पंजाब नॅशनल बँकेला पहिल्या तिमाहीत ३०८.४४ कोटींचा नफा
पंजाब नॅशनल बँकेला पहिल्या तिमाहीत ३०८.४४ कोटींचा नफा
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेच्या नफ्यात जूनमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत ७० टक्के घट झाली आहे . बँकेला ३०८. ४४ कोटी रुपये नफा मिळाला आहे . बुडीत कर्जासाठी मोठी तरतुद करावी लागल्याने आणि व्याजातून मिळणारा नफा कमी झाल्याने बँकेचा नफा कमी झाला आहे . गेल्यावर्षी बँकेला याच काळात १०२३. ४६ कोटी रुपायांचा नफा झाला होता .
यंदाच्या पहिल्या तिमाहीत बँकेला २१२९४ कोटी रुपये महसूल मिळाला . गेल्यावर्षी बँकेला याच काळात २२५१५ कोटी रुपये महसूल मिळाला होता . तसेच बँकेला व्याजातून मिळणारे उत्पन्न जून रोजी संपलेल्या तिमाहीत १८७५७ कोटी मिळाले. गेल्यावर्षी याच काळात हेच उत्पन्न १८९२१ कोटी रुपये होते . बँकेचे घाऊक बुडीत कर्जाचे प्रमाण ११. २ टक्क्यांवर आले . गेल्यावर्षी हेच प्रमाण १४. ३३ टक्के होते .
मार्च २०२२ रोजी हेच प्रमाण ११. ७८ टक्के होते . २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बुडीत कर्जाचे प्रमाण ९०१६७. १० कोटी होते . गेल्यावर्षी हेच प्रमाण १, ०४, ०७५. ५६ कोटी होते . तर बँकेचे निव्वळ बुडित कर्ज यंदाच्या पहिल्या आर्थिक तिमाहीत ४. २६ टक्के होते . गेल्यावर्षी हेच प्रमाण ५. ८४ टक्के होते . गेल्या दोन वर्षात कोविड -१९ चा मोठा परिणाम देशाच्या व पदेशातील अर्थव्यवस्थेला बसला . मात्र, तरीही बँकेच्या ताळेबंदला, कामावर कोणताही परिणाम झाला नाही, असे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले .
Comments
Post a Comment