न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स हे आयपीएल(IPL) 2022 साठीचे अधिकृत निदान भागीदार बनले आहे
न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स हे आयपीएल(IPL) 2022 साठीचे अधिकृत निदान भागीदार बनले आहे
मुंबई 24 मार्च 2022:-न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स, भारतीय वंशाच्या शीर्ष 4 पॅथॉलॉजी लॅब चेन, आता आयपीएल 2022 साठी अधिकृत डायग्नोस्टिक पार्टनर बनले आहेत. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हया आयपीएलच्या टीम साठी न्यूबर्गची अधिकृत निदान भागीदार म्हणून त्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2022 हे दुसरे वर्ष आहे की आयपीएलने न्यूबर्ग डायग्नोस्टिक्ससोबत त्याचे निदान भागीदार म्हणून भागीदारी केली आहे.
प्रोटोकॉलनुसार सर्व खेळाडू, मॅनेजमेंट टीम, टेलिव्हिजन आणि ब्रॉडकास्टिंग क्रू, राज्य आणि केंद्रीय क्रिकेट बोर्ड सदस्य, ग्राउंड स्टाफ, हॉटेल स्टाफ आणि इव्हेंट मॅनेजमेंट टीम यांची चाचणी घेतली जात आहे. या चाचण्या विविध हॉटेल्समध्ये आयोजित केल्या जातील जिथे संघ बायो बबलमध्ये आणि स्टेडियममध्ये इतर कर्मचारी सदस्यांसाठी नियमित अंतराने आयोजित केले जातील.
या विकासावर बोलताना न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. ए गणेशन म्हणाले, “जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक - आयपीएल 2022 शी निगडीत असल्याचा न्यूबर्ग समूहाला अभिमान वाटतो आणि या स्पर्धेचे सुरळीत आणि यशस्वी वर्तनासाठी गुणवत्ता चाचणी सुनिश्चित करेल."
Comments
Post a Comment