कॉर्पोरेट मूल्ये व पारदर्शकतेच्या उच्च मापदंडांसह कोहिनूर ग्रुपने त्यांचे व्हिजन, मिशन व मूल्य विधान सादर केले

कॉर्पोरेट मूल्ये व पारदर्शकतेच्या उच्च मापदंडांसह कोहिनूर ग्रुपने 

त्यांचे व्हिजनमिशन व मूल्य विधान सादर केले

 

  • कोव्हिडनंतर अशा प्रकारचे पहिलेच पाऊल
  • उज्ज्वल भविष्यासाठी कोहिनूरच्या टीमने घेतली माय कोहिनूर प्रतिज्ञा’ 

 


महाराष्ट्र, 23 ऑगस्ट 2022 : पुण्यातील आघाडीचा रिअल इस्टेट ग्रुप असलेल्या कोहिनूर ग्रुपतर्फे त्यांचे व्हिजनमिशन व मूल्य विधान आज जाहीर करण्यात आले. लेफ्ट. जन. सतिश दुआअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. कृष्णकुमार गोयलव्यवस्थापकीय सहसंचालक श्री. विनीत गोयल आणि व्यवस्थापकीय सहसंचालक राजेश गोयल आणि संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत हे अनावरण करण्यात आले. 

 

पुण्यातील बनतारा भावना बँक्वेट हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमासाठी कोहिनूर ग्रुपचे 500 कर्मचारी व सहयोगी उपस्थित होते.

 

भारताने केलेल्या उरी सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व करणारे लेफ्ट. जन. दुआ यांनी त्यांच्या प्रेरणादायक कथा उपस्थितांसमोर कथन केल्या आणि कार्यस्थळी नीतिमत्ता व मूल्ये पाळण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. 

 

या प्रसंगी कोहिनूर ग्रुपचे व्यवस्थापकीय सहसंचालक श्री. विनित गोयल म्हणाले, “व्हिजन आणि मिशन स्टेटमेंटकोहिनूर ग्रुपच्या पुण्यातील रिअल इस्टेट कंपनीपासून ते प्रसिद्ध कॉर्पोरेट होण्यापर्यंतच्या प्रगतीच्या व परिवर्तनाच्या वाटचालीमध्ये आपल्याला पथदर्शक ठरेल. पुणे शहरात जागतिक दर्जाची निवासी व कमर्शिअल ठिकाणे उपलब्ध करून देण्यामध्ये आघाडीवर राहण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करेल आणि अधिक भक्कम करेल. व्हिजन स्टेटमेंटचा मजबूत पायातांत्रिक नैपुण्य व आमच्याकडे असलेले उच्च कौशल्यतसेच कोहिनूरचे सर्व कर्मचारी व सहयोगी यांच्यात असलेली माय कोहिनूर’ प्रतिज्ञेची जाणीव यामुळे अजून उत्साह संचारेल आणि कोहिनूर ग्रुपमध्ये आम्हाला उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

 

या प्रसंगी लेफ्ट. जन. दुआ म्हणाले, “प्रत्येक सैनिक आपल्या देशासाठी निस्वार्थीपणे उभा असतो. सैनिक व संरक्षण अधिकाऱ्यांची निष्ठा अतुलनीय असते आणि सामान्यांसाठी ती एक आदर्श असते. कोहिनूरच्या व्हिजनमिशन आणि मूल्यांच्या माध्यमातून टीमच्या समर्पणाला व निष्ठेला आवाहन करण्यात आले आहे आणि माझी खात्री आहे कीकर्मचारी व व्यवस्थापन त्यांच्या ध्येयाची पूर्ण जबाबदारी घेतील आणि कोहिनूरला वेगळ्या उंचीवर घेऊन जातील.

 

कोहिनूर ग्रुपबद्दल : कोहिनूर ग्रुप गेली 38 वर्षे पुण्यातील रिअल इस्टेट विकास क्षेत्रात आघाडीवर आहे. या ग्रुपची स्थापना 1983 मध्ये झाली असून त्या वेळी हा ग्रुप सिमेंटचा व्यापार करणारा ग्रुप होता. त्यानंतर त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात पदार्पण करून आपला ठसा उमटवला आणि एक भक्कमविश्वासार्ह बांधकाम ब्रँड म्हणून या ब्रँडची ओळख निर्माण झाली. आज या ग्रुपने पुण्यात 80 लाख चौरस फुटांचे बांधकाम विकसित केले आहे आणि त्याची डिलिव्हरी केली आहे आणि सध्या 65 लाख चौ. फुटांचे बांधकाम सुरू आहे. उत्पादनलॉजिस्टिक्सविद्यार्थी निवासवेअरहाउसिंग व सेवा या इथर क्षेत्रांमध्येही आम्ही विस्तारीकरण केले आहे. गेल्या दशकात कोहिनूर ग्रुपने विकसित केलेल्या प्रत्येक प्रकल्पाची बांधकाम सुरू करण्यापूर्वी पूर्णपणे आखणी केलेली होती. निवासी प्रॉपर्टीज असो वा कमर्शिअल प्रोजेक्ट्सकोणताही निर्णय घेण्यापूर्वी कोहिनूर ग्रुप नेहमी ग्राहकांच्या गरजांचा आणि आवश्यकतांचा विचार करतो.

 

सदा सुखी रहो तत्व

सदा सुखी रहो हे तत्व आम्ही करत असलेल्या सर्व कामांमध्ये अवलंबले जाते. आम्ही रचत असलेली प्रत्येक वीट आणि आम्ही बांधत असलेले प्रत्येक चौ. फूट बांधकाम आमच्यावर आमचे रहिवासीभागीदार आणि समाजाची जबाबदारी देते. म्हणून म्हणून आमचे प्रकल्प प्रमुख स्तंभ म्हणजेच ब्रँडेड घरशाश्वत राहणीमानसुरक्षित राहणीमानआरोग्यदायी जीवनशैली आणि देखभाल टीम यावर आदारलेली असून प्रत्येकासाठी आनंदी भविष्याची खातरमा ते करतात. आम्ही अनेक चेहऱ्यावर स्मित आणतो आणि साइटला दिलेल्या पहिल्या भेटीपासून ते सदनिका हस्तांतरीत करेपर्यंत आणि त्यानंतरही आनंदी आयुष्याची खात्री देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE