठवड्यात, कंपनीने २९०० हून अधिक व्यक्तींचा सहभाग नोंदवला, ज्यापैकी ५५% ग्राहकांनी लवकर डिलिव्हरीसाठी स्कूटर करता नोंदणी केली. कंपनी पुढील काही आठवड्यांमध्ये बाकीच्या शहरांमध्ये टेस्ट राइड्स आयोजित करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
बाउन्स इन्फिनिटी आपल्या नुकत्याच सादर झालेल्या ग्राहक इलेक्ट्रिक स्कूटर, बाऊन्स इन्फिनिटी ई-१ प्रमाणे बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क वाढवत आहे. २ डिसेंबर रोजी सादर करण्यात आलेली स्कूटर, 'बॅटरी अॅज अ सर्विस' पर्यायासह येते - भारतीय बाजारपेठेतील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. पारंपारिक स्कूटर्सच्या तुलनेत या स्कूटरची किंमत ४०%नी कमी होत आहे. बाऊन्स इन्फिनिटी ई-१ बॅटरीसह देखील सादर करण्यात आली आहे. या स्कूटरची बॅटरी स्कूटरमधून काढता येऊ शकते आणि ग्राहकांना त्यांच्या घरी किंवा कार्यालयात किंवा सोयीस्कर ठिकाणी चार्ज करता येते.
बाउन्स इन्फिनिटी ई-१ स्पोर्टी रेड, स्पार्कल ब्लॅक, पर्ल व्हाइट, डेसॅट सिल्व्हर आणि कॉमेट ग्रे या पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. पूर्वनोंदणी आजपासून सुरू होत असून एप्रिल २०२२ साठी डिलरशिप नेटवर्क आणि त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे संपूर्ण भारतात अखंड वितरणासाठी डिलिव्हरी सुरु होतील. ही स्कूटर ५०००० किमी पर्यंत ३ वर्षांच्या सर्वसमावेशक वॉरंटीसह मिळणार आहे.
· स्वॅप करण्यायोग्य बॅटरी - स्कूटरमध्ये बॅटरी अॅज अ सर्व्हिस आणि बॅटरी आणि चार्जरसह स्कूटर अशा दुहेरी पर्यायांसह असलेली भारतातील एकमेव स्कूटर
· बॅटरीसाठी कोणतीही गुंतवणूक नाही- बॅटरीच्या वापरासाठी प्रत्येक बॅटरी स्वॅपकरता पैसे भरणे
· प्रीमियम सेलसह 2KWhr लिथियम-आयन बॅटरीवर चालते
· प्रत्येक चार्ज वर ८५ किलोमीटर चालते
· स्मार्ट आणि व्यावहारिक वैशिष्ट्यांमध्ये रिव्हर्स मोड, क्रूझ कंट्रोल आणि ड्रॅग मोड समाविष्ट आहे
· बाउन्स इन्फिनिटीच्या ब्रशलेस डीसी मोटरसह कामगिरी, कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेचा चांगला समतोल
Comments
Post a Comment