उज्ज्वल निकम यांची डॉ. आशा गोयल खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
उज्ज्वल निकम यांची डॉ. आशा गोयल खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
मुंबई, २२ ऑगस्ट २०२२ : भारतातील प्रमुख फौजदारी वकिलांपैकी एक असलेले ॲड. उज्ज्वल निकम यांची कॅनेडियन नागरिक डॉक्टर आशा गोयल यांच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. गोयल यांची जवळपास दोन दशकांपूर्वी मुंबईत कौटुंबिक मालमत्तेचा वाद मिटवण्याच्या प्रयत्नात असताना हत्या करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला पूर्वीचे वकील अवधूत चिमळकर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.
अनेक सन्मान मिळालेले व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फौजदारी कायदा विशेषज्ञ असलेल्या ॲड. निकम यांनी देशातील गुन्हेगारांना सुमारे ४० मृत्यूदंड आणि ३०० हून अधिक जन्मठेपांची शिक्षा दिली आहे. ते या खटल्याचे नेतृत्व करतील आणि त्याची सुनावणी २४ ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर होईल. डॉ. आशा गोयल यांच्या खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांच्या नियुक्तीची घोषणा राज्य कायदा व न्याय विभागाने १० ऑगस्ट २०२२ रोजी केली होती. या खटल्याच्या सुनावणीची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा होती आणि तिला अनेक वेळा विलंब झाला होता.
निकम यांनी भारतातील सर्वाधिक चर्चित अशा खून, सामूहिक बलात्कार आणि दहशतवादाच्या खटल्यांमध्ये सरकारी पक्षाचे यशस्वीरित्या नेतृत्व केले आहे. यात २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्याचाही समावेश आहे. ऑरेंजविले, ओंटारियो येथे कॅनेडियन प्रसूतीतज्ञ असलेल्या ६२ वर्षीय डॉ. गोयल यांची ऑगस्ट २००३ मध्ये मुंबईच्या मलबार हिल्स परिसरात त्यांच्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरात भाडोत्री मारेकऱ्यांनी हत्या केली होती. डॉ. गोयल या ४० वर्षांपासून प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या आणि त्या सस्कॅचेवनमध्येही प्रॅक्टिस करत होत्या. त्यांनी कॅनडामध्ये दहा हजारांहून अधिक बाळाच्या ससेक्स डिलिव्हरी त्यांनी केल्या आहेत.
उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती ही आमच्या आईसाठी न्यायाच्या १९ वर्षांच्या लढाईतील एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे संजय गोयल आणि रश्मी गोयल म्हणाले. ते डॉ. आशा गोयल आणि डॉ. सदन गोयल यांचे पुत्र व कन्या आहेत. ते म्हणाले, भारतातील खटल्याचे नेतृत्व करण्यासाठी याहून अधिक कुशल आणि समर्पित कोणाचीही आम्ही मागणी करू शकत नाही.
Comments
Post a Comment