मामाअर्थने मुंबईत सुरू केले विशेष ब्रँड आउटलेट
मामाअर्थने मुंबईत सुरू केले विशेष ब्रँड आउटलेट
मुंबई, २९ जुलै २०२२- हाऊस ऑफ होनासा मधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मामअर्थ या एफएमसीजी ब्रँडने मुंबईतील फिनिक्स मार्केट सिटी, कुर्ला आणि इन्फिनिटी मॉल, मालाड येथे आपले खास ब्रँड आउटलेट्स (ईबीओ) लाँच केले. विषारी घटकमुक्त या पर्सनल केअर ब्रँडच्या तर्फे बेबीकेअरसह सर्व सौंदर्य आणि पर्सनल केअर उत्पादन श्रेणीची किरकोळ विक्री करण्यात येईल. मामअर्थच्या विशेष ब्रँड आउटलेटचा शुभारंभ वरुण अलाघ -मुख्य कार्यकारी अधिकारी, होनासा कंझ्युमर प्रा. लि.आणि गझल अलघ-सीआयओ आणि सह-संस्थापक, मामाअर्थ यांच्या हस्ते फिनिक्स मार्केट सिटी,कुर्ला येथे केले.
ग्राहक केंद्रित ब्रँड असल्याने मामअर्थने बेबीकेअरसह एक विषमुक्त ब्रँड म्हणून सुरुवात केली परंतु ग्राहकांच्या मागणीमुळे प्रौढांसाठीच्या विषमुक्त पर्सनल केअर उत्पादनांमध्ये प्रवेश केला. ग्राहकांच्या गरजांवर बारीक नजर ठेवून, उत्पादनांच्या ऑफलाइन उपलब्धतेसाठी ग्राहकांच्या वाढत्या मागणीसह, ब्रँडने ऑफलाइन स्वरूपांमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विशेष ब्रँड आउटलेट्स हे ब्रँड आणि त्याच्या ऑफरच्या विस्ताराबद्दल संवाद साधण्याचा एक उत्तम मार्ग आहे हे समजून घेऊन, मामअर्थने आपली खास ब्रँड आउटलेट्स लॉन्च केली. ईबीओ ग्राहकांना ब्रँड विचारधारेमध्ये समाविष्ट करण्यासाठी आणि सखोल ब्रँड अनुभव देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतात.
या ब्रँडने राजधानी शहरात आपले पहिले स्टोअर सुरू केले, त्यांनी मुंबईत २ ईबीओ लॉन्च केले. इन्फिनिटी मॉल, मालाड आणि फिनिक्स मार्केट सिटी, कुर्ला या मुंबईतील दोन प्रमुख ठिकाणी स्टोअर्स असून ती ३८० चौरस फूट आणि १९७ चौरस फूट क्षेत्रफळात आहेत स्किनकेअर, हेअरकेअर, पर्सनल केअर आणि आमची नवीन कलर केअर श्रेणी पासून मामअर्थ सर्व १४० पेक्षा जास्त एसकेयू उपलब्ध करून देते
या विशेष ब्रँड आउटलेटच्या लाँचिंगबद्दल भाष्य करताना होनासा कंझ्युमर प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .वरुण अलाघ म्हणाले, “होनासा ग्राहक ब्रँड बनविण्याच्या व्यवसायात आहे आणि ब्रँड ग्राहकांच्या मनात तयार केले जातात. ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी वापरलेली माध्यमे बदलत राहतील आणि विकसित होत राहतील. डिजिटलदृष्ट्या मूळ कंपनी असल्याने, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञान हे आपल्या अस्तित्वाचे अविभाज्य घटक आहेत, परंतु ग्राहकांशी जोडलेले राहणे हे मुख्य उद्दिष्ट आहे आणि आपल्याला ग्राहकांच्या प्रवासाचे अनुसरण करणे आवश्यक आहे.ग्राहकांना जर ऑफलाइन खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुमची तिथे उपस्थिती असणे महत्वाचे आहे. ही गरज समजून घेऊन आम्ही विशेष ब्रँड आऊटलेट्ससह ऑफलाइन प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि ग्राहकांनी ज्या प्रमाणे डिजिटलवर प्रेम दाखवले तसेच ऑफलाइनवरही प्रेम करावे अशी आमची मनापासून इच्छा आहे.”
मामअर्थने हा उद्देशाधिष्ठित नेतृत्व करणारा ब्रँड आहे जो ‘अंतर्गत चांगुलपणा’या तत्त्वावर ठाम विश्वास ठेवतो आणि त्याची उत्पादने आणि उपक्रमांद्वारे चांगुलपणा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे. ममाअर्थचा असा विश्वास आहे की चांगुलपणाची सुरुवात आपल्यापैकी प्रत्येकाने दररोज केलेल्या छोट्या छोट्या निवडीपासून होते! हा ब्रँड केवळ सर्वोत्तम निसर्गाचा वापर करून आणि त्यांच्या उत्पादनांमध्ये कोणतेही विष किंवा हानिकारक रसायने वापरून त्याच्या विश्वासाप्रमाणे जगतो. ते प्राणी क्रूरता-मुक्त, प्लास्टिकबद्दल सकारात्मक देखील आहेत आणि त्यांनी गेल्या वर्षी प्लांट गुडनेस वचन लाँच केले आहे. याचाच एक भाग म्हणून, ब्रँड त्यांच्या वेबसाइटवर केलेल्या प्रत्येक ऑर्डरचा संबंध त्यांनी वृक्षारोपण केलेल्या प्रत्येक झाडाशी जोडतो आणि २०२५ पर्यंत १५ लाख पेक्षा जास्त झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.
Comments
Post a Comment