महिंद्रातर्फे स्कॉर्पिओ-एनच्या ऑटोमॅटिक आणि 4WD व्हेरिएंट्सचे ३० जुलैपासून बुकिंग खुले होणार
महिंद्रातर्फे स्कॉर्पिओ-एनच्या ऑटोमॅटिक आणि 4WD व्हेरिएंट्सचे
३० जुलैपासून बुकिंग खुले होणार
- गेम चेंजर – नवी स्कॉर्पिओ- एन महिंद्राचा ‘गेम चेंजर’ वारसा आपले आकर्षक डिझाइन, जबरदस्त कामगिरी, आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक सुरक्षा सेवा यांच्या मदतीने पुढे नेण्यासाठी सज्ज आहे.
- या विभागात सर्वोत्कृष्ट – नवी स्कॉर्पिओ-एन आपल्या सर्वोत्तम आणि अनोख्या वैशिष्ट्यांसह वेगवेगळ्या एसयूव्ही क्षेत्रात खळबळ उडवून देण्यासाठी सज्ज असून त्यादृष्टीने गाडीची बांधणी व डिझाइन तयार करण्यात आले आहे.
- सर्व नव्या स्कॉर्पिओ-एनचे बुकिंग ऑनलाइन तसेच महिंद्राच्या वितरकांकडे ३० जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून खुले होणार आहे.
- वितरण २६ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होईल.
- डिसेंबर २०२२ पर्यंत पहिल्या रोल- आउटमध्ये २०,००० युनिट्सचे नियोजन करण्यात आले असून ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार सुरुवातीच्या रोल- आउटमध्ये Z8L व्हेरियंटला प्राधान्य दिले जाईल.
मुंबई, २१ जुलै २०२२ – महिंद्रा अँड महिंद्रा लि. या भारताच्याल एसयूव्ही क्षेत्रातील पायोनियर कंपनीने आज या वर्षातील बहुप्रतीक्षीत एसयूव्ही – नवी स्कॉर्पिओ-एनच्या ऑटोमॅटिक आणि 4WD या व्हेरियंटच्या किंमती जाहीर केल्या. आधुनिक तंत्रज्ञान व विविध वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या या गाडीमुळे देशातील एसयूव्हीप्रेमींना ड्रायव्हिंगचा वेगळाच आनंद मिळणार आहे. प्रारंभिक किंमती पहिल्या २५,००० बुकिंग्जना लागू असतील.
स्कॉर्पिओ-एन 4WD व्हेरिएंटमध्ये ‘शिफ्ट ऑफ फ्लाय’ 4WD वैशिष्ट्य तसेच या विभागात पहिल्यांदाच इंटेलिजंट टेरेन मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी 4XPLOR समाविष्ट करण्यात आले आहे आणि ते 2WD व्हेरियंटवर २.४५ लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत उपलब्ध केले जाईल. 4WD हे Z4, Z8, आणि Z8L डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल.
स्कॉर्पिओ-एनचे सहा आसनी व्हेरियंट निवडक Z8L व्हेरियंट्समध्ये सात आसनी व्हेरिएंट्सवर २०,००० रुपयांच्या प्रारंभिक किंमतीवर उपलब्ध केले जाईल.
नव्या स्कॉर्पिओ-एनचे बुकिंग ऑनलाइन तसेच महिंद्राच्या वितरकांकडे ३० जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून खुले होणार आहे.
Comments
Post a Comment