इटॉनने भारतातील पहिली पुरवठा साखळी डिजिटल इन्क्युबेशन लॅब सुरू केली
इटॉनने भारतातील पहिली पुरवठा साखळी डिजिटल इन्क्युबेशन लॅब सुरू केली
मुंबई, इटॉन या ऊर्जा व्यवस्थापन कंपनी अलीकडेच भारतामध्ये पुण्यात पहिली पुरवठा साखळी इन्क्युबेशन लॅब सुरू केल्याची घोषणा करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील इटॉनच्या कार्यालयात ही लॅब स्थापन करण्यात येईल. कल्पन प्रक्रियेसाठी आणि प्रूफ ऑफ कन्सेप्ट्स (संकल्पनेचा पुरावा) दाखविण्यासाठी प्लॅटफॉर्म्स व डिव्हाइसेससोबत सहयोग करण्यासाठी या ठिकाणी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. क्लाउड तंत्रज्ञानासारख्या क्षमता आणि व्हीआर, ड्रोन, आयओटी सेन्सर व अशा अनेक घटकांचे फायदे या लॅबच्या माध्यमातून घेता येतील.
या डिजिटल लॅबचे उद्घाटन करताना इटॉनचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख पुरवठा साखळी अधिकारी रोगेरियो ब्रॅन्को म्हणाले, “अलीकडे उद्भवलेल्या पुरवठा साखळी आव्हानांमुळे प्रत्येक संस्थेमध्ये अतिरिक्ट डिजिटल तंत्रज्ञान गुंतवणूक असण्याला चालना मिळाली आहे. इटॉनच्या ग्लोबल सप्लाय चेन सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी डिजिटल इन्क्युबेशन लॅब ही वैचारिक केंद्र आहे. उद्योगक्षेत्रांमध्ये अभूतपूर्व बदल घडवून आणणाऱ्या डिजिटल कल्पनांना चालना देण्याचे आणि भविष्यातील तंत्रज्ञान कौशल्यासाठी आपल्या गुणवंतांना विकसित करण्याची या केंद्राची योजना आहे.”
या लाँचच्या वेळी इटॉन इंडियाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या ग्लोबल सप्लाय चेनचे संचालक उमाकांत नायर म्हणाले, “इटॉनमध्ये, आमच्या डिजिटल परिवर्तनात आणि पुरवठा साखळीला पुन्हा उभारी देण्याच्या प्रवासामध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी वैविध्यपूर्ण कौशल्ये व कल्पना महत्त्वाच्या असतात. कंपनीमध्ये डिजिटल वृत्ती व नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी ही लॅब तयार करण्यात आली आहे.
इटॉन ही इंटेलिजंट ऊर्जा व्यवस्थापन कंपनी असून जीवनमानाचा दर्जा सुधारणे आणि सगळीकडील लोकांच्या वातावरणाचे संरक्षण करण्यासाठी ही कंपनी प्रतिबद्ध आहे. सुयोग्य व्यवसाय करणे, शाश्वत पद्धतीने काम करणे आणि आमच्या ग्राहकांना वर्तमानात तसेच भविष्यात ऊर्जा व्यवस्थापना मदत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रिफिकेशन आणि डिजिटलायझेशनच्या जागतिक पातळीवरील वृद्धी कलाचा उपयोग करून घेत, आम्ही या ग्रहाचे नवीकरणीय ऊर्जेत संक्रमणाचा वेगन वाढवत आहोत. या माध्यमातून आम्ही जगातील सर्वात तातडीची ऊर्जा व्यवस्थापन समस्यांचे निराकरण करण्यास मदत करत आहोत. आमचे भागधारक व संपूर्ण समाजासाठी सर्वोत्तमाचा ध्यास आम्ही घेतला आहे.
Comments
Post a Comment