क्रेयॉन्स अॅडव्हर्टायजिंगने ठेवले 2026 सालापर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य, इव्हेण्ट्स आणि डिजिटल विभागांच्या बळावर उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट
क्रेयॉन्स अॅडव्हर्टायजिंगने ठेवले 2026 सालापर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य, इव्हेण्ट्स आणि डिजिटल विभागांच्या बळावर उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट
- सार्वजनिक होणारी भारतातील पहिली मोठी जाहिरात एजन्सी
- सर्वसमावेशक अॅड-टेक सोल्युशन्स देऊ करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणुकीचे उद्दिष्ट
- सर्व सेवा क्षेत्रांमध्ये विस्ताराचे धोरण कायम
- कंपनीने नुकतीच काही मोठी अभियाने पूर्ण केली. त्यांमध्ये माननीय पंतप्रधानांची परीक्षा पे चर्चा, टाटा मुंबई मॅरेथॉन, टाटा समूहाचे एअर इंडिया ‘विंग्ज ऑफ चेंज’ आदींचा समावेश होता.
नवी दिल्ली, फेब्रुवारी 24, 2023: क्रेयॉन्स अॅडव्हर्टायजिंग लिमिटेड या आघाडीच्या एतद्देशीय एकात्मिक जाहिरात एजन्सीने, पुढील तीन वर्षांत आपले उत्पन्न दुप्पट करण्याची योजना आज जाहीर केली. प्रामुख्याने डिजिटल व इव्हेण्ट्स विभागांच्या बळावर हे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.
भारतातील जाहिरात क्षेत्रातील दिग्गज कुणाल लालानी यांनी प्रमोट केलेल्या क्रेयॉन्स अॅडव्हर्टाइजमेंटने गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळापासून एक एकात्मिक व नवोन्मेषकारी जाहिरात एजन्सी म्हणून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. कंपनीने नुकताचा एनएसईमध्ये (राष्ट्रीय शेअर बाजार) आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रोस्पेक्ट्स भरला आणि प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावासाठी (आयपीओ) सज्ज झाली. सूचीबद्ध झाल्यानंतर, क्रेयॉन्स सार्वजनिक (पब्लिक) होणारी भारतातील पहिली एतद्देशीय जाहिरात एजन्सी ठरेल.
“गेल्या काही वर्षांपासून आम्ही सातत्याने आमच्या क्षमतांमध्ये गुंतवणूक करत आहोत. यात मनुष्यबळ, प्रक्रिया, भागीदार व कामगिरी यांचा समावेश होतो,” असे क्रेयॉन्स अॅडव्हर्टायजिंगचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक कुणाल लालानी म्हणाले. “आमची एकात्मिक स्थिती, जाहिरात क्षेत्रासाठी अनुकूल झालेली आर्थिक परिस्थिती आणि आमच्या डिजिटल व इव्हेंट विभागांना दिली जाणारी शाश्वत पसंती यांच्या जोरावर, आज, आम्ही कक्षीय स्थलांतराचे उद्दिष्ट ठेवत आहोत. आमच्या डिजिटल क्षमता आणखी पुढे नेण्यासाठी आम्ही निधी उभारत आहोत. यामुळे आम्हाला भारताती ब्रॅण्ड्सना सेवा देणे तर शक्य होईलच, शिवाय, भविष्यकाळात संपूर्ण जगाला नवीन युगाची, तंत्रज्ञानाभिमुख सोल्युशन्स आम्ही देऊ करू शकू,” असे कुणाल पुढे म्हणाले.
भक्कम मोठ्या उद्योगांमुळे आशादायक वातावरण
भारतातील जाहिरात बाजारपेठेचे मूल्य 2020 मध्ये सुमारे 670 अब्ज रुपये होते. ही बाजारपेठ 2022-2027 या काळात 11 टक्के सीएजीआरवर वाढून 2026 सालापर्यंत 1253.2 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. संरचना, बँकिंग व वित्तीय सेवा (यांमध्ये फिनटेक्सचा समावेश होतो), पर्यटन, सरकारी विभाग व एमएसएमई व मोठ्या एतद्देशीय कंपन्या यांच्याकडून जाहिरातीसाठी केल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदींमध्ये मोठी वाढ होणेही अपेक्षित आहे. भारताबद्दल खोल समज असलेल्या एकात्मिक कंपन्यांना असलेली मागणी भविष्यकाळात एजन्सी निवडीवर वर्चस्व गाजवणार आहे.
दर्जेदार मनुष्यबळात गुंतवणूक
क्रेयॉन्सने कुशल व्यावसायिकांच्या नियुक्त्या करून आपले नेतृत्व बळकट करण्याचे काम सातत्याने केले आहे. अलीकडेच फैजल हक चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कंपनीच रुजू झाले. मनोज जेकब आणि अनुराग मिश्रा यांच्यासारख्या जाहिरात उद्योगातील तज्ज्ञांची नियुक्ती अनुक्रमे एग्झिक्युटिव क्रिएटिव डायरेक्टर व वरिष्ठ क्रिएटिव डायरेक्टर म्हणून करण्यात आली.
“सर्जनशीलतेच्या व नवोन्मेषाच्या उद्योगात दर्जेदार मनुष्यबळ हा घटक मोठा फरक घडवून आणू शकतो. आम्ही क्रेयॉन्समध्ये नेहमीच विश्वासार्ह नेतृत्वामध्ये गुंतवणूक करून मनुष्यबळाची बांधणी करत आलो आहोत. त्यामुळे जागतिक ब्रॅण्ड्सचा एक सन्माननीय सर्जनशील सहयोगी म्हणून लौकीक उभा करणे आम्हाला शक्य झाले आहे. दमदार ब्रॅण्ड मूल्याच्या बळावर क्षमतांमध्ये नियमितपणे गुंतवणूक केल्यानंतर आम्ही आता आमच्या नेतृत्व पथकांचा विस्तार करत आहोत,” असे कुणाल म्हणाले.
फैजल हक हे एजन्सीचे नवीन सीओओ आहेत. व्यवसायाचे संभाव्य मार्ग चोखाळून बघणे आणि उच्चस्तरीय व निम्नस्तरीय नफाक्षमतेवर लक्ष केंद्रित करून व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने कामकाजाचे व्यवस्थापन करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या एजन्सींमध्ये व ब्रॅण्ड्ससोबत काम करण्याचा 25हून अधिक वर्षांचा अनुभव असलेले या क्षेत्रातील एक दिग्गज म्हणून, फैजल यांनी अनेक पुरस्कारप्राप्त कामे सोशल व डिजिटल माध्यमांमध्ये केली आहेत. फैजल हे एक गौरवप्राप्त व्यावसायिक असून, इंडियन अचीव्हर्स फोरमने त्यांना ‘22-23’ या वर्षासाठी सीओओ ऑफ द इयर घोषित केले आहे. क्रेयॉन्समध्ये रुजू होण्यापूर्वी फैजल यांनी वॅटकन्सल्ट-डेंट्सु क्रिएटिव्हमध्ये काम केले आहे.
मनोज जेकब हे कंपनीचे एग्झिक्युटिव क्रिएटिव डायरेक्टर म्हणून रुजू झाले आहेत. त्यांच्याकडे ऑगिल्वी, डीडीबी मुद्रा, हवास, बीबीडीओ आणि काँट्रॅक्ट अॅडव्हर्टायजिंग यांसारख्या एजन्सींमधील 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. पीटर इंग्लंड, आयबीएम, लिनोव्हो, हिमालया वेलनेस, लुई फिलिप, डिअॅगो, एक्झॉन मोबिल, जीई, युनिसेफ, फॉस्टर्स, रेकिट आदी अनेक ब्रॅण्ड्स उभे करण्यात त्यांनी मदत केली आहे. मनोज यांच्या कामाने त्यांना दोनदा कान्स लायन्स पुरस्कार प्राप्त करून दिला आहे. याशिवाय अॅडफेस्ट लोटस, वन शो मेरिट, मीडिया स्पाइक्स तसेच ‘बेस्ट रायटिंग इन प्रिंट’साठी क्लिओ असे अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत.
अनुराग मिश्रा हे एजन्सीचे सर्जनशील सेनापती म्हणून अर्थात वरिष्ठ क्रिएटिव डायरेक्टर म्हणून रूजू झाले आहेत. त्यांच्याकडेही दशकभराचा अनुभव आहे. जेव्हीएम, ऑगिल्वी, सर्व्हिसप्लान, इनोसीअन वर्डवाइट आणि मॅकॅन यांसारख्या युरोप व आशियातील मोठ्या एजन्सींसाठी त्यांनी काम केले आहे. त्यांनाही अनेक मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. कान्स, डीअँडएडी, क्लिओज आणि एडीसी यांसारखे पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण ह्युंदई सँट्रो भारतीय बाजारपेठेत नव्याने आणली होती, तेव्हा जाहिरातींची सर्जनशील बाजू अनुराग यांनी सांभाळली होती. त्याशिवाय, कॅडबरी चोको बेक्स कुकीज ‘मीठा छुपा रुस्तम’ जाहिरात अभियान आणि त्यापाठोपाठ आलेले कॅडबरी चोको बेक्स कूकी एक्लिप्स हे डिजिटल अभियान यांमध्येही त्यांनी हातभार लावला होता.
मोठे प्रकल्प हाती
टाटासन्स, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा क्रोमा व बँक ऑफ बरोडा यांची मोठी कामे मिळवल्याची घोषणा कंपनीने नुकतीच केली. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे काम म्हणजे ब्रॅण्ड या संकल्पनेला नवीन रूप देणे आणि तरुणाईसोबत या ब्रॅण्डचे घट्ट नाते प्रस्थापित करून देणे असे आहे. सरकारी कामे हाताळण्यातील एजन्सीचे कौशल्य, सरकारच्या सोशल मीडियाच्या कामासाठी अंतिम निवड होण्यात, अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
टाटा ग्रुप कंपन्यांपैकी टाटासन्सच्या सोशल मीडियाचे काम अलीकडेच क्रेयॉन्सला मिळाले आहे. गेल्या दोन वर्षांत एजन्सीने टाटा समूहासाठी अनेक प्रतिष्ठेची अभियाने हाताळली व कार्यान्वित केली आहेत. क्रेयॉन्सने टाटा मुंबई मॅरेथॉनचे अभियानही केले. जागरूकता व संवाद यांबाबत या कामाकडे उदाहरण म्हणून बघितले जाते. याशिवाय, गेल्या वर्षात ‘विंग्ज ऑफ चेंज’ हे एअर इंडियाच्या स्थित्यंतराचे ऐतिहासिक अभियान करण्यासाठी तसेच टाटा क्रोमाचा सर्जनशील विभाग हाताळण्यासाठी टाटाने क्रेयॉन्स अॅडव्हर्टायजिंगची नियुक्ती केली.
Comments
Post a Comment