बँक ऑफ बडोदाच्या २०२२च्या आवृत्तीची घोषणा पीव्ही सिंधू आणि शेफाली वर्मा या प्रख्यात ऍंबेसेडर्ससोबत #SaluteHerShakti स्पर्धा
बँक ऑफ बडोदाच्या २०२२च्या आवृत्तीची घोषणा पीव्ही सिंधू आणि शेफाली वर्मा या प्रख्यात ऍंबेसेडर्ससोबत #SaluteHerShakti स्पर्धा
मुंबई, 09 मार्च, 2022: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या आघाडीच्या बँकांपैकी एक असणाऱ्या बँक ऑफ बडोदा बॅंकेने #SaluteHerShakti स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली, ज्यायोगे आपल्यातल्या प्रेरणादायी स्त्रियांची ओळख करुन दिली जाईल.
व्हिडिओ इथून ऍक्सेस करता येईल #SaluteHerShakti
स्पर्धेमध्ये लोकांनी त्यांना प्रेरणा देणाऱ्या अद्वितीय स्त्रियांच्या कथा शेअर करायच्या आहेत. मग ती स्त्री एखाद्याची आई असू, बहिण, मुलगी, मैत्रीण, शेजारी, शिक्षिका, सहयोगी-कोणतीही असू शकते जिने आपल्या कर्तृत्वाने सर्व अडथळ्यांवर मात करुन स्त्री दुर्बळ असते हा समज मोडीत काढून दाखवला आहे.
निवडलेल्या स्त्रिया बँक ऑफ बडोदाच्या बँड एंडोर्सर्स, क्रीडा जगतातील प्रसिध्द व्यक्ती आणि लाखो भारतीयांच्या रोल मॉडेल्स-ऑलिंपियन पीव्ही सिंधू आणि टीम इंडियाची क्रिकेटर शेफाली वर्मा सोबत वर्च्युअली संवाद साधतील आणि त्यांना आकर्षक बक्षिसे देखील मिळतील.
बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री विक्रमादित्य सिंह खिची म्हणाले,” स्त्रिया जीवनाच्या सर्व स्तरांवर महत्वपूर्ण भूमिका बजावत असून, आम्ही त्यांना ओळख मिळवून देणारा मंच उपलब्ध करुन देण्यामार्फत त्यांच्या क्षमता व प्राप्ती आम्ही जगासमोर सादर करु. #SaluteHerShakti हे या दिशेने उचललेले पाऊल आहे. प्रत्येकाला भारावणाऱ्या स्त्री प्राप्तीकर्ता, खासकरुन अशा स्त्रिया ज्यांनी त्यांच्या यशाच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मात केली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आम्हाला #SaluteHerShaktiच्या द्वितीय आवृत्तीची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे. या उपक्रमामधून स्त्रियांच्या पुढच्या पिढीला सक्षम बनवणाऱ्या आपल्यामधल्याच काही अद्वितीय स्त्रियांची दखल घेऊन त्यांचा अद्वितीय प्रवास साजरा केला जाणार आहे.”
बँक ऑफ बडोदाची बँड एंडोर्सर ऑलिंपियन पीव्ही सिंधू म्हणाली, ”बँक ऑफ बडोदा नेहमीच स्त्रियांसाठी भक्कम आधारस्तंभ ठरली आहे. आणि #SaluteHerShakti अभियान आपल्या दैनंदिन आयुष्यातील स्त्रियांच्या अद्भुत कथांवर प्रकाश पाडण्याचा आणि इतर स्त्रियांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रेरणा देण्याचा अतिशय उत्तम मार्ग आहे. या अद्भुत महिलांना वर्च्युअली भेटून आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे.”
तरुणांची आदर्श, क्रिकेटर आणि बँक ऑफ इंडियाची बँड एंडोर्सर शेफाली वर्मा म्हणते, ”मी स्त्रियांच्या प्रेरणादायक गोष्टी ऐकत मोठी झाले. #SaluteHerShakti हे बँक ऑफ इंडियाचे अभियान अशा स्त्रियांचा सन्मान करण्याचे व त्यांना प्रोत्साहन देण्याचे माध्यम आहे. या सुंदर अभियानाचा एक भाग होताना मला देखील भारावल्याप्रमाणे वाटत आहे आणि अशा विस्मयकारक स्त्रियांशी गप्पा मारण्यासाठी एकमेकींशी अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी मी अतिशय आतूर झाले आहे.”
स्पर्धा ८ मार्च २०२२ ते १३ मार्च २०२२ या कालावधीमध्ये आयोजित केली जाणार असून, अर्जांना बॅंकेच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडल्सवर हॅशटॅग #SaluteHerShakti कमेंटमध्ये वापरुन प्रस्तुत करता येईल फेसबुक हॅंडल: @bankofbaroda, इन्स्टाग्राम हॅंडल: @officialbankofbaroda, ट्विटर हॅंडल: @bankofbaroda आणि लिंक्डइन पेज: https://www.linkedin.com/company/bankofbaroda/.
सर्व प्लॅटफॉर्म्सवरुन सर्वोच्च तीन प्रवेशांची निवड केली जाईल, ज्यांना भारताच्या सर्वात मोठ्या स्पोर्टिंग व्यक्तीमत्वांसोबत-पीव्ही सिंधू आणि शेफाली वर्मासोबत वर्च्युअली संवाद साधण्याची संधी मिळेल.
२०२१मध्ये #SaluteHerShakti ची प्रथम आवृत्ती निघाली होती. तिला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता, तीन विजेत्या स्त्रियांचा पीव्ही सिंधू मार्फत सत्कार करण्यात आला होता. या वर्षी बॅंकेने हा सोहळा आणखीन मोठा केला असून ज्यामुळे भारतीयांच्या मोठ्या समुदायापर्यंत पोहोचण्याची संधी मिळे
Comments
Post a Comment