यंदा श्रावण महिन्यात उपवास व्रताला कुरकुरीत मदर्स रेसिपी बटाटा आणि साबुदाणा पापडाचा आस्वाद घ्या

 यंदा श्रावण महिन्यात उपवास व्रताला कुरकुरीत मदर्स रेसिपी बटाटा आणि साबुदाणा पापडाचा आस्वाद घ्या 



भारतीयांमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व असून पावसाळ्याला लागूनच हा महिना येतो. पारंपरिक हिंदू कालगणनेनुसार, जुलै महिन्याच्या सुरुवातीला श्रावणाची सुरुवात होते आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस श्रावण सरतो. हा वर्षातील सर्वाधिक पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शिवाचे आशीर्वाद घेतले जातात, प्रार्थना, उपवास व्रत आणि सणांचा महिना असतो. श्रावण महिन्यात, लोक उपवास ठेवतात आणि विशिष्टच पदार्थांचे सेवन करण्यात येते. अनेक भारतीय महिला सोमवारी उपवास करतात. त्यावेळी घरोघरी नियमित जेवणासोबत उपवासाचे पदार्थही केले जातात. या काळात उपवास पदार्थांना प्राधान्य असते आणि एकवेळ अन्न ग्रहण करण्याचा प्रघात पाळला जातो. उपवास व्रताची ही परंपरा लक्षात घेत, मदर्स रेसिपीने कुरकुरीत आणि वेगळ्या चवीचे स्वादिष्ट बटाटा आणि साबुदाणा पापड बाजारात आणले आहेत.  


मदर्स रेसिपीने बाजारात आणलेले विशेष रेडी-टू-फ्राय उपवासाचे पापड हा चविष्ट पदार्थ आहे. साबुदाणा पापडात नेहमीच्या वापरातील मीठाऐवजी सैंधव मीठाचा वापर करण्यात आला आहे. सैंधव मीठ हे अस्सल मीठ असून उपवासाकरिता आदर्श मानले जाते. उपवास करणाऱ्यांमध्ये साबुदाणा अतिशय प्रिय आहे. उपवास करताना पोषणाचा विचारही महत्त्वाचा असतो. या काळात शरीराला कर्बोदकाची विशेष गरज असल्याने साबुदाणा पूरक ठरतो. मदर्स रेसिपी पापड अभिनव पद्धतींनी तयार केले जातात – त्यांची अस्सल चव, उच्च गुणवत्तेचे साहित्य आणि आधुनिक आरोग्यदायी प्रक्रिया यामुळे तुमच्या उपवास आहार आणि नाश्त्याची लज्जत वाढते. कंपनीची संशोधन आणि विकास टीम सुयोग्य कुरकुरीत चवीसोबत अनेक फेऱ्यांमधून जाते. पाककृती अतिशय सोपी असून तुमच्या पसंतीच्या तेलात हे पापड तळून त्यांचा आस्वाद घेता येतो. लहान मुलांनाही पापड फार आवडत असल्याने त्यांच्याकरिता हा उत्तम पर्याय ठरतो.    


अन्नपदार्थ हे सर्वच सणासुदीकरिता अविभाज्य घटक असल्याने मदर्स रेसिपीकडे प्रत्येक हंगाम आणि उत्सवासाठी वैविध्यपूर्ण आहार पर्याय उपलब्ध आहेत. मदर्स रेसिपीच्या सध्याच्या उत्पादन पोर्टफोलियोत लोणची, कुकिंग पेस्ट, इन्स्टंट मिक्सेस, भारतीय चटण्या आणि पापड, रेडी टू कूक, रेडी टू इट त्याचप्रमाणे नव्याने दाखल करण्यात आलेले ग्लोबल एक्झॉटीक सॉसचा समावेश आहे. ही उत्पादने अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने बाजाराची सध्याची गरज ओळखून तयार करण्यात आली आहेत. पवित्र श्रावण महिन्यात मदर्स रेसिपीने बटाटा आणि साबुदाणा, अशा दोन्ही उपवास पापडांवर खास ऑफर दिली असून ते ग्राहकांसाठी https://www.mothersrecipe.com/product-category/papad/वर उपलब्ध आहेत.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार