युवा कौशल्याला वाव देत मुंबईतील पीएनबी मेटलाइफ ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचे ६ वे सत्र उत्साहात साजरे
युवा कौशल्याला वाव देत मुंबईतील पीएनबी मेटलाइफ ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप
स्पर्धेचे ६ वे सत्र उत्साहात साजरे
नाईशा कौर भातोया आणि सोहम फाटक यांनी १७ वर्षांखालील चषक उंचावले
मुंबई, २५ ऑगस्ट २०२२: पीएनबी मेटलाइफ ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२२ च्या ६ व्या सत्रात महाराष्ट्रातील ९०० हून अधिक कुशल शटलर्सनी त्यांच्या कामगिरीने प्रेक्षकांना प्रभावित केले. स्पर्धेच्या महाराष्ट्र राज्य सत्राचा आज अंधेरी क्रीडा संकुल, मुंबई येथे समारोप झाला. या समारोप समारंभात ५ श्रेणींमधील १० बॅडमिंटन अजिंक्यवीरांचे कौतुक करण्यात आले.
बॉईज एकेरी अंडर-17 गटात विले पार्ले च्या सोहम फाटकने विरार च्या मल्हार घाडी चा २१-१४, २१-१३ असा पराभव केला. मुलींच्या एकेरी 17 वर्षांखालील गटात मुंबई च्या नैशा कौर भतोयेने कल्याण च्या अलिसा चेट्टियार चा 21-4, 21-4 असा पराभव केला.
पीएनबी मेटलाइफचे मुख्य वितरण अधिकारी समीर बन्सल म्हणाले, "आम्ही गेल्या तीन दिवसांत उत्साह, दृढनिश्चय आणि खेळाप्रती असलेल्या समर्पित भावनेचे विलक्षण प्रदर्शन पाहिले आहे. मी विजेत्यांचे अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांना अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देतो. पीएनबी मेटलाइफमधला आमचा उद्देश सकारात्मक आत्मसन्मानासह मुलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना त्यांचे मानसिक आणि शारीरिक पराक्रम बळकट करण्यासाठी खेळ हे एक प्रभावी माध्यम म्हणून वापरणे हा आहे. योग्य प्रतिभेला चालना द्यायला हौशी स्तरावरील स्पर्धेची मदत होते. त्यामुळे मोठ्या व्यासपीठावर, मोठ्या स्तरावर त्यांचा विकास आणि कामगिरी करण्याची क्षमता वाढते."
या वर्षीच्या चॅम्पियनशिपचा पुढचा टप्पा बेंगळुरूला होईल आणि २७-३० ऑगस्ट २०२२ पर्यंत चालेल. युवे चॅम्पियन अकादमीमध्ये आमच्यासोबत सामील व्हा कारण भारताचा पुढील बॅडमिंटन चॅम्पियन तेथे स्पर्धा करणाऱ्या तरुण खेळाडूंमध्ये असू शकतो! इच्छुक अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी +91 9319483219 वर कॉल करू शकतात.
Photo Caption - PNB मेटलाइफ ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022 च्या 6 व्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्रातील छोट्या शटलर्सनी त्यांच्या कामगिरीने प्रेक्षकांना प्रभावित केले.
Comments
Post a Comment