क्षयरोगाच्या वेळेवर व अचूक निदानाचे महत्त्व
क्षयरोगाच्या वेळेवर व अचूक निदानाचे महत्त्व
- डॉ. चंद्रशेखर नायर -
संचालक आणि मुख्य तांत्रिक अधिकारी (सीटीओ),
मोल्बियो डायग्नॉस्टिक्स
जगभरात क्षयरोग हे व्यंगाचे आणि मृत्यूचे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात दर वर्षी अंदाजे १ कोटी लोकांना क्षयरोगाची लागण होते. हा पूर्णपणे बरा होणारा आजार असला तरी क्षयरोगामुळे सुमारे १५ लाख लोक दर वर्षी मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे क्षयरोग हा जगात संसर्गजन्य रोगामुळे होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूंसाठी कारणीभूत असलेला मुख्य संसर्गजन्य रोग आहे.
ग्लोबल टीबी रिपोर्ट २०२१ नुसार कोव्हिड १९ महासाथीमुळे २०२० मध्ये नव्या रुग्णांच्या नोंदीवर मोठा परिणाम झाला. त्या आधीच्या वर्षीच्या तुलनेने २०२० मध्ये नव्या रुग्णाच्या नोंदींमध्ये ४१% घट दिसून आली. महासाथीच्या या अनपेक्षित परिणामाच्या हाताळणीसाठी ‘निदान-उपचार-प्रतिबंध-उभारणी’ हे एनएसपीचे चार स्तंभ भक्कम करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळे, २०३५ सालापर्यंत रुग्णनोंदीमध्ये ९०% घट आणि मृत्यूमध्ये ९५% घट हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे क्षयरोग निर्मूलन धोरणाचे महत्त्वाकांक्षी ध्येय साध्य करण्यासाठी अधिक परिणामकारक लस, उपचारांचा कालावधी कमी करणे आणि निदान चाचण्यांची उपलब्धता सुधारणे यासारख्या प्रयत्नांचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे. सुयोग्य आणि लवकरात लवकर निदान करणे ही क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्याची गुरुकिल्ली आहे.
वेळेवर व अचूक निदान केल्यामुळे नेमके आणि तत्काळ उपचार करता येतात. त्यामुळे आजार बरा होण्यास मदत मिळते आणि त्याचा फैलाव होण्याचे प्रमाण घटते. अजूनही ७०% लोक ग्रामीण भागात राहतात आणि विविध कारणांमुळे त्यांना दर्जेदार निदान सेवांची टंचाई भासते.
क्षयरोग आणि औषधाला प्रतिरोध करणाऱ्या क्षयरोगाच्या निदान करण्यासाठी अचूक चाचण्या, त्या परवडण्याजोग्या असणे, वेगवान असणे आणि उपचार केंद्रात त्या तैनात असणे यावर खूप भर दिला जाऊ शकत नाही.
खूप कालावधीपर्यंत रेण्वीय निदानाला भारतातील निदान क्षेत्रात फार महत्त्व दिले जात नव्हते. विशेषतः रिअल टाइम पीसीआर तंत्र, जे अनेक दशकांपूर्वी शोधण्यात आले आहे आणि अनेक रोगांचे निदान करण्यासाठी सर्वोत्तम समजले जाते, त्याकडे फार लक्ष दिले जात नव्हते. रेण्वीय निदानासाठी उच्च पातळीच्या पायाभूत सुविधा व कौशल्य अवलंबित्वाची गरज असते. याच कारणासाठी हे तंत्र वापरण्यात येत नव्हते. त्याचप्रमाणे बॅच टेस्टिंग, लॉजिस्टिक्सशी संबंधित समस्या, नमुन्यांची वाहतूक आणि त्यानंतर प्रत्यक्ष निष्कर्ष मिळण्यासाठी लागणारा वेळ याही समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे याचा वापर निश्चिती चाचणी करण्यापर्यंत मर्यादित आहे, जी भारतातील शहरांमधील काही मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणि मध्यवर्ती प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य यांची आपण सांगड घालू शकलो तरच क्षयरोगाचे वेळेवर निदान व रुग्णांची नोंद करण्याला यश मिळू शकेल. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा पुरठादारांना जलद, अचूक निदान सेवा आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांना सूचित करण्याचे साधन उपलब्ध नसेल तर निश्चित व तत्काळ उपचार सुरू होऊ शकत नाहीत. याचे कारण अचूकपणे समजले नाही तर क्षयरोगाचा फैलाव होऊ शकतो आणि तो पुन्हा होऊ शकतो. सर्व भागांमध्ये राहणाऱ्या गरजूंपर्यंत नवी औषधे व निदान चाचण्या पोहोचल्या तरच त्या अर्थपूर्ण व परिणामकारक होऊ शकतील.
गेल्या दशकात क्षयरोगाच्या निदानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. २०११ साली सादर करण्यात आलेली जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली Xpert CBNAAT ही क्षयरोगाची चाचणी करण्याची एक उत्तम चाचणी आहे. या चाचणीसाठी आवश्यक असलेला अखंडित वीजपुरवठा, नियंत्रित परिस्थिती आणि किंमत कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केली जाण्याची आवश्यकता यामुळे ही चाचणी केवळ मध्यवर्ती प्रयोगशाळेतच केली जाते. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) २०१७ मध्ये आणि त्यानंतर २०२० साली डब्ल्यूएचओने ट्रूनॅट या भारतात तयार झालेल्या आरोग्यकेंद्रात होणाऱ्या रेण्वीयन निदान चाचणीला मान्यता दिली जी आरोग्य केंद्रात आणि कमी संसाधनांच्या ठिकाणीही केली जाऊ शकते. भारतातून २०२५ पर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाचा विचार करता, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाने भारतातील १५१२ केंद्रांवर क्षयरोगाचे वेळेत व संवेदनशील निदान व्हावे यासाठी ट्रुनॅट® चाचणी सुरू करण्यात आली. ट्रुनॅट हा कनेक्टेड प्लॅटफॉर्म असल्याने ‘निक्षय’ या क्षयरोग डेटा पोर्टलशी त्याची सांगड घातली जाऊ शकते आणि दशभरातील क्षयरोगाच्या निदानाबद्दल ताजी माहिती हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकतो. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भारताला कोव्हिड-१९ महासाथ हाताळण्यासाठीही मदत झाली कारण ही उपकरणे सध्या सार्स कोव्हि-२ निदानासाठी वापरण्यात येत आहेत.
क्षयरोगाच्या चाचणीसाठी ट्रुनॅट हा जगातील एकमेव पॉइंट ऑफ केअर (उपचारकेंद्रात असलेला) प्लॅटफॉर्म असून त्याचा जागतिक आरोग्य संघटनेतर्फे पुष्टी करण्यात आली आहे. तसेच याला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चतर्फे विधिग्राह्य करण्यात आले आहे आणि मान्यता देण्यात आली आहे. ट्रुनॅट ही कुठेही नेता येऊ शकणारा, बॅटरीवर चालवता येणारा, उपचारकेंद्रांमध्ये वापरता येणारा प्लॅटफॉर्म आहे, जिथे नमुना ते निष्कर्ष हा कालावधी १ तासाहून कमी असतो. जो देशभरातील दुर्गम कोपऱ्यांमध्येही वापरता येऊ शकतात. अनेक आजारांसाठी ही प्राथमिक चाचणी असू शकते. ट्रुनॅटमुळे जलद व अचूक निदान होऊ शकते आणि लगेच उपचार सुरू होऊ शकतात. ‘ट्रुनॅट® रिअल-टाइम पीसीआर’ हा वैशिष्ट्यपूर्ण प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मने पीएचसी आणि कम्युनिटी हेल्थकेअर सेंटरसारख्या मर्यादित संसाधने असलेल्या ठिकाणांना सक्षम केले आहे. या प्लॅटफॉर्मने विविध आजारांसाठी प्राथमिक चाचणी म्हणून प्रगत रेण्वीय निदान तंत्रज्ञानाचे सहाय्य उपलब्ध करून दिले होते. या माध्यमातून आजार नियंत्रण व व्यवस्थापनात अमूलाग्र बदल घडवून आणला होता. भारतभर आणि जगभरात १००० हून अधिक यंत्रणांमध्ये सध्या ४५०० हून अधिक ट्रुनॅट उपकरणे वापरण्यात येत आहेत.
भारतातील क्षयरोगाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी २४ मार्च २०२२ रोजी भारत सरकार घरोघरी जाऊन चाचणी करण्याचे अभियान सुरू करणार आहे. घरोघरी सर्वेक्षण करून सक्रिय रुग्ण शोध अंमलबाजवणी करणे आणि क्षयरोगाचे संशयित निश्चित करण्यासाठी व्यापक प्रमाणावर चाचणी पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर ट्रुनॅटसारखी रेण्वीय चाचणी करून त्यांना आजार आहे किंवा नाही याची निश्चिती करण्यात येणार आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि सर्व गहाळ प्रकरणे समोर आणण्यासाठी हे अभियान आणखी तीव्र करणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment